Skip to main content

Posts

Showing posts from January, 2011

मनोमनी ते याची देही

२६ तारखेला काही इ-मित्रमंडळी 'याची देही याची डोळा' भेटली त्या निमित्ताने . .      कोण कुठले दहा बाराजण भेटण्याचा उत्साह दर्शवतात. कोणाला ही कल्पना सहज शक्य वाटते, कुणी दुविधेत पडतात. दुविधा अशी की जशी मी भेटण्याची तयारी दाखवली, तशी इतर सगळे दाखवतील की नाही? दाखवलीच तर तो माणूस नक्की ती पूर्ण करेल कि नाही! साहजिक आहे - एखादा माणूस 'जेन्युईन' झाला की तो समोरच्या व्यक्तीकडून तशीच अपेक्षा करू लागतो. तरी काहींनी हट्ट सोडला नाही. नेट-भेट ची वाटचाल थेट-भेट च्या दिशेने अंगात आल्यासारखी सुरु केली. अश्या उत्साहाने कि भेट, ग्रेट-भेट झाली नाही तरी पर्वा नव्हती. या दांडग्या उत्साहामुळेच अखेरच्या क्षणी दोन-तीन टाळकी वाढली सुद्धा! तशी सुरुवातीला निमंत्रण दिलेल्यांचा आकडा मोठ्ठा होता, पण का होईना त्याच्या ६० टक्के बझकर तयार झाली. माहिती नाही जगात अशी किती...

भीमसेन - एक साठवण

प्रसंग पहिला स्थळ - आहिल्यादेवी शाळेचा चौक - शनिवार पेठ, पुणे साधारण काळ - १९५५ - ५८ एक मोठा चौक. तसा चौक म्हणजे नावाला. चार दिशेने चार रस्ते कसे बसे एका ठिकाणी आले होते म्हणून तो काय चौक. चौकातच मोठी मोठी वडाची झाडं. एक चार पाच वर्षांचा, लहानगा अर्धी चड्डी घातलेला मुलगा चौकातच गाण्याच्या कार्यक्रमासाठी घातलेल्या मोठ्या मांडवात बागडत होता. एकटाच होता खूषीत. त्याच चौकात तर त्याचं घर होतं. आज पंडीत भीमसेन जोशींचे शास्त्रीय संगीत होते ना. थोड्यावेळाने एक उंचपुरा, काळी टोपी घातलेला गायक रंगमंच्यावर येउन बसला. "हा भीमसेन हळूहळू फार गुणी गायक बनतोय. सवाईगंधर्वांचा शिष्य आहे तो! " - कुणीतरी कुजबुजलं. यथावकाश कार्यक्रम सुरु झाला. भीमसेन चा बुलंद आवाज ऐकून रसिक मंत्रमुग्ध व्हायला लागले. बराच वेळ खेळत असलेला लहानगा, भीमसेनजींचा द्रुत सुरु झाल्यावर त्यांच्या आक्रमक हावभावाला, वेगाने जाणार्‍या एखाद्या तानेसोबत एकदम पुढे वाकण्याच्या त्यांच्या सवयीला, गाण्याची छेडखानी करताना त्यांच्या चेहर्‍यावर उमट्लेल्या रेषांकडे पाहून गाल्यातल्या गालात हसत होता. त्याचीच तर त्याला मजा वाटत होती. त्याल...

श्रद्धांजली

सांस्कृतिक शहर, महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी अशी बिरुदे मिरवणारे आपलं पुणं आज पोरकं झालं. पुण्याला खूप वरच्या आणि आदराच्या स्थानाला पोहोचवणारा कला क्षेत्रातील 'वडील' माणूस आज अनंतात विलीन झाला. स्वत:चे सबंध आयुष्य या तानसेनाने संगीत साधनेसाठी अर्पण केले. अश्या शिष्याकडे पाहून विनायकबुवा, भक्त मल्होत्रा, सवाईगंधर्व यांसारखे गुरुजन स्वर्गामध्ये किती भरून पावले असतील! असा शिष्य, असा नेता, असा कौसी कानडा, असा तेजस्वी आकार, असा मेघ मल्हार, अशी संगीताची मांडणी, त्यांच्या स्वरसादामार्फत श्रोत्याना मिळणारी - 'ईश्वर आहे आणि तो समोर गातो आहे' अशी मिळणारी दैवी अनुभूती, असे अजरामर तुकोबाचे अभंग त्यातले तुकोबांचे भाव पुन्हा ऐकणे, अनुभवणे पुन्हा कधीच न होणे. पंडितजींचे गायन खूप जवळून 'अनुभवता' आले, त्यांच्या काळात मी झालो याबद्दल ईश्वरचरणी नतमस्तक होतो. त...

