Skip to main content

Gundacha Ganpati

गुंडाचा गणपती . . नाव मस्त आहे ना? 
कसब्या मध्ये काळे सुगंधी च्या चौकातून  लाल महालाच्या दिशेने आले असता उजवीकडे ही एक रस्ता हा गुंडाच्या गणपतीला जातो. 

कुठला ही फार प्राचीन गणेश मूर्तींना आणि तसच त्या मंदिरा मध्ये कसं खूप धीर-गंभीर आणि नो non-sence वातावरण असतं ना, असंच काहीसं पण थंडगार आणि प्रसन्न वातावरण या मंदिरात अनुभवायला  मिळेल. 

माझ्या वडिलांचे मामा, हे या गुंडाच्या गणपतीला लागून असलेल्या घरात राहायचे. आता ते राहिले नाहीत पण त्यांचे ते घर अजूनही आहे. कधी त्या मामा आजोबांकडे जाणे झाले; की तेव्हा गुंडाच्या गणपतीच्या देवळात आम्ही मुले खेळत असू. बरीच वर्षे लोटली, मंदिरात एखादा अभिषेक आणि महाप्रसाद आई - वडिलांच्या हस्ते झाला होता. तेव्हाच गेलो होतो. 

आज पेपर वाचताना अचानक ही बातमी पहिली आणि एकदम काही वर्षांपूर्वीचे ते मंदिर आणि आजूबाजूचा परिसर डोळ्या समोरून गेला आणि गम्मत वाटली! :-) 

निव्वळ मंदिर पाहण्यासाठी म्हणून आता त्या तिकडे अवश्य वाट मोडणे आलेच; तुम्हालाही जमले तर आवर्जून जा. 

Comments

Unknown said…
This comment has been removed by the author.
Unknown said…
copying and pasting a discussion happened in between me and my bro on the same topic on google buzz. I appreiciate his views and thought this would go here.

Mandar Upadhye - Halli sagalech ganapati gundaanchech zaale aahet! :(

Arjun Deshpande - Unfortunate but true. Halli ganpatichi wargani hi security fees ya gondas nawakhali gola keli jaat ahe. Janjagrutee war nahich tar speakers chya bhinti rachne ani daroo pioon dhingana ghalne ya palikde hi wargani kuthe waparli jaate asa mala watat nahi. Pun nishedh wyakta karoonahi kahi upayog nahie. Nusta nishedh karne he shandhachech lakshan ahe. Tyamule lets prepare ourself for this kind of growing disasters in near future.

Mandar Upadhye - True!
But one man protesting in bathroom is impotent protest. Whereas one man protesting publicly on blog, newspaper and 5000 other men (again publicly) agreeing with him is a different thing altogether. Lets not forget the power of democracy - the only "constitutional" power which we have.

Arjun Deshpande - The power of democracy - I don't think we have it. I feel in todays world protesting in bathroom and protesting over Internet is the same thing, its never going to be positively fruitful. But I think Internet can be used to spread the ''awareness''. It will be upto the people to decide what is good and what is wrong. Unfortunately, the sensible population of the city are in minority. But it surely can change . . by combined efforts of sensible people.

Mandar Upadhye - It can definitely change - it will take time; but it will change. The tragedy is that our education is so hopeless that most of us today don't believe in this power. Our education never stressed on this power of democracy that we have. That's why most of the urban "sensible" people don't vote and then gundas can get elected by distributing 500 Rs per head in slums.
The golden rule is: (1) Do your bit and (2) Spread it a bit :)

Arjun DeshpandeArjun Deshpande - Yeah! :-) India works somehow! . . .people make it work!

Mandar Upadhye - Some times I feel the age of giants is gone! We no more see the likes of Tilak, Agarkar, Ambedkar, Savarkar.
Now is the age of ants - the common men who collectively achieve big results.
So the state of affairs will be just as good (or bad) as the common man!
And that is why this country desperately needs a good, nationalistic education system!
Astu.

