Skip to main content

एक हसलेली काव्यमैफील - भाग २


थोड्याश्या विश्रांती आणि अल्पोपाहारानंतर कवीजन पुन्हा त्यांच्या प्रतिभेसहित दाखल झाले -


Amar -
mast jamali hoti pangat,
mast jamali hoti pangat,
pan ka konas thavuk aali oradat,
potamadhali bhuk ani jhale sagale gayabbbbbbbbbbbbbbbbbb

 
प्रावा -
टाईड ट्राय करो.... (अष्टपैलुत्व सिद्ध - पुन्हा एकदा - लेडी रजनीकांत)


सं. पा. 
आली वैशाली
पुन्हा सुरु होईल कवितांची उधळण
पुन्हा कोणीतरी अ रसिक बोलेल
करेन मुलींच्या कामेंटची पाठराखण
(संपा ने भाई दुमडली आहे - आणि तितक्यात कविताही झाली!)


 Arjun Deshpande -
असो एक - फर्माता हू - बझ मित्रान साठी


Pranita Wadekar - फर्मा..


सं. पा. - इर्शाद अर्जुन


Arjun Deshpande -
बझ कर हे स्वच्छंदी
सोयरिक हे फुलगंधी
करतात जवळीक अपरंपार
तरीही नेहमी स्पर्शापार
तरीही नेहमी स्पर्शापार
(फुसका गेला वाटतं)


अतुल राणे -
अश्या एकट्या कातरवेळी
नको नको ते उधाण येते ,
मनात माझ्या प्रसुतवेदना
तरी कवितेचे मुल ना होते ,
............कल्पनेतली अश्व दौडती ,
............शब्द घेउनी डोंगर रचती ,
............दौड तयांची कुठवर चाले ?
............शब्दही माझे जागा भुलती .
कशी सुचावी सुंदर कविता,
रित्या मनातील रिता खजिना,
शब्द सांगतील घाव मनीचे,
कुठवर सांगू हाच बहाणा .
............कुणासा हसविल ,कुणास ठेवील मुके,
............न्याहालीत शब्द जरी
............त्या कवितेची वाट पाहतो ,
............इथे थांबतो अधांतरी ...!
(एकच वादा - अतुल दादा! अचानक आला - हा रेग्युलर कवी दिसतो)


सं. पा. -
 वाहवा ऐकून तुमच्या
कवी अनेक जन्मले
अथांग सागरात या
माणिक मोती सापडले


Arjun Deshpande -
अथांग आकाश हे
नवकवी दिसे
असे वाटे, सगळेच कवी
स्वानंदापुढे खुजे


सं. पा. 
कवितेचा मैफिलीत या
अतुल राणे अवतरले
एक कविता सोडून दिली
वाहवा ला धास्तावले
(अगदी बरोब्बर बोललास!)


प्रावा
 हाहाहाहाहाहा क्या बात संदीप.....
(बघा - पटलं प्रा वा ला )


Arjun Deshpande -
 प्रणिता आली
बझवर बसली
कविता केली
खुदकन हसली
(आमच्याकडचे शेंडेफळ कु. प्रणीता बाई हिंगमिरे या आल्याचे चाहूल लागताच वरील ओळी सुचल्या)


सं. पा. 
गणू बाळ जाता गावी
बझ्झ ओसाड पडती
रडगाणे सोकावान्या
कोण अंगाई हि गाती
(कवितेत गणेश हा नायक आहे - सध्या गैरहजर होता. त्याची आठवण संपा ला झाली असावी)


Arjun Deshpande -
कवितेचा मैफिलीत या
अतुल राणे अवतरले
एक घाव घालूनी
खूप तुकडे सांडले
(ड्रामाटिक टच ) :-P


Arjun Deshpande -
समस्त उपस्थिती
श्रोतुत्वा दाखवती
काय समजायचे आम्ही
कि जेवण जीरविती ?
(अतुल च्या कवितेने सगळेच जण जरा मागून [backfoot वर]  खेळायला लागले)


प्रावा-
तुलाच का कवितेचा झालाय वांदा?
२ ओळी तरी टाक रे मंदा....
(पुन्हा मंदारचा उद्धार - बिचारा वाटतो कधीकधी! मंदार लगेच मूठभर मांस चढवू नकोस)


$neha. . -
कविता तुमची म्हणजे जेवणानंतर ची मुखशुद्धी.... @ अर्जुन
(मला मिळालेल्या सगळ्यात मोठ्या शुभेच्छापैकी एक)


