Skip to main content

मनोमनी ते याची देही


२६ तारखेला काही इ-मित्रमंडळी 'याची देही याची डोळा' भेटली त्या निमित्ताने . .    



कोण कुठले दहा बाराजण भेटण्याचा उत्साह दर्शवतात.
कोणाला ही कल्पना सहज शक्य वाटते, कुणी दुविधेत पडतात.
दुविधा अशी की जशी मी भेटण्याची तयारी दाखवली, तशी इतर सगळे दाखवतील की नाही?
दाखवलीच तर तो माणूस नक्की ती पूर्ण करेल कि नाही!
साहजिक आहे - एखादा माणूस 'जेन्युईन' झाला की तो समोरच्या व्यक्तीकडून तशीच अपेक्षा करू लागतो.

तरी काहींनी हट्ट सोडला नाही. नेट-भेट ची वाटचाल थेट-भेट च्या दिशेने अंगात आल्यासारखी सुरु केली. अश्या उत्साहाने कि भेट, ग्रेट-भेट झाली नाही तरी पर्वा नव्हती. या दांडग्या उत्साहामुळेच अखेरच्या क्षणी दोन-तीन टाळकी वाढली सुद्धा!
तशी सुरुवातीला निमंत्रण दिलेल्यांचा आकडा मोठ्ठा होता, पण का होईना त्याच्या ६० टक्के बझकर तयार झाली.

माहिती नाही जगात अशी किती लोकं पूर्वी भेटली असतील.
एक - दोन ठीके हो पण एकदम बारा?
एकदम बारा लोकांची भेट यशस्वी होण्याचे चान्सेस जेवढे होते, तेवढेच मोठ्ठा पोपट होण्याचे सुद्धा होते.
पण सगळेच जण बेधडक होते.
एकमेकाना साद घालणे सुरु झाले आणि श्रीगणेशा चरणीच भेट ठरली.

पुणे निघाले . . . .  चला जेवढे येणार होते ते आले - नाही म्हणायला तसा एक जास्तच आला.
आता ओढ लागली ती कधीही न पाहिलेल्या, पण तरीही ज्यांना 'चांगलं ओळखतो' अश्या सवंगड्याना  भेटायला.
रस्त्यावरच्या रंगवलेल्या पट्ट्यांना मागे टाकता टाकता बझ अन ब्लॉग वर पुर्वी घालवलेल्या आठवणींचे धागे विणता विणता मुंबापुरीस लवकरच पोचलो.

उत्सुकता पराकोटीस होती, ओम शांती ओम च्या गाण्यात नट नट्या एकेक करून एन्ट्री मारतात तसे प्रत्येक जण येत होते.
सगळे जमता जमता तास उलटला.
खरतर सुरुवातीला थोडंसं मळभ होतं, सगळेच थोडा विचार करत थोडा सहभाग घेत होते पण ही 'व्हर्चुअल' नाती अस्मानीच्या निळाईसारखी एकरंग व्हायला फार वेळ नाही लागला.
गेल्या दोन्-तीन महिन्यातले बझ वर घातलेले गोंधळ शब्दात येउ लागले, तशी अचानक भेटेचे रुपांतर मैफीलीत होउ लागले.

एके ठिकाणी "अरे! ही बझ वर जखमी सिंहिणीसारखी असते, प्रत्यक्षात कसली शेळी आहे!" तर दुसरीकडे "मला वाटलं हा शांत असेल पण कसला बोलतोय!" अशी वाक्ये कानावर पडू लागली.
संवेदनशील आणि भावनिक असे लिखाण करणारे एकदम खूप रांगडे आणि स्वच्छंदी वाटले. अपेक्षेप्रमाणे काही व्यक्ती अनुभवल्या ज्या त्यांच्या लिखाणाप्रमाणेच सौम्य, शांत आणि परिपक्व होत्या.
काही चटपटीत, काही कलंदर, काही लपलेले, काही बागडणारे, काही पुढारी - सगळ्या व्यक्ती आणि वल्ली जस-जश्या खुलल्या तसतशी भट्टी चांगलीच जमली. 

