दबंग आला, चालला आणि गेला. आता तीस मार खान येत आहे. कदाचित तोही चालेल आणि जाईल, पण दोन्ही चित्रपटांना जोडणारा एक दुवा आहे. तो म्हणजे त्यातील आयटेम सॉंग! कदाचित या दोन्ही गाण्यांची प्रदर्शन होण्याची तारीख इतकी एका पाठोपाठ होती त्यामुळेच लोक त्यांची तुलना करू लागले असतील. हा प्रश्न कुठून आला माहित नाही, पण बर्याचदा मुन्नी श्रेष्ट कि आता येउ घातलेली शीला श्रेष्ठ याची लाळ गाळत लोक चर्चा लुटतात. (माझ्या मते फारा खान चा हा स्टंट असू शकेल कारण दोन्ही गाणी तिनीच नृत्यदिग्दर्शित केली आहेत.)
माझ्यासाठी हा प्रश्नच अवैध आहे म्हणा. खरतर दोन्हीची तुलना होऊच शकत नाही कारण मुन्नी ला त्याच्या सेट मुळे, त्याच्या मधलं 'डार-लिंग' या शब्दामुळे आणि नाचाच्या स्टेप्स मुळे त्याला अगदी देशी फील आहे, तर शीला म्हणजे पूर्णपणे अमेरीकानाईस्ड आहे, त्यातले अर्धे शब्द पहिल्यांदा ऐकताना कळतही नाहीत, नाच लक्षातही राहत नाही.
मुन्नीचे सामर्थ्य म्हणजे मलाईका काकू, शिवाय गाण्याच्या अर्ध्या भागात सलमानचा धुमाकूळ, लोकांना कळेल अशी भाषा, लोकांना नाचता येईल असा नाच.
दुसऱ्या या बाजूला शीलाचे एकमेव सामर्थ्य म्हणजे कत्रिना कैफ. मधल्या काळात सॉलिड मेहनत करून ती चांगलीच बारीक झालेली आहे हे 'स्पष्ट' पणे दिसते. :) एखादीने आपल्या कल्पनाशक्तीच्या पलीकडे किती परफेक्ट दिसावं याचं 'सुरेख - सुंदर' उदाहरण म्हणजे साक्षात ती. नेहमी पेक्षा वेगळी एनर्जी तिने शीला मध्ये दाखवली आहे हे जाणवतच आणि त्यामुळेच ते गाणं एकदम भावत. पण एकंदरीत संगीत वगैरे गोष्टी पाहिल्या तर शीला भारतीय जनतेला किती पचनी पडेल याची शंकाच आहे.
विषयाची सुरुवात विषय डीबेटेबल नाही असं म्हणून केली याची जाणीव आहे, तरी मलाईका आणि कतरिना (आणि झालाच तर फारा) यांचा मान राखून जर मी मुन्नीलाच निवडणार हे (तुम्हा हुशार वाचकाना!) समजलेच असेल. त्याचवेळेस एवढाही महत्वाचा मुद्दा मी नमूद करतो कि याच वेळेस टीव्ही वर नाचत असणारी लूज टाय घातलेली न्यूयोर्क मधली 'शीला' ही मी नजरेतून सोडू शकणार नाही हेही आहेच. :)

Comments