Popular posts from this blog

गाडी सुरु करणे : भौतिकशास्त्र :)

वाहतूकीच्या जगात तुम्ही थोडेफार सक्रीय असाल तर अशी (नाट्यमय ) अवस्था डोळ्यासमोर आणावयास अजिबात कठीण नाही. तुम्ही दुचाकी वर आहात, आणि लाल सिग्नल आहे म्हणून तुमची दुचाकी बंद करून चौकात बर्‍यापैकी पुढे थांबले आहात. तुमच्या आजूबाजूला चार पाच दुचाक्या,  पाठीमागे एक बस आणि बसच्या मागे डुकरांच्या मागे जशी  पिलावळ असते त्या पद्धतीत दहा-पंधरा दुचाक्या गर्दीत उभ्या आहेत. सिग्नलचा दिवा लालचा हिरवा होताच तुम्ही दुचाकीला किक् मारता, पण दुचाकी तुम्हाला काहीच प्रतिसाद देत नाहीए, मग तुम्ही धडपड करायला लागता आणि तुमच्या मागच्या गाड्या जोरजोरात हॉर्न वाजवून वेळप्रसंगी तुमच्या आई वडीलांचा उद्धार करून 'कचकचून' निषेध नोंदवला जात आहे. दु:स्वप्नच ना? असा हा विचार मनात आला आणि म्हणालो गाडी का सुरू होत नाही याचं कारण बघुया. वास्तविक गाडी सुरु का होत नाही याचा विचार करण्यासाठी मुळात ती कशी सुरु होते हे समजणे  महत्वाचे आहे. त्यातूनही मुलभूत अश्या  गाडीच्या  इंजिनाचा विचार करणे जास्त समर्पक वाटते. जे काही तुटक ज्ञान आहे ते मी इकडे पाजळायचा प्रयत्न चालवणा...

सीबिस्किट

ही एक उत्क्रुष्ट कलाक्रुती पाहण्याचा योग आला. चित्रपटाचे पुढील चार भागात तुकडे पाडले आहेत. सिनेमाच्या पुस्तकातले हे चार वेगवेगळे धडे आहेत असं म्हंटलं तरी काही हरकत नाही. भाग एक - हॊवर्ड कारच्या खरेदी-विक्रीचा याचा व्यवसाय. अपघातात तो आधी त्याचा मुलगा आणि नंतर त्याच्या पत्नीला गमावतो. तसा यशस्वी पण सर्वस्व गमावल्याने खचलेला, कशात काही मन लागत नाही असा.  घोड्यांची पैदास करून शर्यतीचे घोडे वाढवण्याची त्याची इच्छा असते. त्याच्या या धंद्या निमित्ताने  फ़िरत असतानाच त्याला एक स्त्री भेटते आणि दोघांचे लग्नही होते. पुढे एके दिवशी घोड्यांच्या तबेल्यात त्याला स्मिथ नावाचा म्हातारा भेटतो. तो म्हातारा एका घोड्याबरोबर माळरानावर राहत असतो. त्याचा सध्याचा घोडा पुर्वी जायबंदी झालेला असतो त्यामुळे त्याला त्याचा मालक गोळी घालत असताना या म्हातार्या स्मिथनी  वाचवलेला असतो. स्मिथ या प्रसंगी गप्पा मारत असताना हॊवर्ड ला म्हणतो, "You dont throw away your ...

बालगंधर्व

  नारायण श्रीपाद राजहंस. मराठी संस्कृतीला लाभलेली एक विभुती. ’नाट्यसंगीत’ हा प्रकार रुजवणारा, त्याचं बीज मोठं करणारे हा एक गुणी कलावंत. नाट्यसंगीतासाठी या मनुष्यानी अवघं आयुष्य वेचलं. इतकं की सध्याच्या माझ्या पिढीला मराठी संस्कृती आधी की नाट्यसंगीत आधी? असा प्रश्न पडेल. नितिन देसाईक्रुत ’ बालगंधर्व ’ चित्रपट पडद्यावर आला आणि ते हल्लीच घरोघरी पोहोचले, पण जुन्या जाणत्यांना, ज्यांनी त्यांचं गाणं ऐकलं आहे, त्यांनाच खरंतर त्या चित्रपटावर भाष्य करायचा अधिकार आहे असं मला स्पष्टपणे वाटतं. गायकी हा बालगंधर्व ांचा गाभा आहे. त्यामुळे मी अंदाज लावू शकतो, की बाकी सगळं जे आहे ते उत्क्रुष्टपणे दाखवले गेले असेल, त्यामुळे तो अनुभव अर्थात छान आहे. अन म्हणूनच फ़क्त माहितीपट म्हणून तो चांगला आहे. असो. त्यांचा काळ अदमासे शंभर वर्षांपूर्वीचा, पण बालगं धर्वांच्या सुरांमुळेच की काय सगळ्यांनी बालगंधर्व अजूनही मनामध्ये जपला आहे. याबद्दल पुलं म्हणाले होते की, आमच्या उमेदीच्या काळात बालगंधर्व ांचे गाणे ऐकताना आम्ही ज्या ज्या जागांवर जश्या पद्धतीनी दाद दिल्या आहेत, त्याच जाग...