सांस्कृतिक शहर, महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी अशी बिरुदे मिरवणारे आपलं पुणं आज पोरकं झालं. पुण्याला खूप वरच्या आणि आदराच्या स्थानाला पोहोचवणारा कला क्षेत्रातील 'वडील' माणूस आज अनंतात विलीन झाला.
स्वत:चे सबंध आयुष्य या तानसेनाने संगीत साधनेसाठी अर्पण केले. अश्या शिष्याकडे पाहून विनायकबुवा, भक्त मल्होत्रा, सवाईगंधर्व यांसारखे गुरुजन स्वर्गामध्ये किती भरून पावले असतील!
असा शिष्य, असा नेता, असा कौसी कानडा, असा तेजस्वी आकार, असा मेघ मल्हार, अशी संगीताची मांडणी, त्यांच्या स्वरसादामार्फत श्रोत्याना मिळणारी - 'ईश्वर आहे आणि तो समोर गातो आहे' अशी मिळणारी दैवी अनुभूती, असे अजरामर तुकोबाचे अभंग त्यातले तुकोबांचे भाव पुन्हा ऐकणे, अनुभवणे पुन्हा कधीच न होणे.
पंडितजींचे गायन खूप जवळून 'अनुभवता' आले, त्यांच्या काळात मी झालो याबद्दल ईश्वरचरणी नतमस्तक होतो. त्यांनी एवढ सगळं दिलं, ऐकवलं, संगीत प्रसारकाची महोत्सवाची परंपरा सुरु केली या बद्दल मी त्यांचा शतश: ऋणी राहीन. त्याबद्दलची कृतज्ञता मी कशी व्यक्त करावी हे माझ्या आकलन शक्तीच्या बाहेर आहे.
या स्वरभास्करास, या 'बाप' माणसास ओलसर पापण्यांनी, शहारलेल्या अंगाने, खूप खोलवर रुतलेल्या हृदयाने आणि अडकलेल्या श्वासाने त्यांच्याच भावपूर्ण भैरवीने श्रद्धांजली वाहतो!
जो भजे 'सूर' को सदा|

सो ही परम पद पावेगा|
Comments