Apologies for my non-marathi followers!
अमेरिकेमधली सुप्रसिद्ध (का कुप्रसिद्ध?) सोशलाइट (गावभर हिंडणारी भोचक भवानी) प्यारीस हिल्टन हिचं तिच्या ख्याती प्रमाणेच वाक्य आहे, ती म्हणते, " प्रत्येक स्त्री जवळ तीन पाळीव प्राणी असणे अत्यावश्यक आहेत. पार्किंग मध्ये जग्वार, बेडरूम मध्ये वाघ आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ज्याच्या जीवावर कितीही पैसा खर्च करू शकू असा एक महागाढव! (कशी काय सुचतात अशी वाक्ये तीच जाणे!)
आपल्या देशी रस्त्यांवर आपण बरेचदा असे विविध प्रकारचे भटके आणि विमुक्त (क्वचित प्रसंगी पाळीव) प्राणीमित्र पाहतो.खूप वेळा मला असा प्रश्न पडतो की यांच्या डोक्यात नक्की काय चालले असेल? मध्ये एकदा एक गाढव पहिला. असाच कुठे तरी रस्त्याच्या मध्यभागी एखाद्या तपश्चर्येला उभे राहिले असल्या सारखा; किंबहुना कुणीतरी त्याला तश्याप्रकारे उभे राहायला सांगितल्याप्रमाणे ते निश्चल उभे होते...अगदी श्रीकृष्णाने अर्जुनला जी स्थितप्रज्ञाची लक्षणे सांगितली आहेत ना, तशीच 'ना सुख ना दु:ख, ना सोयर ना सुतक' च्या यौगिक पोज मध्ये उभे होते. त्या प्राणाच्या डोक्यात त्या पोज मध्ये असताना काय विचार चालू आहे हे जर मला कुणी पुराव्यानिशी सिद्ध करून दाखवलं ना तर मी त्याचा जाहीर सत्कार करीन हे मी वचन देतो. अरे किती मख्ख असावे एखाद्यानी! मख्खपणाचा कहर झाला म्हणजे. बहुदा अश्या अवस्थेत ते मेंदू बंद करीत असावे.
अजून एक असंच उदाहरण द्यायचं झालं तर आपला शहरातला हत्ती. आपले हे गजराज कुठे तरी पाने खात फांद्या उडवत डुलत डुलत चालले असतात . . अचानक त्याच गल्लीतल्या एका 'मवाली' कुत्र्याच्या टोळीला काय चीड येते समजत नाही, बहुदा त्यांना insecure वाटत असावे एवढं मोठा प्राणी पाहून. ही टोळी जी काय कान किटे पर्यंत हत्तीकडे पाहत भुंकायला लागते ना हे न सांगणे. मनुष्यप्राणी त्या सामुहिक भुंकण्याला एवढं वैतागतो तर खुद्द एवढे मोठे कान असलेला तो हत्ती इतक्या गोंगाटात मन:शांती कशी काय पाळू शकतो हा ही प्रश्न मला असे दृश्य पाहिल्यावर हमखास पडतो. ती कुत्रीच शेवटी घसा आटवून आटवून दमून जातात आणि थांबतात. तो पर्यंत तो हत्ती दूर गेला असतो. तेंवा अधून मधून उसने भुंकणे आणल्यासारखे एक सेकंदभर छोटेसे भुंकून निषेध, धमकी आणि आश्चर्य व्यक्त करीत असावीत. मोठं भांडण संपल्यावर शीतयुद्धा सारखं काही माणसं एकटेच स्वत:शीच तावातावानी बोलतात ना - '...अरे मला सांगतोय', 'काय समजतो कोण स्वत:ला', 'अरे गेलं खड्डयात' वगैरे तश्या प्रकारचं ते कुत्र्यांचं, हत्ती दूर गेल्यावरच एक छोटा 'भू:' असेल. आणि कुत्र्यांचा हा फट्टूपणा पहा ना, हा छोटा भू: 'मी किती भारी हत्तीला हुसकावला' या आवेशात करणार, हत्ती जवळ असेल तर मात्र घाबरत घाबरत भुंकत राहणार. पण या अश्या दुर्लक्ष करण्याच्या हत्तीच्या सवयीमुळे मला कायमच तो पापभीरू वाटत आलं आहे. बाकी त्या माहुताचे कौतुक कराव तेवढं कमीच आहे. हत्ती पाळणे आणि अश्या परिस्थिती मध्ये सुद्धा तो चालवणे ही काही सोप्पी गोष्ट नाहीये.
