स्टैनली का डब्बा हा चित्रपट पाहीला... आवडला.
चित्रपटाच्या शेवटी एक नोटीस येते. "या चित्रपटाचे शूटींग विद्यार्थ्यांच्या खूप मधल्या सुट्ट्या (रिसेस) अर्थात फ़ार वेळ खर्च न करता; एक वर्कशॊप म्हणून सुट्टीच्या दिवसातच म्हणजे फ़क्त एका वीकेंड मध्ये केले गेले आहे". सध्याच्या व्यावसायीक सिनेमा मध्ये अश्या प्रकारचा चित्रपट बनवून लोकांपर्यंत पोहोचवायला एक धैर्य लागतं, अमोल गुप्तेचं हे धैर्य चित्रपट संपताना प्रेक्षकात त्यावेळेस एकदम जाणवतं.
अमोल गुप्ते तसंच शाळा, शिक्षक-विद्यार्थी नाते, एका विद्यार्थ्याचीच प्रमुख व्यक्तिरेखा अश्यांमुळे साहजिकच आठवतो तो ’तारे जमिन पर’. दोन्ही चित्रपटातला विरोधाभास हा की स्टॆनली चुणचुणीत, स्वाभिमानी, हुशार आणि विद्यार्थीप्रिय मुलगा तर ’तारे जमिन पर’ मधला दर्शील हा एक डिसलेक्सिक त्यामुळे अभ्यासात मागे, एकटा पडलेला, कुणी न समजून घेतलेला मुलगा. तारे मध्ये शिक्षक-विद्यार्थी असं मैत्रीपूर्ण नातं आहे तर स्टॆनली मध्ये त्याच नात्यातील एक चढाओढ आहे.
वास्तविक अमोल गुप्ते हा लहान मुलात व्यावसायिक संबंध असणारा माणूस. मतिमंद मुलांमध्ये तो गेली कित्येक वर्षे काम करतो. त्यामुळे लहान मुलांच्या डोक्यात काय चाललं असतं, त्यांच्याशी कसं बोलायचं, कसं वागायचं हे त्याच्या शिवाय जास्त अजून कुणाला कळणार? चित्रपटाचं श्रेय अमोल गुप्तेला का जावं तर प्रेक्षकवर्ग हा चित्रपटातील लहान मुलांच्या भावनांना सहजपणे समजून घेतो . . .. . स्वत:च्या बालपणात हरवतो. व्यक्तीगत सांगायचे तर चित्रपट बघता बघता मी ही माझ्या शाळेत गेलो. असं हे दिग्दर्शन हेच अमोल गुप्तेचं श्रेय आहे. स्टॆनली कोण, कसा, त्याच्या स्वभावाचे पैलू, त्याची बालबुद्धी आणि परिपक्वता हे अगदी साध्यासुध्या प्रसंगातून प्रभावीपणे दाखवलं गेलं आहे. त्याच्या आवडत्या रोझी टीचर (दिव्या दत्ता) साठी त्याने केलेली कविता, शाळेच्या टाकीवर त्याची नाइलास्तव पोटभर पाणी प्यायची असलेली सवय, त्याचं शाळेत इतर मुलांपेक्षा लवकर येणं, मधल्या सुट्टीत डबा न खाता शाळेबाहेर त्याचे ऊंडारणं, स्वत:च्या आईबद्दल त्याने अधून मधून काढलेले अभिमनास्पद उद्गार, यातून स्टॆनलीची व्यक्तिरेखा अधिक कुतुहलपूर्ण बनत जाते. अगदी चित्रपटभर त्याचं घर कसं असेल, त्याचे आई वडील कसे असतील, हे प्रश्न तुम्हाला अंदाज करायला भाग पाडतात.
चित्रपटाचा मूळ गाभा म्हणजे; वर्मा सर उर्फ़ खडूस हे स्वत: हिंदीचे शिक्षक असून इतर शिक्षक तसेच मुले यांचे डबे चोरून खात असतात. मुलांचे डबे खाऊन च्या खाऊन त्यांच्यावर गळचेपी सुद्धा करत असतात. या असल्या शिक्षकाच्या विरोधात स्टॆनली आणि कंपनीने केलेले सरळसोट उपाय म्हणजे ही साधी सोप्पी गोष्ट.
चित्रपटाचा शेवट इथे लिहित नाही पण शेवट अगदी शुन्य अंशात फ़िरतो. काही क्षण खिळवून ठेवतो. य़ा शेवटामुळेच प्रेक्षक घरी जाताना सिनेमा अनुभवत जातो आणि नंतरही अनुभवत राहतो.
’तारे जमिन पर’ मधल्या दर्शील पेक्षा ’स्टॆनली का डब्बा’ मधल्या पार्थोचं (खुद्द अमोल गुप्ते चा मुलगा) मन माझ्या मते जास्त खोलवर समजून देण्यात दिग्दर्शक यशस्वी होतो. त्याच वेळेस मोठ्यांमधला दांभिकपणाही जास्त टोचतो. स्टॆनली का डब्बा मध्ये जास्त नाटकी, फ़िल्मी असं कुठेच नाहीये; वास्तविकताच जास्त आहे. मुळात वास्तविकता कधीच नाटकीय नसते म्हणून कदाचित काही लोकांना या चित्रपटाचा शेवट रुचणार नाही. वास्तविक याच कारणासाठी मला ’स्टॆनली का डब्बा; हा ’तारे जमिन पर’ पेक्षा उजवा वाटला.
पार्थो गुप्ते (स्टॆनली) कुठल्याही बालकराकारासारखा अवाक करणारा सहज सुंदर अभिनय करून जातो. त्याने अभिनय केलाय हे कळतंही नाही हीच त्याच्या अभिनयाची खरी पावती. दिव्या दत्ता आपलं अभिनयातलं अष्टपैलूत्व सिद्ध करू पाहतीये आणि तिनेही आपल्या छोट्या भूमिकेमध्ये पुन्हा एकदा छाप पाडली आहे.
सलग १०९ दिवस ’तारे जमिन पर’ च्या युनिट बरोबर असणारा अमोल गुप्ते, कमिने मधला अप्रतिम असा भोपे भाउ आणि स्टॆनली मधला वर्मा सर उर्फ़ खडूस या तिन्ही अमोल गुप्तेंना बघून मी तरी त्यांचा मोठा पंखा झालो आहे. अश्या भरपूर कलाक्रुती त्यांच्याकडून होतील हीच अपेक्षा आहे.

Comments
छान लिहिलंयस
नक्की बघ. सेंसिटिव्ह माणसाने तर नक्की बघावा.
हल्ली कमेंट टाकायला, किती लोक वेळ काढतात.
तुमचा आशीर्वाद, आणि अमोल गुप्ते चे काम. :)
दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दिक्षित यांनी चित्रपट पाहून तो कर-मुक्त केला.
तुलाही आवडेल. :)
धन्स रे !!