Skip to main content

Posts

Showing posts from December, 2010

टा टा - २ ० १ ० याs s s - २ ० १ १

या वर्षात . . . जे नवीन मित्र लाभले, तसेच ज्यांच्याशी नवीन नाती जोडली गेली, त्यांना खूप खूप धन्यवाद.. . . . . ज्यांच्याकडून धीर मिळाला, जे खंबीरपणे पाठीशी उभे राहिले, ज्यांनी माझी काळजी घेतली . . . ज्यांच्या बरोबर सहजसुंदरपणे चार क्षण घालवले, ज्यांनी मला त्यांची काळजी घ्यायची संधी दिली . . . ज्यांना काही कारणास्तव माझ्या आयुष्यातून वेगळे व्हावे लागले . . . ज्यांनी माझा द्वेष केला त्याना. . . चला यातून मी अजून थोडं जास्त 'जगायला' तरी शिकलो माझ्या आयुष्यात असलेल्या सगळ्यांना ज्यांनी माझं २०१० हे वर्ष सार्थकी लावले - त्याना उर भरून धन्यवाद, घट्ट मिठी आणि प्रामाणिकपणे अगदी हृदयापासून नवीन वर्ष तुमच्या मनोकामने सारखं जावो अश्या शुभेच्छा! :-) पुढील वर्षीही अशीच साथ राहू दे.       

विदर्भातली भाषा

विदर्भातली भाषा हा मराठीच्या अभ्यासकांचे चर्चा करण्याचा आवडता विषय. पुलंनी पुणेकर, मुंबईकर कि नागपूरकर यातून त्या भाषेचे ठराविक शब्द, हेल ये लोकांपर्यंत पोहोचवून ठेवले. वाढत्या शहरीकरणामुळे आता बरेच लोक इकडे येऊ लागले आहेत. आधीच्या नौकरी दरम्यान माझाही बरयाच नाग्पुराकारांशी संपर्कही आला. "काय करून राहिला बे?", "तू थांब, मी येउन राहिलो आहे तिकडे." "अरे तो कागद घेवून घे" "एवढा मजा आला ना, बास रे बास! " हि आणि अश्या प्रकारची काही वाक्ये कायमच कानावर येत असत. गप्पांच्या ओघात, मित्राने निष्कर्ष काढला की नागपूर महाराष्ट्राच्या एका बाजूला आहे, त्यामुळे त्याच्यावर एक प्रकारचा मध्य प्रदेशाच्या हिंदीचाही संस्कार आहे. हिंदीचा प्रभाव तिकडच्या मराठीवर एवढा वाढला असेल की -  थोडे मराठी शब्द वापरून आणि वाक्य रचना हिंदी सारखीच करून नागपुरी मराठी विकसित झाली असेल.  नागपूरच्या मराठीवर या अश्या हिंदीच्या साच्याचे संस्कार झाले...

नशीब

फुटके नशीब किंवा कपाळ करंटेपणा हा वैयक्तिक नसतो - तसा जागतिकच असतो. कालच एका वन वे बोळातून मोटारीतून जात असताना अचानक समोर बस आली - पर्याय नसल्याने मला पुढची मार्गक्रमणा बस मागून करावी लागणार होती. पुढचा दहा  मिनिटांचा  प्रवास  हा आता बस मागोमाग करावा लागणार, शिवाय बस थांब्यावर दर दोन मिनिटांनी बस बरोबर वाट पाहत थांबावे लागणार या कल्पनेने मी म्हणालो, "काय फुटकं नशीब आहे - आपल्याच बाबतीत असे कायम घडते!" फुटकं  नशीब असा म्हंटल्याबरोबर गौतम बुद्धाची नशिबाची व्याख्या आठवली. तो म्हणाला होता - सखोल ज्ञान आणि  तशीच  कुशलता असणे, शिवाय सुशिक्षित असूनही चांगली भाषा असणे म्हणजे नशीब.  आता ही व्याख्या बसच्या मागून निर्विकारपणे गाडी चालवताना कुठे लागू होते हे माझ्या कळण्याच्या बाहेर होते. यथावकाश जिथे - ज्या कार्यक्रमला पोचलो, तिथे एक हल्लीच पुण्यात शिफ्ट झालेला मित्र भेटला, तो त्याच रस्त्यांनी आला होता. त्याच निमुळत्या रस्त्यावर ...

एक हसलेली काव्यमैफील - भाग १

हे ओरिजिनल पोस्ट होतं - त्यावरून काव्यसंमेलनच झाले In English One Tea.. Two Toast.. U r My Best Dost.. आता मराठी: एक चहा.. दोन खारी.. आपली दोस्ती लई भारी.. Good Morning.. Have A Lovely Day.. Arjun Deshpande - दोन झाडं एक भकास तुझी कविता झकास! :-P सुप्रभात! सेम टू यु! सं. पा.  - एका रम्य सकाळी ... आली पहा वैशाली Arjun Deshpande - एका रम्य सकाळी ... आली पहा वैशाली कचेरीत येवोनी . . . . बझ वरती जुंपली  सं. पा. - कविता अशा करोनी .. रोष ओढवून घेतो अर्जुन देशपांडे भलता सुरात येतो सं. पा.  - काही म्हणा हिला हि करते फक्त हेहे आज सकाळी नाश्त्याला खाल्ले का कांदेपोहे (हे मैफिलीची सुरुवात करणारी वैशाली नावाच्या मुलीबद्दल चालले आहे, अर्थातच तिलाही कल्पना नसेल कि तिने संमेलन खूप मोठे रूप प्राप्त करणार आहे) Arjun Deshpande - कळून चुकले आज या मैफिली . . एकटाच मी नाही . . . संदीप पाटीलही साथ मला करिती! :) (एकमेकांच्या खोड्या काढू . . . अवघे बनू शीघ्र कवी!) सं. पा. - मैफिल रंगात हि आले जुळू...

एक हसलेली काव्यमैफील - भाग २

थोड्याश्या विश्रांती आणि अल्पोपाहारानंतर कवीजन पुन्हा त्यांच्या प्रतिभेसहित दाखल झाले - Amar - mast jamali hoti pangat, mast jamali hoti pangat, pan ka konas thavuk aali oradat, potamadhali bhuk ani jhale sagale gayabbbbbbbbbbbbbbbbbb   प्रावा - टाईड ट्राय करो.... (अष्टपैलुत्व सिद्ध - पुन्हा एकदा - लेडी रजनीकांत) सं. पा.  आली वैशाली पुन्हा सुरु होईल कवितांची उधळण पुन्हा कोणीतरी अ रसिक बोलेल करेन मुलींच्या कामेंटची पाठराखण (संपा ने भाई दुमडली आहे - आणि तितक्यात कविताही झाली!)  Arjun Deshpande - असो एक - फर्माता हू - बझ मित्रान साठी Pranita Wadekar - फर्मा.. सं. पा. - इर्शाद अर्जुन Arjun Deshpande - बझ कर हे स्वच्छंदी सोयरिक हे फुलगंधी करतात जवळीक अपरंपार तरीही नेहमी स्पर्शापार तरीही नेहमी स्पर्शापार (फुसका गेला वाटतं) अतुल राणे - अश्या एकट्या कातरवेळी नको नको ते उधाण येते , मनात माझ्या प्रसुतवेदना तरी कवितेचे मुल ना होते , ............कल्पनेतली अश्व दौडती , ............शब्द घेउनी डोंगर रचती , ...............