Skip to main content

महादेव काशीनाथ गोखले

प्रस्तावना
प्रस्तुत लेख हा 'महाराष्ट्र टाईम्स' वर १७ नव्हेंबर रोजी इंटरनेट वर प्रसिद्ध झाला. माणसात रमणाऱ्या आणि माणसं शोधणाऱ्या सुधीर गाडगीळ यांच्या मिश्कील शैली मध्येच हे लेखन आहे.  दोघांचाही  मन:पूर्वक  मान राखून येथे संदर्भ देत आहे.गोखले आजोबांच्या मृतात्म्याला ईश्वर शांती देवो हीच माझी मनोकामना आहे. त्यांच्या कडून कळत-नकळत झालेल्या स्वास्थ्य आणि आरोग्याच्या प्रचाराबद्दल मी मूषकाच्या वाट्याची का होईना कृतज्ञता व्यक्त करायचा प्रयत्न केला आहे. एवढ्याच प्रामाणिक उद्देशातून . . .  

शाळेत असताना 'ठकठक', 'चांदोबा', भा.रा.भागवत, आणि तत्सम पाक्षिके, मासिके, साप्ताहिके इत्यादी मराठी बाल साहित्य विकत घेण्यासाठी आम्ही मुले यांच्या दुकानात जात असू. पूर्वी पेरूगेट पोलीस चौकी ते भरत नाट्य मंदिर या छोट्या रस्त्याच्या मध्यभागी एक जुनी सागवानी लाकडाची चौकट असलेलं, शहाबादी फरशी चा ओटा वजा पार एवढी साधारण उंची असलेलं दुकान होतं. त्या  चौकटीजवळ इंग्रजी, मराठी, दैनिकांची शिस्तबद्धपणे मांडणी करून त्याच्या शेजारीच हे आजोबा  जमिनीवरच बसलेले दिसत. गोष्टीतले आजोबा असतात तसे मात्र हे आजोबा लाड वगैरे करताना कधीच दिसले नाहीत मात्र, मुलांची गर्दी झाली आणि, "हे पुस्तक केवढ्याला?, आणि हे?" असे सतत प्रश्न विचारणाऱ्या आणि किलबिलाट करणाऱ्या मुलांना अगदी शांतपणे किंमतही  सांगत असत. बरं आमची शाळा भावे स्कूल, म्हणजे 'बेरकी' मुलांसाठी प्रसिद्धच! क्वचित प्रसंगी त्या गर्दीत कोण मुलांच्यात मतभेद झाले, आणि त्याचे प्रत्यंतर आजोबांच्या उपस्थितीमध्ये एखाद्या शिवी बिवित झाले, की मात्र वरपक्षी म्हाताऱ्या दिसणारया या आजोबांच्या तोंडातून कडाडून आणि खणखणीत आक्षेप ऐकू यायचा. अश्या वेळेस ती मुले त्यांच्या आई वडिलांना कधी घाबरली नसतील अशी गोखले आजोबाना घाबरायची. 

                                                                         सौजन्य व साभार : महाराष्ट्र टाईम्स

हे स्वातंत्र्य सैनिक असलेले  आजोबा खूप व्यायाम करतात. ते लोणावळ्याला दर रविवारी पळत जातात, आणि मग खडकवासला -सिंहगड - खेड शिवापूर असे करत करत पुण्यात परततात;  वयाच्या  नव्वदीतही ते पर्वती चढू शकतात अश्या एक ना एक बऱ्याच गोष्टी ऐकल्या होत्या. हे कुठून ऐकले असावे हेही नेमके लक्षात नाही. 

ते जेव्हा उभे असायचे तेव्हा त्यांच्या पायांचे  घोटे टेकलेले असत, आणि दोन्ही गुडघ्यांमध्ये साधारण एक लहान वीतभर एवढं अंतर असे. असलं काटक शरीर पाहून साहजिकच  विश्वास बसायचा आणि आश्चर्यही वाटायचे. जेंव्हा त्यांनी शताब्दी मध्ये पदार्पण केले होते तेव्हा सकाळ  मध्ये त्यांच्यावर एक मोठा लेख आलं होता, तेव्हाच  त्यांच्या  या  सगळ्या गोष्टींची  खात्री  झाली. एवढ सगळा वाचल्यानंतर, जाणून घेतल्या नंतर असं जाणवत आहे की एवढ्या वर्षात आजोबांनी आम्हा मुलांसमोर कधीही व्यायामाचा बडेजाव तर सोडा पण सुतोवाचही केला नाही. 

