प्रेमविवाह करायची इच्छा होती (म्हणजे आहे) पण आता तशी आशा सोडून दिल्यातच जमा आहे. पुष्कळ वेळा प्रयत्न झाले, पण दुर्दैवाने (की माझ्या सुदैवाने ते माहित नाही) तडीस मिळवू शकलो नाही. :-D
आता काय झालंय, एका वयात स्वत:च्या आवडी निवडींबद्दल आपण इतके निगरगट्ट होतो आणि जशी हवी तशी मुलगी मिळणे आणि मिळालीच तर प्रेम होऊन लग्न होणे एकंदरीतच अवघड आहे हे साहजिकच त्यामुळे जाणवायला लागते. लोकांनाही घाई होते, आणि सतत कानावर ही आणि असली वाक्ये ऐकू येतात -
'आता काय विचार आहे? करून टाक लग्न.' - (कुणीतरी, काका मामा खूप considerate मूड मध्ये असताना),
'तुला काय problem आहे कळत नाही, कर ना लग्न?' - विवाहित मित्र आणि त्यांच्या बायका कोरस मध्ये'.'
'गाढवा, असेल कुणी घोडी तर आण - दाखव मला, घराची गरज काय आहे, कळतंय की नाही?' - इति परमपूज्य - डायरेक्ट तबेल्याचा ambience तयार करतात.
'अरे तुझा बायोडाटा बनव ना आणि दे मला . . .पत्रिके बरोबर दे, किती वेळा सांगितलं! काय तू; इतक्या मैत्रिणीपैकी एकाशी देखील नाही जमवू शकला!' - लग्न होऊन ५ वर्षांपूर्वीच सासरी गेलेलं बहीण नावाचं माझं सख्ख भावंड.
'मी कोण आलीये सांगणारी? शेवटी तू ठरवायचं लग्न कधी करायचं. पण आत्तापासून पाहायला लागलास तर वेळेत होईल बघ, जेव्हा तयार असशील तेव्हा सांग, आहेत माझ्याकडे तीन - चार स्थळ' - कुणीतरी प्रेमळ काकू, मोस्टली शेजारच्या किंवा मित्रांच्या आया.
मध्ये एकदा माझ्या एका मित्राने एक मुलगी पहिली. दोघेही चांगल्या गलेलठ्ठ पगारावर असणारे, मुलीनी काय प्रश्न विचारावा? - "लग्न झाल्यावर आपल्या पैश्यांच distribution कसं करणार?" - तुमच्या व्यवसायातला तो व्यावसायिकपणा तुमच्या आयुष्यात असा नकळतपणे कधी सामील होतो हे तुम्हाला कळतच नाही. लग्न करणं म्हणजे काय project management आहे का? आणि त्याची 'pre-inititation' मीटिंगसाठी तू आलीएस का? असं विचार असं काही सडेतोड बोलल्यामुळे येतोच.
अर्थात, तिने हे विचारणे चूक आहे का बरोबर हा मुद्दा नाही. पण, लग्न जुळलंही नाही अजून, आत्ताशी भेटतोय आणि आधीच असले प्रश्न विचारणे म्हणजे जरा जास्तच होते, नाही का?
असंच एका भावासाठी एका मुलीच्या आईचा फोन आला होता, मुलीची आई मुलीच्या 'अपेक्षा' सांगत असतात -
मुलीची आई - मुलाचं स्वत:चे घर आहे का?
मावशी - हो आहे.
मुलीची आई - २ बी एच के की ३ बी एच के की?
मावशी - नाही. १ बी एच के आहे, कोथरूड ला.
मुलीची आई - काय आहे, आमचं आयुष्यं गेल घराचे लोन फेडण्यात, नोकरी करण्यात. पण माझ्या मुलीचं पण असं होऊ नये, म्हणून विचारते - होम लोन वगैरे चालू आहे की नाही?
