Skip to main content

Posts

गाडी सुरु करणे : भौतिकशास्त्र :)

वाहतूकीच्या जगात तुम्ही थोडेफार सक्रीय असाल तर अशी (नाट्यमय ) अवस्था डोळ्यासमोर आणावयास अजिबात कठीण नाही. तुम्ही दुचाकी वर आहात, आणि लाल सिग्नल आहे म्हणून तुमची दुचाकी बंद करून चौकात बर्‍यापैकी पुढे थांबले आहात. तुमच्या आजूबाजूला चार पाच दुचाक्या,  पाठीमागे एक बस आणि बसच्या मागे डुकरांच्या मागे जशी  पिलावळ असते त्या पद्धतीत दहा-पंधरा दुचाक्या गर्दीत उभ्या आहेत. सिग्नलचा दिवा लालचा हिरवा होताच तुम्ही दुचाकीला किक् मारता, पण दुचाकी तुम्हाला काहीच प्रतिसाद देत नाहीए, मग तुम्ही धडपड करायला लागता आणि तुमच्या मागच्या गाड्या जोरजोरात हॉर्न वाजवून वेळप्रसंगी तुमच्या आई वडीलांचा उद्धार करून 'कचकचून' निषेध नोंदवला जात आहे. दु:स्वप्नच ना?
असा हा विचार मनात आला आणि म्हणालो गाडी का सुरू होत नाही याचं कारण बघुया. वास्तविक गाडी सुरु का होत नाही याचा विचार करण्यासाठी मुळात ती कशी सुरु होते हे समजणे  महत्वाचे आहे. त्यातूनही मुलभूत अश्या  गाडीच्या  इंजिनाचा विचार करणे जास्त समर्पक वाटते. जे काही तुटक ज्ञान आहे ते मी इकडे पाजळायचा प्रयत्न चालवणार आहे, तरी कृपा करून ते विनोदी समजून वाचू नये एवढ…
Recent posts

बालगंधर्व

नारायण श्रीपाद राजहंस. मराठी संस्कृतीला लाभलेली एक विभुती. ’नाट्यसंगीत’ हा प्रकार रुजवणारा, त्याचं बीज मोठं करणारे हा एक गुणी कलावंत. नाट्यसंगीतासाठी या मनुष्यानी अवघं आयुष्य वेचलं. इतकं की सध्याच्या माझ्या पिढीला मराठी संस्कृती आधी की नाट्यसंगीत आधी? असा प्रश्न पडेल.

नितिन देसाईक्रुत ’बालगंधर्व’ चित्रपट पडद्यावर आला आणि ते हल्लीच घरोघरी पोहोचले, पण जुन्या जाणत्यांना, ज्यांनी त्यांचं गाणं ऐकलं आहे, त्यांनाच खरंतर त्या चित्रपटावर भाष्य करायचा अधिकार आहे असं मला स्पष्टपणे वाटतं. गायकी हा बालगंधर्वांचा गाभा आहे. त्यामुळे मी अंदाज लावू शकतो, की बाकी सगळं जे आहे ते उत्क्रुष्टपणे दाखवले गेले असेल, त्यामुळे तो अनुभव अर्थात छान आहे. अन म्हणूनच फ़क्त माहितीपट म्हणून तो चांगला आहे. असो.

त्यांचा काळ अदमासे शंभर वर्षांपूर्वीचा, पण बालगंधर्वांच्या सुरांमुळेच की काय सगळ्यांनी बालगंधर्व अजूनही मनामध्ये जपला आहे. याबद्दल पुलं म्हणाले होते की, आमच्या उमेदीच्या काळात बालगंधर्वांचे गाणे ऐकताना आम्ही ज्या ज्या जागांवर जश्या पद्धतीनी दाद दिल्या आहेत, त्याच जागांवर हल्लीच्या  तरूण पोरांना दाद दे…

सीबिस्किट

ही एक उत्क्रुष्ट कलाक्रुती पाहण्याचा योग आला. चित्रपटाचे पुढील चार भागात तुकडे पाडले आहेत. सिनेमाच्या पुस्तकातले हे चार वेगवेगळे धडे आहेत असं म्हंटलं तरी काही हरकत नाही.