सं. पा. 
 काल मी जेवता जेवता
एक कविता चावली
म्हटले लक्ष कुठे
जोरात ती किंचाळली


Arjun Deshpande -
मुखशुद्धी जरी ती
मुखातूनी ती जाओनी 
पोटामध्ये ती टाकली
कि कोपर्यात पीचकारली?
@स्नेहा
(अजून शुभेच्छा पाहिजेत या अपेक्षेने)


प्राची वाडेकर -
- वाह रे अर्जुना.. बहोत खूब.... सांग ग स्नेहा आता...
(निवेदक पेटले आहेत)

 सं. पा. 
कोण चावले कळले नाही
कविता मला, कि मी कवितेला
दात पण माझे आणि कविता पण माझी
दुखायचे काय ते दुखले मला
(दात चावले का संपा तुला?)

 अतुल 
 @वैशाली ,
कवितेच्या राज्यात फेरफटका मारून घेऊ ..
त्याचं निम्मित्ताने म्हटलं तुला थोडं छेडून घेऊ ..!
(आवरा! - दर्जा खूप घसरला एकदम, कुठून सुरुवात केली होती - कुठे आला!)


$neha. . -
माफ करा आम्हाला
आम्ही आहोत गांधीवादी.....
एवढ्या सुंदर काव्याला फुलांची गादी.....


Arjun Deshpande -
क्या बात * ३
(गांधी पान खायचे नाहीत काय? - नवीन माहिती! असो तरी मी माझी प्रतिक्रिया दिलीच लगेच)
जुग जुग जियो स्नेहा!


सं. पा. -
 एक अतुल राणे
म्हणे वैशालीशी बोलणार नाही
बझ्झ वर मैफल जमता
वैशालीपुढे याचे काही चालणार नाही
(असंच असतं! - सुज्ञ वाचक . . . इत्यादी इत्यादी)


mandar deshpande - ळा.......


तीच वय होत सोळा......
आणि स्वभाव होता भोळा....


तिच्या पाठी गाव व्हायचा गोळा....
तिने सगळ्यांच्या हृदयाचा केला होता चोळा मोळा....


ती जात असे शाळा...
म्हणून मुलांचा व्हायचा रोज पोळा.....


ती रोज खायची वाळा....
म्हणून होता रंग तिचा काळा .....
(बहुतेक दिवसभर 'माठ्याकूट' करून मंदार ने अखेरीस महाकाव्य रचले. पण मळा, गळा, पिवळा, निळा, बावळा आणि अगदीच ळा'कारान्त शब्द राहिलेच कि! ठीके मंदार पुढच्या वेळेस.) 


प्राची वाडेकर -
१ नंबर...... मंदार ने येऊन सुतळी बॉम्बच टाकला डायरेक्ट ..... भारी रे मंदार.......
(मंदार पेक्षा प्राची ला जास्त आनंद झाला दिसतो - निवेदक, आयोजक न शेवटी)


अतुल राणे -
सगळ्यांच्या डोक्यात चालली आहे कवितेची setting ,
मी जातो माझी आहे directorshi meeting ...!
(भाषा बदल!. . निषेध असो!)


सं. पा. -
 कसा रे मंदार
काय तिचे वर्णन
शब्दांनी केले
तिचे याने दितर्जंत


Arjun Deshpande -
मीटिंग कर मीटिंग मध्ये बोल नीट
नाहीतर बॉसला कविता ऐकवून ऐकवून
त्य्लला आणशील कवितेचा वीट


 प्राची वाडेकर -
वीट नको झीट म्हण... भारी वाटेल...
(बरोबर आहे - पटले - पुढच्या वेळेस झीट शब्द नक्की लक्षात राहणार)


mandar deshpande -
मीटिंग मध्ये बोस साठी ठेव सीत,
नाहीतर बोस ला येईल फीत.....
(ठीके. परिस्थिती नियंत्रणा बाहेर जाण्याच्या आत आवरा तिला)


सं. पा. -
 कवितेच्या जंगलात
खूप चुकले वाटा
आता इथेच होती
कुठे गेली प्रणिता


प्रावा-
वैशू वैशू नको न जाऊ..
तुझ्याशिवाय आम्ही इथे आता कसे राहू?


Arjun Deshpande -
प्रणीता पोस्टा मध्ये आहे कि कुठे भरकटली
ये ग लवकर प्रणीता बाई वैशू-जागा रिक्त राहिली
(वैशू गेली - एक खुर्ची सुन्न झाली. तुम्हाला काहीच फरक नाही पडते म्हणा!)


