सानिकाचा आठवा वाढदिवस या रविवारी येत होता. भेटवस्तू मिळणार, लाड होणार याचा सगळा विचार करून सानिकाला काय करू आणि काय नको असं झालं होता. सानिकाची आई आता यशस्वी स्त्री असली तरी मध्यमवर्गीय घरातीलच होती. तिने ती लहान असताना केक वगैरे कापून वाढदिवस नव्हता साजरा केला, पण म्हणूनच असेल तिने सानिकाचे कमी लाड केले नव्हते.
ऑफिस मधून आल्यावर जेवण बनवताना सानिकाच्या आईने सानिकाचा पापा घेतला आणि लाडातच विचारले,
"एका मुलीचं काय आहे, या रविवारी!" सानिकाला पुन्हा एकदा वाढदिवसाची आठवण झाली आणि चेहरा गुलाबाच्या कळीसारखा खुलला."
"ए सानिका, सांग ना काय काय करायचं आपण तुझ्या वाढदिवसाला?" - आईने लाड सुरु ठेवले.
"सानिका, तुला अंगूर मलई आवडते ना, मग आपण अंगूर मलई, पुरी आणि पुलाव ठेवू,
रिटर्न गिफ्ट म्हणून मुलांना छोटी छोटी झाडं देवू." - सानिकाची आई हळूहळू सानिकापेक्षा स्वत:मध्येच रमायला लागली होती आणि रविवारचे आराखडे तयार करत होती.
रिटर्न गिफ्ट म्हणून मुलांना छोटी छोटी झाडं देवू." - सानिकाची आई हळूहळू सानिकापेक्षा स्वत:मध्येच रमायला लागली होती आणि रविवारचे आराखडे तयार करत होती.
"तुला काय हवंय गिफ्ट म्हणून?" - शक्यतो हा प्रश्न आठ वर्षाच्या मुलांना ना विचारलेलाच बरं असतो, हे तिची आई विसरली होती, पण सानिका सुद्धा एवढा विचार करतीये पाहून तिचाही कुतूहल ताणल गेलं. लगेचच तिने स्वयंपाकाची तयारीही सुरु करायला घेतली.
सानिकानी मिनिटभर विचार करून काहीतरी आठवल्या सारखा चेहरा केला, आणि पळत पळत हाक मारली "आsssssई!"
"काय ग शोना?" - आईनेही सानिकाला लाडातल्या नावानी हाक मारली. आज माय लेकीचे प्रेम भलतेच उतू चालले होते.
"मला आठवलं, मला काय गिफ्ट हवंय ते!" - सानिका
"काय हवंय तुला?" - आईने कुतूहलाने विचारले.
"बिग बॉस मध्ये त्या पॅमेला ताईनी जशी चादर घातली होती, तश्या २-३ चादरी दे ना मला वाढदिवसाला."
इतका वेळ कौतुकानी पाहत असलेली सानिकाची आई हादरलीच! आपल्या कार्टीला, चादर घालून पॅमेला अंडरसन बनून धक धक करायचंय याचा विचार करून तिला जरा गरगरलंच आणि तिचा चेहरा सरस्वतीमाते पासून कालीमातेसारखा अवघ्या चार सेकंदात झाला.
धप्पदिशी एका धपाट्याचा आवाज आला आणि त्या मागोमाग सानिकाच्या भोकाडाचाही.
Comments