त्या काकूंच्या अपेक्षा अयोग्य आहेत असं नाही, पण या खवट काकूंना हे कळत नाहीये, आज त्यांनी १५ वर्ष हफ्ते भरल्यावर त्यांचं घर झालं, पण या सगळ्या प्रोसेस मध्ये त्यांनी जे कर्तुत्व मिळवलं, त्या कर्तुत्वाच समाधान त्यांच्या, पुण्यात प्रायव्हेट शाळेत बालवाडीला शिकवणाऱ्या मुलीला; सगळं आयतं मिळून प्राप्त होणार आहे का? हा विचारही त्यांनी करावा. सगळंच जर रेडी-मेड पाहिजे असेल, तर काही वर्षानी ती बिनकर्तुत्वाची बायको म्हणून संसारात ताटाखालची मांजरच होणार ही चूकही त्यांनी लक्षात घेतली पाहिजे.
तसंच आपली स्वतःची योग्यता काय आणि आपण स्वप्नं कसली पाहतो याचा मुलींनी आणि त्यांच्या पालकांनी थोडातरी विचार करावा. हल्ली मुलगी असते बीए किंवा बीएस्सी आणि त्यांना मुलगा हवा असतो एम्बीबीएस, सीए, बीइ, आयसीडब्लूए, एम टेक वगैरे. पुन्हा म्हणतो, अपेक्षा चूक आहेत असं मी अजिबात म्हणत नाही, पण हे सगळं असं लिहून त्या मुली (किंवा तिचे आई वडील) त्यांचेच स्वत:चे options कमी करत आहेत असं त्यांना वाटत नाही का? उच्च शिक्षण म्हणजे ह्याच ठराविक वर लिहिलेल्या डिग्र्या शेवट असतात का? इतरही चांगले शिकलेली मुलं त्यामुळे 'आमची बात नश्य' होऊन आधीच दुर्लक्षित होतात. हे लक्षात घेणं मला तरी महत्वाचे वाटते.
अजून एक किस्सा सांगायचा झाला तर, एक मुलगी आणि आणि मुलाची आई यांचं चांगलं चीउचिऊ संभाषण चालू होतं, अचानक मुलीने तिच्या (होऊ घातलेल्या) सासूलाच प्रश्न केला - "घरात डस्ट बिन्स किती आहेत?" या प्रश्नावर नं कळल्यामुळे सासूने खुलासा विचारला असता, मुलगी म्हणाली डस्ट बिन्स म्हणजे म्हातारी माणसं! त्या बाईने कपाळावर हात मारून घेतला. अर्थात यात संस्काराचा भाग महत्वाचा झाला, पण सासू-सासरे नकोच, अश्या स्पेसीफिकली (मुलाकडून'अपेक्षा'!) असणाऱ्या मुलीही असतात.
"मी माझ्या आई बाबांपासून लांब राहणार मग तू का नाही राहू शकणार?"
मित्रांनो, जर तुम्हाला तुमच्या बायको, मैत्रीण इत्यादींनी नाक उडवत असा प्रश्न विचारला तर तिला, 'मी आलो माझं घर सोडून तुझ्या घरी तुझ्या आई बाबां बरोबर राहायला, तर ते तुला चालेल का? समज तू चालवून घेतलंस, तरी तुझ्या आई बाबांना चालेल का? " असा प्रतिप्रश्न विचारून मोकळे व्हा. :-)
मित्रांनो, जर तुम्हाला तुमच्या बायको, मैत्रीण इत्यादींनी नाक उडवत असा प्रश्न विचारला तर तिला, 'मी आलो माझं घर सोडून तुझ्या घरी तुझ्या आई बाबां बरोबर राहायला, तर ते तुला चालेल का? समज तू चालवून घेतलंस, तरी तुझ्या आई बाबांना चालेल का? " असा प्रतिप्रश्न विचारून मोकळे व्हा. :-)
हा सगळा किंवा या पेक्षा बराच जास्त विचार करून आता काही महिन्यात मी देखील असे अनुभव घ्यायची (मानसिक) तयारी करत आहे. पहिला अनुभव हा नक्कीच विनोदी असणारे यात शंका नाही, त्यामुळे इकडे तो नक्कीच शेअर करीन.
शेवटी काय आहे, वरच्यानी गाठी आधीच बांधून ठेवलेल्या असतात . . . . . . . . . नक्की कोणाशी? हे मात्र शोधायला तुम्हालाच लागतं.
Comments
Kalawe, asach lobh asawa! :-)