Skip to main content

श्रद्धांजली

सांस्कृतिक शहर, महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी अशी बिरुदे मिरवणारे आपलं पुणं आज पोरकं झालं. पुण्याला खूप वरच्या आणि आदराच्या स्थानाला पोहोचवणारा कला क्षेत्रातील 'वडील' माणूस आज अनंतात विलीन झाला.

स्वत:चे सबंध आयुष्य या तानसेनाने संगीत साधनेसाठी अर्पण केले. अश्या शिष्याकडे पाहून विनायकबुवा, भक्त मल्होत्रा, सवाईगंधर्व यांसारखे गुरुजन स्वर्गामध्ये किती भरून पावले असतील!

असा शिष्य, असा नेता, असा कौसी कानडा, असा तेजस्वी आकार, असा मेघ मल्हार, अशी संगीताची मांडणी, त्यांच्या स्वरसादामार्फत श्रोत्याना मिळणारी - 'ईश्वर आहे आणि तो समोर गातो आहे' अशी मिळणारी दैवी अनुभूती, असे अजरामर तुकोबाचे अभंग त्यातले तुकोबांचे भाव पुन्हा ऐकणे, अनुभवणे पुन्हा कधीच न होणे.

पंडितजींचे गायन खूप जवळून 'अनुभवता' आले, त्यांच्या काळात मी झालो याबद्दल ईश्वरचरणी नतमस्तक होतो. त्यांनी एवढ सगळं दिलं, ऐकवलं, संगीत प्रसारकाची महोत्सवाची परंपरा सुरु केली या बद्दल मी त्यांचा शतश: ऋणी राहीन. त्याबद्दलची कृतज्ञता मी कशी व्यक्त करावी हे माझ्या आकलन शक्तीच्या बाहेर आहे.

या स्वरभास्करास, या 'बाप' माणसास ओलसर पापण्यांनी, शहारलेल्या अंगाने, खूप खोलवर रुतलेल्या हृदयाने आणि अडकलेल्या श्वासाने त्यांच्याच भावपूर्ण भैरवीने श्रद्धांजली वाहतो!




जो भजे 'सूर' को सदा|
सो ही परम पद पावेगा|

     

Comments

Anonymous said…
thanks buddy.... majya pan same bhavana shabda madhe mandalya badal..
Unknown said…
पंडित भीमसेन जोशी व्यक्तिमत्व मोठ्ठ त्यांचे असे जाणे खूप दुख:द आहे मनापासून भावपूर्ण श्रद्धांजली
Tatyaa.. said…
मनापासून भावपूर्ण श्रद्धांजली..!

Popular posts from this blog

स्टैनली का डब्बा

स्टैनली का डब्बा हा चित्रपट पाहीला . .. आवडला . चित्रपटाच्या शेवटी एक नोटीस येते . " या चित्रपटाचे शूटींग विद्यार्थ्यांच्या खूप मधल्या सुट्ट्या ( रिसेस ) अ र्थात फ़ार वेळ खर्च न करता; एक वर्कशॊप म्हणून सुट्टीच्या दिवसातच म्हणजे फ़क्त एका वीकेंड मध्ये केले गेले आहे" . सध्याच्या व्यावसायीक सिनेमा मध्ये अश्या प्रकारचा चित्रपट बनवून लोकांपर्यंत पोहोचवायला एक धैर्य लागतं, अमोल गुप्तेचं हे धैर्य चित्रपट संपताना प्रेक्षकात त्यावेळेस एकदम जाणवतं . अमोल गुप्ते तसंच शाळा, शिक्षक-विद्यार्थी नाते, एका विद्यार्थ्याचीच प्रमुख व्यक्तिरेखा अश्यांमुळे साहजिकच आठवतो तो ’तारे जमिन पर’. दोन्ही चित्रपटातला विरोधाभास हा की स्टॆनली चुणचुणीत, स्वाभिमानी, हुशार आणि विद्यार्थीप्रिय मुलगा तर ’तारे जमिन पर’ मधला दर्शील हा एक डिसलेक्सिक त्यामुळे अभ्यासात मागे, एकटा पडलेला, कुणी न समजून घेतलेला मुलगा. तारे मध्ये शिक्षक-विद्यार्थी असं मैत्रीपूर्ण नातं आहे तर स्टॆनली मध्ये त्याच नात्यातील एक चढाओढ आहे. वास्तविक अमोल गुप्ते हा लहान मुलात व्यावसायिक संबंध असणारा माणूस . मतिमंद ...

मनोमनी ते याची देही

२६ तारखेला काही इ-मित्रमंडळी 'याची देही याची डोळा' भेटली त्या निमित्ताने . .      कोण कुठले दहा बाराजण भेटण्याचा उत्साह दर्शवतात. कोणाला ही कल्पना सहज शक्य वाटते, कुणी दुविधेत पडतात. दुविधा अशी की जशी मी भेटण्याची तयारी दाखवली, तशी इतर सगळे दाखवतील की नाही? दाखवलीच तर तो माणूस नक्की ती पूर्ण करेल कि नाही! साहजिक आहे - एखादा माणूस 'जेन्युईन' झाला की तो समोरच्या व्यक्तीकडून तशीच अपेक्षा करू लागतो. तरी काहींनी हट्ट सोडला नाही. नेट-भेट ची वाटचाल थेट-भेट च्या दिशेने अंगात आल्यासारखी सुरु केली. अश्या उत्साहाने कि भेट, ग्रेट-भेट झाली नाही तरी पर्वा नव्हती. या दांडग्या उत्साहामुळेच अखेरच्या क्षणी दोन-तीन टाळकी वाढली सुद्धा! तशी सुरुवातीला निमंत्रण दिलेल्यांचा आकडा मोठ्ठा होता, पण का होईना त्याच्या ६० टक्के बझकर तयार झाली. माहिती नाही जगात अशी किती...

सीबिस्किट

ही एक उत्क्रुष्ट कलाक्रुती पाहण्याचा योग आला. चित्रपटाचे पुढील चार भागात तुकडे पाडले आहेत. सिनेमाच्या पुस्तकातले हे चार वेगवेगळे धडे आहेत असं म्हंटलं तरी काही हरकत नाही. भाग एक - हॊवर्ड कारच्या खरेदी-विक्रीचा याचा व्यवसाय. अपघातात तो आधी त्याचा मुलगा आणि नंतर त्याच्या पत्नीला गमावतो. तसा यशस्वी पण सर्वस्व गमावल्याने खचलेला, कशात काही मन लागत नाही असा.  घोड्यांची पैदास करून शर्यतीचे घोडे वाढवण्याची त्याची इच्छा असते. त्याच्या या धंद्या निमित्ताने  फ़िरत असतानाच त्याला एक स्त्री भेटते आणि दोघांचे लग्नही होते. पुढे एके दिवशी घोड्यांच्या तबेल्यात त्याला स्मिथ नावाचा म्हातारा भेटतो. तो म्हातारा एका घोड्याबरोबर माळरानावर राहत असतो. त्याचा सध्याचा घोडा पुर्वी जायबंदी झालेला असतो त्यामुळे त्याला त्याचा मालक गोळी घालत असताना या म्हातार्या स्मिथनी  वाचवलेला असतो. स्मिथ या प्रसंगी गप्पा मारत असताना हॊवर्ड ला म्हणतो, "You dont throw away your ...