फुटके नशीब किंवा कपाळ करंटेपणा हा वैयक्तिक नसतो - तसा जागतिकच असतो. कालच एका वन वे बोळातून मोटारीतून जात असताना अचानक समोर बस आली - पर्याय नसल्याने मला पुढची मार्गक्रमणा बस मागून करावी लागणार होती. पुढचा दहा मिनिटांचा प्रवास हा आता बस मागोमाग करावा लागणार, शिवाय बस थांब्यावर दर दोन मिनिटांनी बस बरोबर वाट पाहत थांबावे लागणार या कल्पनेने मी म्हणालो, "काय फुटकं नशीब आहे - आपल्याच बाबतीत असे कायम घडते!"
फुटकं नशीब असा म्हंटल्याबरोबर गौतम बुद्धाची नशिबाची व्याख्या आठवली. तो म्हणाला होता - सखोल ज्ञान आणि तशीच कुशलता असणे, शिवाय सुशिक्षित असूनही चांगली भाषा असणे म्हणजे नशीब. आता ही व्याख्या बसच्या मागून निर्विकारपणे गाडी चालवताना कुठे लागू होते हे माझ्या कळण्याच्या बाहेर होते.
यथावकाश जिथे - ज्या कार्यक्रमला पोचलो, तिथे एक हल्लीच पुण्यात शिफ्ट झालेला मित्र भेटला, तो त्याच रस्त्यांनी आला होता. त्याच निमुळत्या रस्त्यावर माझ्यासारखीच त्याच्या मोटारीपुढेही अचानक बस आली होती आणि शिवाय मागेही; भरीस भर म्हणून त्या गल्लीत एक मोटारसायकलवाला त्याच्या शेजारून गाडी चालवत गिचमिड वाढवत होता. इतक्या सगळीकडे बघत बघत जात असल्यामुळे पुण्यामध्ये नवीन असलेला तो रस्ता मात्र चुकला नाही आणि व्यवस्थित वेळेत कार्यक्रमाला हजर झाला.
मनातल्या मनात बुद्धा सारखीच नशिबाची व्याख्या माझ्यापरीने मी लगेच तयार केली - नशीब म्हणजे रस्त्यावरून हळू हळू जाणे, कारण रस्ता चुकायचे भय तुम्हाला त्यामुळे राहत नाही. :)
हल्लीचे जग, प्रत्येकाचे आयुष्य इतके स्पर्धात्मक झाले आहे नं, कि प्रत्येकजण नुसता पळत असतो. बऱ्याचदा मार्गात अडथळे येतातच, आणि असे कि त्यांच्यापुढे कुणीच काही करू शकत नाही. तुम्हाला बळेच सावकाश जावे लागते. आयुष्यात अश्या सावकाश जाण्याने जरी तुम्ही स्वत:ला कमनशिबी म्हणवून घेतले तरी त्यामुळे तुमच्या हातून चुका होण्याची शक्यता खूपच कमी असणार आहे हा फायदाही होतो.
आयुष्याच्या बाबतीत हे किती समर्पक आहे याचा असा विचार झाल्याने स्वतःची हि कल्पना स्वतःलाच आवडली. अश्याच कुठल्या ना कुठल्या विचारात परतीचा रस्ताही धरला.

Comments