Skip to main content

मुन्नी कि शीला?

दबंग आला, चालला आणि गेला. आता तीस मार खान येत आहे. कदाचित तोही चालेल आणि जाईल, पण दोन्ही चित्रपटांना जोडणारा एक दुवा आहे. तो म्हणजे त्यातील आयटेम सॉंग! कदाचित या दोन्ही गाण्यांची प्रदर्शन होण्याची तारीख इतकी एका पाठोपाठ होती त्यामुळेच लोक त्यांची तुलना करू लागले असतील. हा प्रश्न कुठून आला माहित नाही, पण बर्याचदा  मुन्नी श्रेष्ट कि आता येउ घातलेली शीला श्रेष्ठ याची लाळ गाळत लोक  चर्चा लुटतात. (माझ्या मते फारा खान चा हा स्टंट असू शकेल कारण दोन्ही गाणी तिनीच नृत्यदिग्दर्शित केली आहेत.) 


माझ्यासाठी हा प्रश्नच अवैध आहे म्हणा. खरतर दोन्हीची तुलना होऊच शकत नाही कारण मुन्नी ला त्याच्या  सेट मुळे, त्याच्या मधलं 'डार-लिंग' या शब्दामुळे आणि नाचाच्या स्टेप्स मुळे त्याला अगदी देशी फील आहे, तर शीला म्हणजे पूर्णपणे अमेरीकानाईस्ड आहे, त्यातले अर्धे शब्द पहिल्यांदा ऐकताना कळतही नाहीत, नाच लक्षातही राहत नाही.


मुन्नीचे सामर्थ्य म्हणजे मलाईका काकू, शिवाय गाण्याच्या अर्ध्या भागात सलमानचा धुमाकूळ, लोकांना कळेल अशी भाषा, लोकांना नाचता येईल असा नाच.

दुसऱ्या  या बाजूला शीलाचे एकमेव सामर्थ्य म्हणजे कत्रिना कैफ. मधल्या काळात सॉलिड मेहनत करून ती चांगलीच बारीक झालेली आहे हे 'स्पष्ट' पणे दिसते. :) एखादीने आपल्या  कल्पनाशक्तीच्या  पलीकडे किती परफेक्ट दिसावं याचं 'सुरेख - सुंदर' उदाहरण म्हणजे साक्षात ती. नेहमी  पेक्षा  वेगळी  एनर्जी  तिने शीला मध्ये दाखवली आहे हे जाणवतच आणि त्यामुळेच  ते  गाणं  एकदम  भावत.  पण एकंदरीत संगीत वगैरे गोष्टी पाहिल्या तर शीला भारतीय जनतेला किती पचनी पडेल याची शंकाच आहे.


विषयाची सुरुवात विषय डीबेटेबल नाही असं म्हणून केली याची जाणीव आहे, तरी  मलाईका आणि कतरिना (आणि झालाच तर फारा) यांचा मान राखून जर मी मुन्नीलाच निवडणार हे (तुम्हा हुशार वाचकाना!) समजलेच असेल.  त्याचवेळेस एवढाही महत्वाचा मुद्दा मी नमूद  करतो कि याच वेळेस टीव्ही वर नाचत असणारी लूज टाय घातलेली  न्यूयोर्क मधली 'शीला' ही मी नजरेतून सोडू शकणार नाही हेही आहेच. :)              

Comments

sanjay bhonge said…
tumache assessment agadi barobar aahe.
Unknown said…
धन्यवाद . . . संजयजी!

Popular posts from this blog

गाडी सुरु करणे : भौतिकशास्त्र :)

