'यळकोट यळकोट जय मल्हार' - देवदीपवलीच्या दिवसात सतत मुखात येणारा आणि कानावर पडणारा हा नारा. असंच विचार मनात आला, आपण 'यळकोट यळकोट म्हणतो पण त्याचा अर्थ काय असेल? आणि त्या शब्दाचा उगम कुठून झाला असेल?
त्या पैकी मल्हारी - म्हणजे मल्ल नावाचा राक्षस आणि संकृतात अरी म्हणजे शत्रू - म्हणजे शालेय संस्कृतात फोड करून सांगायचे झाले तर मल्लाचा शत्रू आहे असा तो - मल्लारी याच शब्दाचा उलगडा झाला होता. घरातल्या आरती मध्ये 'मल्लासूर दैत्य प्रबळीत झाला - त्रिभुवनी त्याने प्र लय मांडला' अशी एक ओळ आहे त्यावरून तो अंदाज आधीच बांधला होता.
असंच एक तेलुगु मित्र भेटला, बोलण्या बोलण्यात कळले की त्याच कुलदैवत (family deity) surprisingly मल्लाना' असे होते. पुढे हेही स्पष्ट झाले की 'मल्लाना' आणि 'मल्हारी' हे म्हणजे खन्डोबाचीच नावे. तिकडे ट्यूब पेटली की आपल्या इकडे ज्योतिबाच्या नावाने चांग भलं असं जसं म्हणतात ना- तसं आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्रात असलेल्या खंडोबाला - 'यळकोट यळकोट म्हणत असतील. थोडक्यात यळकोट चा अर्थ चांग भलं च्या जवळपास असेल, आणि तेलुगु भाषेशी संबंधीत असेल.
सगळंच अध्याहृत आहे, पण ओबडधोबड निष्कर्षाला पोहोचलो असं कुठे तरी नक्की जाणवत आहे. :)
Comments