तो दिवस मांजरींचा होता.
दमून भागून आलो आणि घरच्या लग्नाची तयारी सुरु केली. बाहेर पडलो, एटीएम मधून पैसे काढले मोटार सायकल भरभाव सोडली आणि रस्त्याच्या उजव्या बाजूने एक पांढर शुभ्र मांजर नेहेमीची सवय असल्या सारखे रस्ता ओलांडत बुंगाट सुटले. संध्याकाळची ७ ची वेळ. मुख्य रस्त्यावर भरपूर वाहतूक होती, तिथून कुणालाही न शिवता, माझ्या गाडीच्या पुढच्या चाकाच्या '३ मुंग्या' एवढे अंतर ठेवून ते मांजर सुखरूपपणे पुढे गेले. क्षणभर वाटले कि तो पांढरा गोळा मी फुटबॉल सारखा उडवला आणि ते गतप्राण झाले, पण नशीब कि मी पहिल्या पासून रस्ता ओलांडण्याच्या त्याचा पवित्रा पाहिला होता, आणि वेळीच ब्रेक लावला होता. गाडी पूर्ण थांबली नाही तरी कमी झालेल्या वेगामुळे मांजरीचा जीव नक्की बचावला होता. उसासा टाकून, पुन्हा गाडी दामटवायला सुरुवात केली. पुढच्याच चौकात एक नाही तो विचार आला. मागे बसलेल्या बहिणीला गम्मत म्हणून सांगितले, 'आता गाडी हळू चालवतो, मांजर आडवे आले ना!' :) ती थोडीशी सिरीअसच झाली.
त्या दिवशी एके ठिकाणी निमंत्रण द्यायचे होते, त्यांच्या गल्यात आमचे स्वागत दोन बोक्यानीच एक सावध नजर टाकून आणि 'म्याव' करून केले. "हि मांजरे शेजारयांची आहेत, इकडे येऊन बसतात." बहिणीने माहिती दिली. मी त्या बोक्यांना दुर्लक्ष केलं - तसे केल्याने मला खूप आनंद मिळाला. यथावकाश निमंत्रण झाले, बघतो तर सोफ्या वर त्यांची मुलगी अभ्यास करत होती आणि तिच्या उबेत अजून एक चट्टेरी काळे पांढरे मांजर डोळे मिटून बसले होते! एवढ्या आलिशान बंगल्यात पहुडलेले मांजर पाहून "काय नशीबवान जीव आहे!" असा हेवा वाटला.
पुढे जायचं होतं स्वयंपाक करणाऱ्या बाईंकडे. तिकडे गेलो आणि पाहतो तर डझनावर मांजरी जिथे तिथे पहुडल्या होत्या. सोफ्यावर बसायला जागा नाही म्हणून २ - ३ मांजरींना बखोटीला धरून उचलून घरमालकांनी जवळच जमिनीवर फेकून दिलं आणि आम्हाला बसायला जागा केली. एवढ्या जास्त मांजरी एका ठिकाणी पाहून त्यांचे निरीक्षण करण्यातच जास्त वेळ गेला. गम्मत आली एकंदरीत. यथावकाश काम मार्गी लावून तिथून निघालो.
बाहेरून ५ फळं आणायची होती. खरेदी आटोपली. तशी किरकोळ खरेदीच केली होती.
"अडीचशे रुपये झाले" - फळवाला म्हणाला.
मी म्हणलं "काय? किती?" जरा धक्काच होता मला.
"अडीचशे!" - तो पुन्हा थंडपणाने म्हणाला.
मुकाट्याने पैसे हवाली करून आणि अडीचशे रुपयात एवढीच फळे हे पाहून खिन्न मनाने परत निघालो.
"कसलं महाग झाले आहे सगळं", लोकांनी फळे खाउच नये अशी सरकारने सोय केली आहे." अशी निषेध संबोधक वाक्ये बहिण म्हणत होती. मीही बहिणीच्या वाक्यात वाक्य पेरलं. "देवा, पुढचा जन्म माणसाचा नको देवूस बाबा" समोरच पाचेक फूट अंतरावर अजून एक पांढरे शुभ्र मांजर रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या सायकलच्या मागे उभे राहून माझ्याकडेच पाहत होते. का कुणास ठाउक, माझ्याही तोंडात अचानक आले - "मांजराचा दे पुढचा जन्म!"
दूध,चक्का चोरायचा नाहीतर उंदीर किंवा पक्षी पकडायचे. पंचतंत्रा मधली गोष्ट माहितीये त्यामुळे तराजू मधला खवा मी दोघा माकडांना गंडवून आरामात खाउ शकेन. सगळं आयतं मिळणार कशाचे काही बंधन नाही कि काही नाही. महागाईचे टेन्शन नाही, कुत्र्यासारखे घराची राखण करणे वगैरे गोष्टीची अपेक्षा कुणी करणार हि नाही. गुबगुबीत असल्याने पिल्लू असतानाच काय; म्हातारे झाल्यावरही लाड होणार. वाईट विचार नाहीये नै का!.
आजचा दिवस मांजरांचा होता, २ तासात जवळपास २५ एक मांजरी वेगवेगळ्या ठिकाणी पाहिल्या होत्या. त्यामुले दुसरे काही सुचत नव्हते. पण आता काही दिवसांनीही देवाकडे पुढची मागणी कायम ठेवली आहे - पुढचा जन्म मासे खाणाऱ्या कुटुंबातल्या पांढरयाशुभ्र बोक्याचा हवा - बाकी का s s s ही नको. :)

Comments