नेमकं केव्हा आठवत नाही. लहानपणी 'विदारक' या शब्दाची ओळख फार गम्मतशीर पद्धतीने झाली.
आमच्या घराच्या अंगणात नारळ, अशोक, आंबा, जांभूळ, फणस असे डौलदार वृक्षराज होते, त्यांच्याबरोबर चिकू, डाळींब, राय आवळा, पेरू अशी त्यांची आकारानी छोटी असलेली भावंडेही एकत्र गुण्या-गोविंदानी नांदत असत. बागेत पाच सहा गुलाब, कर्दळ, रातराणी, चाफा,शेवंती, मोगरा, गार्डन लिली, ग्लाडीओला यासारखी फुलझाडे, या व्यतिरिक्त ज्यांना कधीही फुले येणार नाहीत अशी रबर, सायकस, बेडकीचा पाला, फायरबॉल, लाल कोवळी पाने असलेली झाडे, लाजाळू अशी नुसतीच शोभेची झाडे तसेच काही जुजबी भाज्या म्हणजे अळू, कढीपत्ता, बडीशेप वगैरे. अश्या भरपूर वृक्ष समूहाच्या सावलीमध्ये आणि अंगाखांद्यावर माझे बालपण गेले. नाही म्हणायला, घरासमोर रस्त्याच्या पलीकडे असलेल्या शाळेच्या आवारात डिंकाचे आणि त्याच्या शेजारी निम्बाचे असे दोन मोठे वृक्ष दरबानासारखे उभे असत.
ह्या डिंकाच्या झाडाशी माझी खूप गट्टी जमली होती. एक तर असं वेगळे चिकट चिकट झाड म्हणजे माझ्या बाल मनाला त्याचे जास्त कुतूहल आणि त्या झाडाची जागा इतकी मोक्याची होती की त्या झाडावर चढलं की घर, घरासमोरचा रस्ता, ते झाड ज्या शाळेच्या आवारात होतं त्या शाळेचे वर्ग सगळे अगदी छान दिसत असे. त्याचा शेजारीच काहीसे त्याच शाळेच्या आवारात गेटच्या शेजारीच भले थोरले निम्बाचे झाड होते. चढायला खूप अवघड होते ते, म्हणून त्याच्याशी गट्टी जमली नाही मात्र ते माझ्या आणि डिंकाच्या दोस्तीचे साक्षीदार होते म्हणून तसे जवळचेच होते.
माझ्या घरातले पेरू चे झाड दिवाळीच्या सुट्टीतले एक नंबर दोस्त. फक्त 'ते नाजूक असते फांदी मोडू शकते' अशी आजोबांनी तंबी दिली असल्याने त्याचाशी जरा आदर ठेवूनच खेळायचो. पेरूच्या शेजारीच खूप मोठ्ठा सरळसोट वाढलेला राय आवळा होता. त्याच्या बुंध्याला सगळीकडून नुसते आवळे लगडले असत. एकदा अश्याच उन्हाळ्याच्या सुट्टीत दिवसभर आवळे खाल्ले, त्या दिवशी संध्याकाळी घश्यामधून शब्दच फुटत नव्हता असा घसा खराब झाला होता. त्या वेळेस एवढ्या आवळ्यांनी लगड्लेलं झाड पाहिलं नव्हता - म्हणून तोबरेच्या तोबरे भरून आवळे हाणले होते. घराच्या दारासमोर तुळशीव्रुंदावना शेजारी असलेल्या लाजाळूच्या झाडाशी तर मी इतका खेळलो आहे की विचारू नका. त्याला सतत पाणी घालणे, तेव्हा मिटणार्या पानांकडे पाहणे. हळूहळू पाने उघडली कि पुन्हा हातच लावणे असे उद्योग तासन्तास चालत असत. घराच्या मागच्या बाजूला नारळाच्या झाडाच्या अळ्यातच एक फणसाचे झाड आले होते. काही वर्षातच त्याला तुरट फणस सुद्धा लागले होते. तुळशीच्या मागे एक 'अशोक' झुलायचा. खूप वारा सुटला ना की डोल बाई डोल करणार्या त्याच्याकडे बघत बसायला गम्मत वाटायची. नकळतपणे याच आणि अश्या सगळ्या सोबतीं बरोबर मी मोठा झालो.
तिसरी -चौथीत असेन. एके दिवशी शाळेतून आलो. रिक्शावाल्या काकांनी दारात सोडलं. दुपारची वेळ. एकदम खूप उजेड जाणवला. आजूबाजूला पाहिलं तर सगळं मोकळं मोकळं वाटलं. "डिकाचे झाड दिसलेच नाही." धावतच त्या शाळेत गेलो. समोर बघतो तर २ मजली इमारतीं एवढा तो व्रुक्ष बुंध्यापासून अगदी माणूसभर उंची ठेवून इतक्या पट्कन कापलाही गेला आहे. "अरेच्च्या, सकाळी तर होतं हे झाड!" - मी माझ्या मनाशीच म्हणालो. झाडाची पाने, फांद्या इतस्ततः विखुरलेल्या होत्या, त्यातून रस्ता काढत मी त्या झाडापर्यंत पोहोचलो आणि त्या बुन्ध्याला हात लावला. एकदम मला माझी आज्जी आठवली. "ती गेल्यावर्षी गेली. त्या वेळेस म्हणजे जाण्याच्या दिवशी तिने माझा हात हातात घेतला होता - मोठा हो म्हणाली. खूप आजारी होती ती. खूप आठवण येते तिची. पण ती गेली देवाघरी."
दप्तर संभाळत मी घरी आलो. खूप आठवण आली झाडाची. चार वाजता आई नौकरी वरून आली. मी बिलगलो तिला. म्हणालो कि डिंकाचे झाड तोडले आज! एकदम रडूच कोसळले. ओक्साबोक्षी, हुंदके देत खूप वेळ रडलो. आईने समजूत काढली, तेव्हा हळू हळू रडायचे थांबलो.
आईच्या सांगण्यावर ग्रुहपाठ करायला बसलो. पाहिला प्रश्न होता-
वाक्यात उपयोग करा -
कुर्हाड कोसळणे
जीवावर उठणे
समानार्थी शब्द लिहा
विदारक

Comments