$neha. . -
खूप झाल्या कविता
आणि खूप झाल्या चारोळ्या
काम करा जरा
नाही तर ऑफिस चा काढला दिवाळा
(बहुतेक म्यानेजर असेल ही तिच्या हाफिसात)


सं. पा. -
 जाण्याची सगळ्यांना
झाली आहे घाई
मिटिंग चे निमित्त
सटकली वैशाली ताई


सं. पा. -
 स्नेहाला आलाय
कामाचा पुळका
हळूहळू करून
कमी होतोय घोळका
(हा नक्की मिडल म्यानेजमेंट मधला असेल)


अतुल -
T L ला म्हण , वैशाली ,
माझा भाऊ ब्रूस ली ,
घाबरून राहील तुला ,
त्याची होऊन जाईल पिवली ......


प्रावा -
तू पण टाक प्रणिता....... (ज्येष्ठ भगिनीने लहान्गीला आदेश दिला)


Arjun Deshpande -
पांगा पांग झाली
जाहल्या खुर्च्या सुन्या
प्रश्न एक पडिला मला
कि या कोणी उचलायच्या?
(लास्ट चार वेळा मीच उचलल्या - या वेळी मी नाही!)


सं. पा. -
 प्रणिताला पाहिजे
काहीतरी नॉर्मल
आज आहे शुक्रवार
भेटेल कुठे फॉर्मल
(कोणाचे काय तर कोणाचे काय)
सं. पा. -
 प्रणिताला म्हणावं
काहीतरी टाकायचं
नुसती वाहवा करून
आज नाही भागायचं


प्रावा -
प्रणिता मंदारला हि आम्ही
लावले इथे टाकायला..
तुही ऐक आमचे
नाहीतर मिळायचे नाही जायला.....


Arjun Deshpande -
होती पहिल्या पासुनी  
अशीच गत सर्वांची  
वाचुनी आणि 'वाचुनी' 
झाले सगळे भावी कवी!

 
सं. पा. 
- मैफिलीत आज या
खूप कवी मिळाले
म्हणे वैशालीला काम होते
पण बाकीचे का पळाले
(संपा पुन्हा पुन्हा कृतकृत्य होतोय)


Pranita  -
काय बोलू मी? काय लिहू मी?माझच मला समजत नाही...
तुम्च्य्सारखे कवी असतील तर आमची काही खैर नाही...
(नवोदित चेहरा लाभलेला आहे. पहिल्या ओळी पडल्या. टाळ्यांचा कडकडाट)


प्रावा -
सकाळ पासून कोणी कामच नाही केले
वैशू ने सुरुवात केली...बाकीच्यांनी अनुसरले....


सं. पा. 
अर्जुनाने सुरुवात केली
प्रतिसाद त्याला मी दिला
वेळ फक्त बोलण्याची
आज प्रत्येक येथे कवीच होता


Pranita -
तुम्ही आहात great तुम्ही आहात भारी
आमच काय आम्ही नुसतेच स्वैराचारी...


Arjun Deshpande -
अरे आज चिंता सोडली
आज वार शुक्राचा
फक्त मिळतो पगार म्हणूनी
लाविली आज हजेरी
(वरच्या म्यानेजमेंट च्या लोकांपुढे बंद पुकारले)

सं. पा. 
स्वैराचारी होतो आम्हीही
जागा आम्हाला समजली
तुलाही सुचेल कविता
जशी आम्हाला उमगली


Pranita  -
सुचायला काय काहीही सुचते...
सुचायला काय काहीही सुचते...
बघायला विसरू नका
खुपते तिथे गुप्ते....
(हि बहुतेक खूप टीव्ही बघ्ते! - अरे वा यमक पण जुळले!)


प्रावा - वाह वाह वाह वाह
(ही प्रशंसा नसून निवेदक, तोंडाचा आवाज करत लाडू खात आहेत.)


$neha. . - geli ka ti
aana uchlun tila
shiksha mhanun
4 - 5 kavita karayla lava
(एक मिनिट. हे पद्य आहे कि गद्य?)


$neha. . -
 kam aahe mhanun
atul palala hota
lage raho mhanayla
aala shana motha...


सं. पा. 
आहे जरी कुरूप मी
मज भाग्य सृजनाचे
सृजनात लाभती मजला
फुल पंख पंकुडीचे


सं. पा. 
स्वच्छंद मी फिरेन
ज्या त्या नव्या फुलावर
सृष्टीतल्या सुखाची
धुंदी असेल माझ्यावर
(संपा फुल फॉर्म - ४)


अतुल राणे -
mi nahi shana ,motha mi nahi ,
snehala suchatay ugich kahi bahi ..!