वाहतूकीच्या जगात तुम्ही थोडेफार सक्रीय असाल तर अशी (नाट्यमय ) अवस्था डोळ्यासमोर आणावयास अजिबात कठीण नाही. तुम्ही दुचाकी वर आहात, आणि लाल सिग्नल आहे म्हणून तुमची दुचाकी बंद करून चौकात बर्‍यापैकी पुढे थांबले आहात. तुमच्या आजूबाजूला चार पाच दुचाक्या,  पाठीमागे एक बस आणि बसच्या मागे डुकरांच्या मागे जशी  पिलावळ असते त्या पद्धतीत दहा-पंधरा दुचाक्या गर्दीत उभ्या आहेत. सिग्नलचा दिवा लालचा हिरवा होताच तुम्ही दुचाकीला किक् मारता, पण दुचाकी तुम्हाला काहीच प्रतिसाद देत नाहीए, मग तुम्ही धडपड करायला लागता आणि तुमच्या मागच्या गाड्या जोरजोरात हॉर्न वाजवून वेळप्रसंगी तुमच्या आई वडीलांचा उद्धार करून 'कचकचून' निषेध नोंदवला जात आहे. दु:स्वप्नच ना? असा हा विचार मनात आला आणि म्हणालो गाडी का सुरू होत नाही याचं कारण बघुया. वास्तविक गाडी सुरु का होत नाही याचा विचार करण्यासाठी मुळात ती कशी सुरु होते हे समजणे  महत्वाचे आहे. त्यातूनही मुलभूत अश्या  गाडीच्या  इंजिनाचा विचार करणे जास्त समर्पक वाटते. जे काही तुटक ज्ञान आहे ते मी इकडे पाजळायचा प्रयत्न चालवणा...

सीबिस्किट

ही एक उत्क्रुष्ट कलाक्रुती पाहण्याचा योग आला. चित्रपटाचे पुढील चार भागात तुकडे पाडले आहेत. सिनेमाच्या पुस्तकातले हे चार वेगवेगळे धडे आहेत असं म्हंटलं तरी काही हरकत नाही. भाग एक - हॊवर्ड कारच्या खरेदी-विक्रीचा याचा व्यवसाय. अपघातात तो आधी त्याचा मुलगा आणि नंतर त्याच्या पत्नीला गमावतो. तसा यशस्वी पण सर्वस्व गमावल्याने खचलेला, कशात काही मन लागत नाही असा.  घोड्यांची पैदास करून शर्यतीचे घोडे वाढवण्याची त्याची इच्छा असते. त्याच्या या धंद्या निमित्ताने  फ़िरत असतानाच त्याला एक स्त्री भेटते आणि दोघांचे लग्नही होते. पुढे एके दिवशी घोड्यांच्या तबेल्यात त्याला स्मिथ नावाचा म्हातारा भेटतो. तो म्हातारा एका घोड्याबरोबर माळरानावर राहत असतो. त्याचा सध्याचा घोडा पुर्वी जायबंदी झालेला असतो त्यामुळे त्याला त्याचा मालक गोळी घालत असताना या म्हातार्या स्मिथनी  वाचवलेला असतो. स्मिथ या प्रसंगी गप्पा मारत असताना हॊवर्ड ला म्हणतो, "You dont throw away your ...

बालगंधर्व

  नारायण श्रीपाद राजहंस. मराठी संस्कृतीला लाभलेली एक विभुती. ’नाट्यसंगीत’ हा प्रकार रुजवणारा, त्याचं बीज मोठं करणारे हा एक गुणी कलावंत. नाट्यसंगीतासाठी या मनुष्यानी अवघं आयुष्य वेचलं. इतकं की सध्याच्या माझ्या पिढीला मराठी संस्कृती आधी की नाट्यसंगीत आधी? असा प्रश्न पडेल. नितिन देसाईक्रुत ’ बालगंधर्व ’ चित्रपट पडद्यावर आला आणि ते हल्लीच घरोघरी पोहोचले, पण जुन्या जाणत्यांना, ज्यांनी त्यांचं गाणं ऐकलं आहे, त्यांनाच खरंतर त्या चित्रपटावर भाष्य करायचा अधिकार आहे असं मला स्पष्टपणे वाटतं. गायकी हा बालगंधर्व ांचा गाभा आहे. त्यामुळे मी अंदाज लावू शकतो, की बाकी सगळं जे आहे ते उत्क्रुष्टपणे दाखवले गेले असेल, त्यामुळे तो अनुभव अर्थात छान आहे. अन म्हणूनच फ़क्त माहितीपट म्हणून तो चांगला आहे. असो. त्यांचा काळ अदमासे शंभर वर्षांपूर्वीचा, पण बालगं धर्वांच्या सुरांमुळेच की काय सगळ्यांनी बालगंधर्व अजूनही मनामध्ये जपला आहे. याबद्दल पुलं म्हणाले होते की, आमच्या उमेदीच्या काळात बालगंधर्व ांचे गाणे ऐकताना आम्ही ज्या ज्या जागांवर जश्या पद्धतीनी दाद दिल्या आहेत, त्याच जाग...