चौपाटीच्या किंवा कुठल्या बागेच्या भेळेचा एक गुणधर्म असतो.
आंबट, तुरट, गोड, तिखट, खारट आणि अनेक कितीतरी चवी भेळेमध्ये फक्त 'असून' उपयोग नसतो.
त्यांचे प्रमाण बरोब्बर असेल तरच भेळेला चट्पटीतपणा येतो आणि त्यामुळे मजा येते. त्यादिवशी तसंच झालं, भेळ इतकी चविष्ट जमली की जरा जास्तच मनसोक्तपणे खाल्ली.

दिवसभर सागराच्या अवतीभवती राहून त्याच्याएवढ्याच खोल पण मैत्रीच्या गहराइमध्ये अगदी दमेपर्यंत डुंबलो. पश्चिमेच्या कागदाला केशरी रंग दिसू लागला तसं मन भानावर आणून सगळीच पाखरे घरी परतण्यासाठी आपापली दिशा शोधू लागली.

काय गम्मत आहे पहा ना - आता चार दिवसांनी वाटतंय की, पुन्हा भेटू सगळे जण कधीतरी, पण त्याचवेळेस मनातली पाल पुन्हा चुकचुकती आहे,
"आता भरून गेली, तशी पाखरांची शाळा पुन्हा परत भरेल का?"        

Comments

pakhare nakki partuni shalet parat yenaar..........
Unknown said…
अरे अर्जुना खरंच वाचला तेव्हा हरवून गेलो, पण नक्की हि पाखरे पुन:पुन्हा भेटतच राहतील नक्की वाचन आहे, न बोलता सर्वांसाठी आणि हो इतका सुंदर लिहिलयस कि खरंच डोळे त्या आठवणींनी पाणावले रे.
aosomeeeeeeeee..
Nice One..
paratichya ya vatevarti asech ka he ghadate?????
Nivedita Raj said…
of course nakki bhetnar fakt date tharava :)
Unknown said…
Jyanee kament kelee te khare 'unconditional' friends ahet
dostannoo. tyabaddal kuni kahihi mhano . . mhanoon pahilyanda tumhalaa dhans!

Amar - Yenaar nakkee yenaar
Ranangan - Khoop thanks! sorry jar radawle asel tar.
Vaishali - punha swatahachech june kosh khulawat astaat mhanoon ase ghadate
Nivy - Nusti date naka tharwoo ata 'date' laa ghewoon yaa! :)
Unknown said…
अर्जुन आला नाहीस तर मग घसा ताणून रडेन भेटायचं काय आज कि उद्या कि परवा तारीख ठरावा. बस मग काय मी तर बोलतो निवी च्या गावाला जाऊ या पहिले मग नंतर लोणावळा कसं
Anonymous said…
उत्सुकता पराकोटीस होती, ओम शांती ओम च्या गाण्यात नट नट्या एकेक करून एन्ट्री मारतात तसे प्रत्येक जण येत होते. >> +1

:)

Popular posts from this blog

गाडी सुरु करणे : भौतिकशास्त्र :)

वाहतूकीच्या जगात तुम्ही थोडेफार सक्रीय असाल तर अशी (नाट्यमय ) अवस्था डोळ्यासमोर आणावयास अजिबात कठीण नाही. तुम्ही दुचाकी वर आहात, आणि लाल सिग्नल आहे म्हणून तुमची दुचाकी बंद करून चौकात बर्‍यापैकी पुढे थांबले आहात. तुमच्या आजूबाजूला चार पाच दुचाक्या,  पाठीमागे एक बस आणि बसच्या मागे डुकरांच्या मागे जशी  पिलावळ असते त्या पद्धतीत दहा-पंधरा दुचाक्या गर्दीत उभ्या आहेत. सिग्नलचा दिवा लालचा हिरवा होताच तुम्ही दुचाकीला किक् मारता, पण दुचाकी तुम्हाला काहीच प्रतिसाद देत नाहीए, मग तुम्ही धडपड करायला लागता आणि तुमच्या मागच्या गाड्या जोरजोरात हॉर्न वाजवून वेळप्रसंगी तुमच्या आई वडीलांचा उद्धार करून 'कचकचून' निषेध नोंदवला जात आहे. दु:स्वप्नच ना? असा हा विचार मनात आला आणि म्हणालो गाडी का सुरू होत नाही याचं कारण बघुया. वास्तविक गाडी सुरु का होत नाही याचा विचार करण्यासाठी मुळात ती कशी सुरु होते हे समजणे  महत्वाचे आहे. त्यातूनही मुलभूत अश्या  गाडीच्या  इंजिनाचा विचार करणे जास्त समर्पक वाटते. जे काही तुटक ज्ञान आहे ते मी इकडे पाजळायचा प्रयत्न चालवणा...