विदारक

नेमकं केव्हा आठवत नाही. लहानपणी 'विदारक' या शब्दाची ओळख फार गम्मतशीर पद्धतीने झाली.  आमच्या घराच्या अंगणात नारळ, अशोक, आंबा, जांभूळ, फणस असे डौलदार वृक्षराज होते, त्यांच्याबरोबर चिकू, डाळींब, राय आवळा, पेरू अशी त्यांची आकारानी छोटी असलेली भावंडेही एकत्र गुण्या-गोविंदानी नांदत असत. बागेत पाच सहा गुलाब, कर्दळ, रातराणी, चाफा,शेवंती, मोगरा, गार्डन लिली, ग्लाडीओला यासारखी फुलझाडे, या व्यतिरिक्त ज्यांना कधीही फुले येणार नाहीत अशी रबर, सायकस, बेडकीचा पाला, फायरबॉल, लाल कोवळी पाने असलेली झाडे, लाजाळू अशी नुसतीच शोभेची झाडे तसेच काही जुजबी भाज्या म्हणजे अळू, कढीपत्ता, बडीशेप वगैरे. अश्या भरपूर वृक्ष समूहाच्या सावलीमध्ये आणि अंगाखांद्यावर माझे बालपण गेले. नाही म्हणायला, घरासमोर रस्त्याच्या पलीकडे असलेल्या शाळेच्या आवारात डिंकाचे आणि त्याच्या शेजारी निम्बाचे असे दोन मोठे वृक्ष दरबानासारखे उभे असत.  ह्य...

- देवबाप्पाकडे प्रार्थना -

५१ वे शतक पाहून अखेरीस केवळ दैवी अश्या प्रखर तेजापुढे मस्तक नेहमीसारखेच  आपोआप झुकले. १९८९ पासून किती नास्तिक लोकांना या अवताराने आस्तिक बनवले आहे - देव (तोच) जाणे! सचिन हा विषय ब्लॉगसाठी घेणे मी कायमच टाळतो, पण आज हे वरील वाक्य लिहिताना मोह आवरला नाही, आणि हे छोटेसे साकडे एकदम संगणकाच्या पडद्यावर अवतरले.     देवबाप्पा, ओम सच्चीदानंदाय नम:! माझ्या बालपणात ते तरुणपणापर्यंत तुम्ही क्रिकेट जगतात अवतरलात याबद्दल मी कृतज्ञता तुमच्याकडे कशी व्यक्त करू कळतच नाही.  एवढे मात्र आहे कि जर तुम्ही प्रसन्न झालात आणि समोर प्रकटलात तर तुम्हाला मी कडकडून मिठी मात्र नक्कीच मारणार आहे. तुमची शतके बघता बघता उपभोगाच्या नशेत अडकलेला मी, तुम्हाकडे फक्त एवढीच अजून मागणी करतो कि आता शतकांच्या शतकपूर्ततेसाठी उरलेली तीन शतकेही लवकर पूर्ण होऊन्देत. विश्वकरंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात शतकांचा हा होऊ घातलेला हिरकमहोत्सव पूर्ण करा असंच साकडं मी पूर्ण भक्तिभावनेने तुम्हाकडेच  घालतो.  विश्वक...

पुढचा जन्म

तो दिवस मांजरींचा होता. दमून भागून आलो आणि घरच्या लग्नाची तयारी सुरु केली. बाहेर पडलो, एटीएम मधून पैसे काढले मोटार सायकल भरभाव सोडली आणि रस्त्याच्या उजव्या बाजूने एक पांढर शुभ्र मांजर नेहेमीची सवय असल्या सारखे रस्ता ओलांडत बुंगाट सुटले. संध्याकाळची ७ ची वेळ. मुख्य रस्त्यावर भरपूर वाहतूक होती, तिथून कुणालाही न शिवता, माझ्या गाडीच्या पुढच्या चाकाच्या '३ मुंग्या' एवढे अंतर ठेवून ते मांजर सुखरूपपणे  पुढे गेले. क्षणभर वाटले कि तो पांढरा गोळा मी फुटबॉल  सारखा उडवला आणि ते गतप्राण झाले,  पण नशीब कि मी पहिल्या  पासून रस्ता  ओलांडण्याच्या  त्याचा पवित्रा पाहिला होता, आणि वेळीच ब्रेक लावला होता.  गाडी पूर्ण थांबली नाही तरी कमी  झालेल्या वेगामुळे  मांजरीचा जीव नक्की  बचावला होता. उसासा टाकून, पुन्हा गाडी दामटवायला सुरुवात केली. पुढच्याच चौकात एक नाही तो विचार आला. मागे बसलेल्या ...