सं. पा. 
वारा छळेल मजला
छेडून पंख माझे
नाजूकतेचे माझ्या
करुनी कौतुक जरासे


सं. पा. 
आहे जरी कुरूप मी  
मज भाग्य सृजनाचे

सृजनात लाभती मजला

फुल पंख पंकुडीचे


अतुल राणे -
सृजना ?? म्हणजे 


सं. पा. - सृजन म्हणजे नवजीवन
(चला. यातून काहीतरी शिकायला मिळाले!)


Kapil Jain -
aahe apeksha mala
aankhi tujhya wapas yenyachi
jeevan jeevanasarakh jagnyachi
aani afaat prem karnyachi


सं. पा.  -
नुसता येत नाही .. तर कविताही येते करता.


Kapil Jain -
boli aamachi may Marathi
Dharma aamacha aahe Marathi


jau jikade aamhi
gun gau tujhe Marathi


प्रावा -
आजची शेवटची.....
आज आहे शुक्रवार
आला आहे चहा...
मी परत येईपर्यंत...
माझी वात पहा....
(प्रिय वाचक, जर तुम्ही अजून शिल्लक असाल, तर तुम्ही पण आराम करा जरा - )


सं. पा.  -
कविता करून माझे
डोके भनभनाया लागले
का गेलो या वाटेला
माझेच मजला वाटले


सं. पा.  -
आज कोणीच शिल्लक नाही राहिला कविता करायचा ...


सं. पा.  -
आली आली भाग्यलक्ष्मी
कविता करायची झाली घाई



(संपा च्या स्टामिन्याला दाद द्यायला हवी, नुसता कविता मागून कविता पाडतोय! -)


अतुल राणे - .
सरतील शब्द सारे ,जेव्हा तुझे नि माझे ,
मौनात बोलण्याची बघ हीच वेळ आहे ....!


अतुल राणे -
सरतील शब्द सारे ,जेव्हा तुझे नि माझे ,
मौनात बोलण्याची बघ हीच वेळ आहे ....!


समजून घे तुला तू , मी कोण बापुडा ,
मज बोल लावण्याची बघ हीच वेळ आहे .....!

 Kapil Jain -
india ke bowling ka kya kehna
kaha hai ab Suresh Raina
(लढ तू!)

अतुल राणे - .
सरतील शब्द सारे ,जेव्हा तुझे नि माझे ,
मौनात बोलण्याची बघ हीच वेळ आहे ....!


समजून घे तुला तू , मी कोण बापुडा ,
मज बोल लावण्याची बघ हीच वेळ आहे .....!


घेऊन जा तुझे तू ,सारे सवंगडी ,
हा खेळ मोडण्याची बघ हीच वेळ आहे ...!
(साश्रू वगैरे नयनांनी बहुतेक) 

बहुतेक लाईट गेले अचानक. आधी सगळ्यांनी मिळून लावलेले दिवे कमी होते कि काय कोण जाणे,   म्हणून हा अचानक प्रकाश पडला! दिवसभर सातत्याने कविता पाडून पाडून सगळ्यांचीच डोकी जड झाली होती, कवीजनांना मनोभावे प्रणाम करून, सगळेच जण पुन्हा गद्यात बोलायला लागले. 
इतका वेळ तुम्ही हे सगळं झेललं या बद्दल आधी तुमचं अभिनंदन आणि मग हार्दिक आभार! :) 

Comments

Nivedita Raj said…
mastach rangali hoti apali kavya maifil
Anonymous said…
खरच कां रंगली होती तुमची मैफल ...मजा आली वाचतांना ... :)
Unknown said…
Thanks Nivedita! :)

दवबिंदू - हो खरेतर ४०० पेक्षा अधिक कविता पडल्या होत्या - पण आमच्या कडे सगळे जन लगेच डिलीट करतात. त्या वेळेस copy करायची राहिले. धन्यवाद. तुमच्या कमेंट ने हुरूप आला.