सीबिस्किट

ही एक उत्क्रुष्ट कलाक्रुती पाहण्याचा योग आला. चित्रपटाचे पुढील चार भागात तुकडे पाडले आहेत. सिनेमाच्या पुस्तकातले हे चार वेगवेगळे धडे आहेत असं म्हंटलं तरी काही हरकत नाही. भाग एक - हॊवर्ड कारच्या खरेदी-विक्रीचा याचा व्यवसाय. अपघातात तो आधी त्याचा मुलगा आणि नंतर त्याच्या पत्नीला गमावतो. तसा यशस्वी पण सर्वस्व गमावल्याने खचलेला, कशात काही मन लागत नाही असा.  घोड्यांची पैदास करून शर्यतीचे घोडे वाढवण्याची त्याची इच्छा असते. त्याच्या या धंद्या निमित्ताने  फ़िरत असतानाच त्याला एक स्त्री भेटते आणि दोघांचे लग्नही होते. पुढे एके दिवशी घोड्यांच्या तबेल्यात त्याला स्मिथ नावाचा म्हातारा भेटतो. तो म्हातारा एका घोड्याबरोबर माळरानावर राहत असतो. त्याचा सध्याचा घोडा पुर्वी जायबंदी झालेला असतो त्यामुळे त्याला त्याचा मालक गोळी घालत असताना या म्हातार्या स्मिथनी  वाचवलेला असतो. स्मिथ या प्रसंगी गप्पा मारत असताना हॊवर्ड ला म्हणतो, "You dont throw away your ...

बालगंधर्व

  नारायण श्रीपाद राजहंस. मराठी संस्कृतीला लाभलेली एक विभुती. ’नाट्यसंगीत’ हा प्रकार रुजवणारा, त्याचं बीज मोठं करणारे हा एक गुणी कलावंत. नाट्यसंगीतासाठी या मनुष्यानी अवघं आयुष्य वेचलं. इतकं की सध्याच्या माझ्या पिढीला मराठी संस्कृती आधी की नाट्यसंगीत आधी? असा प्रश्न पडेल. नितिन देसाईक्रुत ’ बालगंधर्व ’ चित्रपट पडद्यावर आला आणि ते हल्लीच घरोघरी पोहोचले, पण जुन्या जाणत्यांना, ज्यांनी त्यांचं गाणं ऐकलं आहे, त्यांनाच खरंतर त्या चित्रपटावर भाष्य करायचा अधिकार आहे असं मला स्पष्टपणे वाटतं. गायकी हा बालगंधर्व ांचा गाभा आहे. त्यामुळे मी अंदाज लावू शकतो, की बाकी सगळं जे आहे ते उत्क्रुष्टपणे दाखवले गेले असेल, त्यामुळे तो अनुभव अर्थात छान आहे. अन म्हणूनच फ़क्त माहितीपट म्हणून तो चांगला आहे. असो. त्यांचा काळ अदमासे शंभर वर्षांपूर्वीचा, पण बालगं धर्वांच्या सुरांमुळेच की काय सगळ्यांनी बालगंधर्व अजूनही मनामध्ये जपला आहे. याबद्दल पुलं म्हणाले होते की, आमच्या उमेदीच्या काळात बालगंधर्व ांचे गाणे ऐकताना आम्ही ज्या ज्या जागांवर जश्या पद्धतीनी दाद दिल्या आहेत, त्याच जाग...