भाग एक - हॊवर्ड

कारच्या खरेदी-विक्रीचा याचा व्यवसाय. अपघातात तो आधी त्याचा मुलगा आणि नंतर त्याच्या पत्नीला गमावतो. तसा यशस्वी पण सर्वस्व गमावल्याने खचलेला, कशात काही मन लागत नाही असा.  घोड्यांची पैदास करून शर्यतीचे घोडे वाढवण्याची त्याची इच्छा असते. त्याच्या या धंद्या निमित्ताने  फ़िरत असतानाच त्याला एक स्त्री भेटते आणि दोघांचे लग्नही होते. पुढे एके दिवशी घोड्यांच्या तबेल्यात त्याला स्मिथ नावाचा म्हातारा भेटतो. तो म्हातारा एका घोड्याबरोबर माळरानावर राहत असतो. त्याचा सध्याचा घोडा पुर्वी जायबंदी झालेला असतो त्यामुळे त्याला त्याचा मालक गोळी घालत असताना या म्हातार्या स्मिथनी  वाचवलेला असतो. स्मिथ या प्रसंगी गप्पा मारत असताना हॊवर्ड ला म्हणतो, "You dont throw away your life, just because its banged up a little." हॊवर्डचे डोळे उघडतात. तो स्मिथला त्याचा तबेल्याचा व्यवस्थापक आणि प्रशिक्षक म्हणून ठेवतो.


भाग दोन - …

स्टैनली का डब्बा

स्टैनली का डब्बा हा चित्रपट पाहीला...आवडला.चित्रपटाच्या शेवटी एक नोटीस येते. "या चित्रपटाचे शूटींग विद्यार्थ्यांच्या खूप मधल्या सुट्ट्या (रिसेस) अर्थात फ़ार वेळ खर्च न करता; एक वर्कशॊप म्हणून सुट्टीच्या दिवसातच म्हणजे फ़क्त एका वीकेंड मध्ये केले गेले आहे". सध्याच्या व्यावसायीक सिनेमा मध्ये अश्या प्रकारचा चित्रपट बनवून लोकांपर्यंत पोहोचवायला एक धैर्य लागतं, अमोल गुप्तेचं हे धैर्य चित्रपट संपताना प्रेक्षकात त्यावेळेस एकदम जाणवतं.

अमोल गुप्ते तसंच शाळा, शिक्षक-विद्यार्थी नाते, एका विद्यार्थ्याचीच प्रमुख व्यक्तिरेखा अश्यांमुळे साहजिकच आठवतो तो ’तारे जमिन पर’. दोन्ही चित्रपटातला विरोधाभास हा की स्टॆनली चुणचुणीत, स्वाभिमानी, हुशार आणि विद्यार्थीप्रिय मुलगा तर ’तारे जमिन पर’ मधला दर्शील हा एक डिसलेक्सिक त्यामुळे अभ्यासात मागे, एकटा पडलेला, कुणी न समजून घेतलेला मुलगा. तारे मध्ये शिक्षक-विद्यार्थी असं मैत्रीपूर्ण नातं आहे तर स्टॆनली मध्ये त्याच नात्यातील एक चढाओढ आहे.

वास्तविक अमोल गुप्ते हा लहान मुलात व्यावसायिक संबंध असणारा माणूस. मतिमंद मुलांमध्ये तो गेली कित्येक वर्षे काम करतो.  …

पानवाला आणि पान

पानहीआपल्यादेशालालाभलेलीएकसांस्कृतिकदेणगीआहे. नीटपाहिलं,तरआपल्यापुराणातचकितीतरीठिकाणीतांबूल-भक्षणकरणारेसूर-असुरसापडतील. आजहीनैवेद्याबरोबरविडाद्यायचीपद्धतआहेचकी. यावरूनआठवलं, लहानपणीमीमाहूरच्यादेवीच्यादर्शनासाठीगेलोहोतो. तिथेदेवीच्यातोंडातविडाठेवण्याचीपद्धतआहे. तोविडाकाढलाकिगरमझालेलाअसतोअसंहीम्हणतात. आताहाश्रद्धाश्रद्धेचाभागझाला, पणमुखातलाविडापरतकाढावाचकशाला? असारास्तप्रश्नमलाआतापडतो.सांगायचाउद्देशएवढाचकीविड्याचीहीपरंपरापुष्कळजुनीआहे. मराठी व्याकरणातहीसुपारीदेणे, विडाउचलणेअसेकाहीअजूनहीयेणारेवाकप्रचारआहेतकी. दत्तप्रबोधामध्येहीपानाचीतमोगुणीअशीउपमाआहे. त्यातम्हंटलेआहेकी,

कीर्तनीतांबूलभक्षण।तेंरजस्वलेचेंशोणितजाण।कागजन्मतयालागून।करीभक्षणनरकमांस.

त्यामुळेआपल्यासंस्कृतीमध्येपानजेवढेजुनेतेवढेचपिचकारीमारणारेथुंक-संप्रदायीहीजुनेचआहेतहेकळूनचुकावे. अर्थातचपहिलेपानकुणी 'लावले'किंवापानखायचीपद्धतभारतातकधीपासूनसुरुझालीहासंशोधनाचाविषयठरूशकेल. वास्तविकयावरकदाचितसंशोधनझालेहीअसेल, पणसुज्ञांनी यातनपडलेलेचबरे. ( नै, 'रस' काढूनटाकूनचोथाकाचावतराहायचा?) आग्रहानेसांगायचंच