Popular posts from this blog

स्टैनली का डब्बा

स्टैनली का डब्बा हा चित्रपट पाहीला . .. आवडला . चित्रपटाच्या शेवटी एक नोटीस येते . " या चित्रपटाचे शूटींग विद्यार्थ्यांच्या खूप मधल्या सुट्ट्या ( रिसेस ) अ र्थात फ़ार वेळ खर्च न करता; एक वर्कशॊप म्हणून सुट्टीच्या दिवसातच म्हणजे फ़क्त एका वीकेंड मध्ये केले गेले आहे" . सध्याच्या व्यावसायीक सिनेमा मध्ये अश्या प्रकारचा चित्रपट बनवून लोकांपर्यंत पोहोचवायला एक धैर्य लागतं, अमोल गुप्तेचं हे धैर्य चित्रपट संपताना प्रेक्षकात त्यावेळेस एकदम जाणवतं . अमोल गुप्ते तसंच शाळा, शिक्षक-विद्यार्थी नाते, एका विद्यार्थ्याचीच प्रमुख व्यक्तिरेखा अश्यांमुळे साहजिकच आठवतो तो ’तारे जमिन पर’. दोन्ही चित्रपटातला विरोधाभास हा की स्टॆनली चुणचुणीत, स्वाभिमानी, हुशार आणि विद्यार्थीप्रिय मुलगा तर ’तारे जमिन पर’ मधला दर्शील हा एक डिसलेक्सिक त्यामुळे अभ्यासात मागे, एकटा पडलेला, कुणी न समजून घेतलेला मुलगा. तारे मध्ये शिक्षक-विद्यार्थी असं मैत्रीपूर्ण नातं आहे तर स्टॆनली मध्ये त्याच नात्यातील एक चढाओढ आहे. वास्तविक अमोल गुप्ते हा लहान मुलात व्यावसायिक संबंध असणारा माणूस . मतिमंद मुलांमध्ये तो गेली कित्य

जनता आणि अयोध्या

बाबरी मशीद चा निकाल म्हणता म्हणता येउन ठेपलाय. भरपूर ठिकाणी लोकांना निर्णयाबद्दल कुतूहल आहे. हिंदूचे चुकले कि मुस्लिमांचे, कोणाची बाजू नक्की खरी वगैरे; वादविवाद म्हणा किंवा चर्चा म्हणा त्या ऐकू येत आहेत. एकंदरीत १९९२ चे मुंबई bomb blasts, त्यानंतर एकामागून एक घडलेल्या अनेक तश्याच घटना म्हणजे गोधरा, गुजराथ दंगल, सतत उसळणारं मालेगाव - घडत राहिल्या आणि लोकांना त्याची सवय ही होत गेली. २६ नव्हेंबर इथे मुंबई पुन्हा एकदा याच वादातून पोळली गेली. एवढा सगळं होऊन सुद्धा काही लोकांची खुमखुमी काही जात नाहीए . मुळात त्यांना ही गोष्ट जाणवत कशी नाही कि तेच आपल्या हाताने स्वत: चे आयुष्य insecure बनवत आहेत. आज ते वाचले तर उद्या त्यांच्याच पुढल्या पिढीच्या जीवाला विरुद्ध  बाजूने धोका राहणारच आहे.    २७ तारखेची याचिका फेटाळली गेली, आणि दोन्ही बाजूंकडून खुलासे देण्यात आले की कोर्टाचा निर्णय सर्वमान्य असेल. तेव्हा एक गोष्ट डोक्यात आली - की कोर्टाने असा निर्णय दिला तर? वादग्रस्त जमिनीवर रामलल्ला, निर्मोही आखाडा आणि मुस्लीम अत्युच्च संस्था वक्फ या तिघांचाही भारतीय म्हणून हक्क आहे, त्यामुळे तिथे मंदिर क

पानवाला आणि पान

पान ही आपल्या देशाला लाभलेली एक सांस्कृतिक देणगी आहे . नीट पाहिलं, तर आपल्या पुराणातच कितीतरी ठिकाणी तांबूल - भक्षण करणारे सूर - असुर सापडतील . आजही नैवेद्या बरोबर विडा द्यायची पद्धत आहेच की . यावरून आठवलं , लहानपणी मी माहूरच्या देवीच्या दर्शनासाठी गेलो होतो . तिथे देवीच्या तोंडात विडा ठेवण्याची पद्धत आहे . तो विडा काढला कि गरम झालेला असतो असंही म्हणतात . आता हा श्रद्धाश्रद्धेचा भाग झाला , पण मुखातला विडा परत काढावाच कशाला ? असा रास्त प्रश्न मला आता पडतो. सांगायचा उद्देश एवढाच की विड्याची ही परंपरा पुष्कळ जुनी आहे . मराठी व्याकरणातही सुपारी देणे , विडा उचलणे असे काही अजूनही येणारे वाकप्रचार आहेत की . दत्तप्रबोधामध्येही पानाची तमोगुणी अशी उपमा आहे . त्यात म्हंटले आहे की , कीर्तनी तांबूल भक्षण । तें रजस्वलेचें शोणित जाण । कागजन्म तयालागून । करी भक्षण नरक मांस . त्यामुळे आपल्या संस्कृतीमध्ये पान जेवढे जुने तेवढेच पिचकारी मारणारे थुंक - संप्रदायी ही जुनेच आहेत हे कळून च