Skip to main content

- देवबाप्पाकडे प्रार्थना -

५१ वे शतक पाहून अखेरीस केवळ दैवी अश्या प्रखर तेजापुढे मस्तक नेहमीसारखेच  आपोआप झुकले. १९८९ पासून किती नास्तिक लोकांना या अवताराने आस्तिक बनवले आहे - देव (तोच) जाणे!


सचिन हा विषय ब्लॉगसाठी घेणे मी कायमच टाळतो, पण आज हे वरील वाक्य लिहिताना मोह आवरला नाही, आणि हे छोटेसे साकडे एकदम संगणकाच्या पडद्यावर अवतरले.   


देवबाप्पा,


ओम सच्चीदानंदाय नम:!

माझ्या बालपणात ते तरुणपणापर्यंत तुम्ही क्रिकेट जगतात अवतरलात याबद्दल मी कृतज्ञता तुमच्याकडे कशी व्यक्त करू कळतच नाही.  एवढे मात्र आहे कि जर तुम्ही प्रसन्न झालात आणि समोर प्रकटलात तर तुम्हाला मी कडकडून मिठी मात्र नक्कीच मारणार आहे.


तुमची शतके बघता बघता उपभोगाच्या नशेत अडकलेला मी, तुम्हाकडे फक्त एवढीच अजून मागणी करतो कि आता शतकांच्या शतकपूर्ततेसाठी उरलेली तीन शतकेही लवकर पूर्ण होऊन्देत. विश्वकरंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात शतकांचा हा होऊ घातलेला हिरकमहोत्सव पूर्ण करा असंच साकडं मी पूर्ण भक्तिभावनेने तुम्हाकडेच  घालतो. 


विश्वकरंडक उंचावणारा धोनी तसेच धावांच्या आणि विक्रमांच्या अत्युच्च शिखरावर विराजमान झालेले  विक्रमादित्य असे साक्षात तुम्ही हा देखावा बघून  माझ्यासारख्याच य:कश्चित १०० कोटी जनतेला मोक्ष मिळाल्याचा आनंद होईल याची तुम्हालाही कल्पना आहेच. शेवटी काय आहे सांप्रत जगात भरडले जाणारे आम्ही सर्व;  अश्याच चांगल्या क्षणांच्या अनुभवाच्या इंधनावर जगत आलो आहोत.    

तुमच्यापुढे अजून जास्त बोलण्याची गुस्ताखी मी करत नाही, तेवढी खरतर कोणाचीच पात्रता नाही. त्यामुळे मी इथेच मन: आणि भक्तीपूर्वक माझे बोलणे थांबवतो.



ओम सच्चीदानंदाय नम:!




तुमचा परम भक्त, शिष्य, साधक आणि त्यामुळे सचिन-संप्रदाय-अनुगामी,
अर्जुन व. देशपांडे  

Comments

wah farach chhan..... || Om Sachinayan Mah: ||
Unknown said…
वाह!!!!!!!!!!! वाह!!!!!!!!!!! वाह!!!!!!!!!!! वाह!!!!!!!!!!! खूप सुंदर आहे.


शेवटी अर्जुनाच्या शब्दांचा बाण हो
Unknown said…
dhnyawaad indradhanu. blog war welcome ranaangan.
Unknown said…
wah wah... farach chaan :)
ओम सच्चीदानंदाय नम:! :):):):)
VIjay Kudal said…
asach lihit raha