                                                                      सौजन्य व साभार : महाराष्ट्र टाईम्स

                                                                   सौजन्य व साभार : महाराष्ट्र टाईम्स
   

Comments

Popular posts from this blog

स्टैनली का डब्बा

स्टैनली का डब्बा हा चित्रपट पाहीला . .. आवडला . चित्रपटाच्या शेवटी एक नोटीस येते . " या चित्रपटाचे शूटींग विद्यार्थ्यांच्या खूप मधल्या सुट्ट्या ( रिसेस ) अ र्थात फ़ार वेळ खर्च न करता; एक वर्कशॊप म्हणून सुट्टीच्या दिवसातच म्हणजे फ़क्त एका वीकेंड मध्ये केले गेले आहे" . सध्याच्या व्यावसायीक सिनेमा मध्ये अश्या प्रकारचा चित्रपट बनवून लोकांपर्यंत पोहोचवायला एक धैर्य लागतं, अमोल गुप्तेचं हे धैर्य चित्रपट संपताना प्रेक्षकात त्यावेळेस एकदम जाणवतं . अमोल गुप्ते तसंच शाळा, शिक्षक-विद्यार्थी नाते, एका विद्यार्थ्याचीच प्रमुख व्यक्तिरेखा अश्यांमुळे साहजिकच आठवतो तो ’तारे जमिन पर’. दोन्ही चित्रपटातला विरोधाभास हा की स्टॆनली चुणचुणीत, स्वाभिमानी, हुशार आणि विद्यार्थीप्रिय मुलगा तर ’तारे जमिन पर’ मधला दर्शील हा एक डिसलेक्सिक त्यामुळे अभ्यासात मागे, एकटा पडलेला, कुणी न समजून घेतलेला मुलगा. तारे मध्ये शिक्षक-विद्यार्थी असं मैत्रीपूर्ण नातं आहे तर स्टॆनली मध्ये त्याच नात्यातील एक चढाओढ आहे. वास्तविक अमोल गुप्ते हा लहान मुलात व्यावसायिक संबंध असणारा माणूस . मतिमंद मुलांमध्ये तो गेली कित्य

जनता आणि अयोध्या

बाबरी मशीद चा निकाल म्हणता म्हणता येउन ठेपलाय. भरपूर ठिकाणी लोकांना निर्णयाबद्दल कुतूहल आहे. हिंदूचे चुकले कि मुस्लिमांचे, कोणाची बाजू नक्की खरी वगैरे; वादविवाद म्हणा किंवा चर्चा म्हणा त्या ऐकू येत आहेत. एकंदरीत १९९२ चे मुंबई bomb blasts, त्यानंतर एकामागून एक घडलेल्या अनेक तश्याच घटना म्हणजे गोधरा, गुजराथ दंगल, सतत उसळणारं मालेगाव - घडत राहिल्या आणि लोकांना त्याची सवय ही होत गेली. २६ नव्हेंबर इथे मुंबई पुन्हा एकदा याच वादातून पोळली गेली. एवढा सगळं होऊन सुद्धा काही लोकांची खुमखुमी काही जात नाहीए . मुळात त्यांना ही गोष्ट जाणवत कशी नाही कि तेच आपल्या हाताने स्वत: चे आयुष्य insecure बनवत आहेत. आज ते वाचले तर उद्या त्यांच्याच पुढल्या पिढीच्या जीवाला विरुद्ध  बाजूने धोका राहणारच आहे.    २७ तारखेची याचिका फेटाळली गेली, आणि दोन्ही बाजूंकडून खुलासे देण्यात आले की कोर्टाचा निर्णय सर्वमान्य असेल. तेव्हा एक गोष्ट डोक्यात आली - की कोर्टाने असा निर्णय दिला तर? वादग्रस्त जमिनीवर रामलल्ला, निर्मोही आखाडा आणि मुस्लीम अत्युच्च संस्था वक्फ या तिघांचाही भारतीय म्हणून हक्क आहे, त्यामुळे तिथे मंदिर क

पानवाला आणि पान

पान ही आपल्या देशाला लाभलेली एक सांस्कृतिक देणगी आहे . नीट पाहिलं, तर आपल्या पुराणातच कितीतरी ठिकाणी तांबूल - भक्षण करणारे सूर - असुर सापडतील . आजही नैवेद्या बरोबर विडा द्यायची पद्धत आहेच की . यावरून आठवलं , लहानपणी मी माहूरच्या देवीच्या दर्शनासाठी गेलो होतो . तिथे देवीच्या तोंडात विडा ठेवण्याची पद्धत आहे . तो विडा काढला कि गरम झालेला असतो असंही म्हणतात . आता हा श्रद्धाश्रद्धेचा भाग झाला , पण मुखातला विडा परत काढावाच कशाला ? असा रास्त प्रश्न मला आता पडतो. सांगायचा उद्देश एवढाच की विड्याची ही परंपरा पुष्कळ जुनी आहे . मराठी व्याकरणातही सुपारी देणे , विडा उचलणे असे काही अजूनही येणारे वाकप्रचार आहेत की . दत्तप्रबोधामध्येही पानाची तमोगुणी अशी उपमा आहे . त्यात म्हंटले आहे की , कीर्तनी तांबूल भक्षण । तें रजस्वलेचें शोणित जाण । कागजन्म तयालागून । करी भक्षण नरक मांस . त्यामुळे आपल्या संस्कृतीमध्ये पान जेवढे जुने तेवढेच पिचकारी मारणारे थुंक - संप्रदायी ही जुनेच आहेत हे कळून च