पाळीव उंट हा प्राणी मात्र मला बिचारा वाटतो. एक तर त्याचा चेहरा इतका बावळट असतो की विचारू नका, त्यातून त्याची सतत रवंथ करण्याची सवय. त्याची ती वेडी वाकडी तोंडं पाहून तो त्यांच्या धन्याप्रमाणेच राजस्थानी मवाळ भाषा बोलत असेल असं वाटतं. लहानपणी एकदा एक मोठ्ठा उंट मी नवीन स्कूटी शिकलेली असताना अकारण मागे लागला तेव्हापासून मी उंटापासून चार हात (किंवा चार चाक) दूरच असतो. अचानक पाउस पडायला लागल्यावर सिग्नल ला उभा असलेला उंट बिथरला आणि त्याच्या पुढे गाडीवर उभे राहिलेल्या माणसाच्या मागे लागला - तो माणूसही घाबरून एम एस ई बी च्या ऑफिस मध्ये गाडी घेउन गेला - आणि उंटही त्याच्या मागे येत त्याची मान पैसे भरायच्या खिडकीत कशी अडकवून बसला हा एक महान किस्सा अजूनही मला उंट दिसला की आठवतोच. त्यामुळे त्या प्राण्याबद्दल मला खात्री इल्ले! (इकडे अंगठा वर आणि डावी - उजवीकडे)
असाच एक स्वत:च्या विश्वात असणारा प्राणी म्हणजे मांजर. माझ्या आज्जीने तिच्या उभ्या आयुष्यात मांजराचा उल्लेख 'मांजरडे' या शिवाय वेगळा केला नाही. दुधा तुपाला महत्व असलेल्या त्या काळात या प्राण्याला माननीय संबोधन कुणी करेल ही अपेक्षाच चुकीची आहे नाही का! 'कुरवाळलं तर ठीके पण उगाच अपेक्षा करणार नाही ' हे मात्र ते दाखवून देईल. जेव्हा इच्छा असेल तेव्हा मात्र लाड करून घेईल. कधी कधी मांजरांना लाड अजीर्ण ही होतात आणि ते लाड जास्त झाले, तर मग मात्र रामपुरी चाकू सारखी मांजराची नखे कधी तुमच्या त्वचेवर सापक्कन ओरखडा आणतील याची शाश्वती नाही. त्या प्राण्याचे हे वागणे इतके स्वतंत्र असते ना की त्याला विचारावेसे वाटते की 'तुझ्या आयुष्यात माझी काही किंमत आहे का नाही?' कपाटावर चढून बसलेले किंवा घराजवळच्या दुसऱ्या एखाद्या बंगल्याच्या गच्चीत उंच ठिकाणावर बसलेले मांजर हे जणू काही स्वतःचे राज्य पाहत असलेल्या राजासारखे तोरा दाखवते. कधीतरी चुकून ओट्याजवळची खिडकी उघडी राहिली की मांजराच्या पंज्याचे ठसे पाहून, मांजर भरतनाट्यम चा सराव करत होती काय हा प्रश्न पडतो. टीव्हीच्या उबेत त्याला टेकून मुटकुळी करून आळसावलेले मांजर, जेव्हा तुम्ही आनंदानी म्हणता 'उद्या मला बोनस मिळणार' तर बरोब्बर त्या वेळेस मोठी जांभई देतं. तेव्हा वाटतं की 'कुणाचा काय तर कुणाचं काय' हा विचार ते करत असेल. ते ही असंच 'लोड नही लेनेका मामू!' या वर्गातला वाटतं. त्याचा एकंदरीत तणावमुक्त स्वभाव बघता एवढं मात्र नक्की आहे की त्या प्राण्याला कधीही ब्लड प्रेशर किंवा हृदयविकाराचा त्रास होणार नाही. त्रास ते करून घेतंच नाही कधी.
मित्राच्याकडे २ मांजरी होत्या . . ६ महिने एकत्र वाढल्या . . अचानक एकमेकांशी खेळत असता रस्ता ओलांडण्याच्या नादात एक मांजर गाडी खाली आली. दुसऱ्या मांजरांनी तिचे मृत शरीर पाहिले आणि नंतरचे ३ दिवस अस्वस्थ बसून बैचेनीत काढले. त्यानंतर मी मांजरांवर 'हा प्राणी आपमतलबी असतो' असा आरोप कधीच केला नाही.

Comments
:-D
Awroon ghetla . . pay pasarle nahit jasta!