पुढील वृत्तांत हा माझा ज्येष्ट मित्र (खरतर फक्त या ट्रेक पुरताच) केदार परांजपे याच्या लेखणीतून (का कीबोर्ड तून?) आला आहे. त्याने तो त्यावेळीच पाठवला होता. काही वर्षांपूर्वी (अंदाजे चार सव्वा चार) पूर्ण केलेला हा ट्रेक मनाच्या कोपऱ्यात आहे. काही दिवसांपूर्वी एका मित्राला या गडाची माहिती हवी होती तेव्हा जीमेल सर्च केले. प्रस्तुत लेखात केदारची ओरिजिनल लिपी, काही छोटे मोठे बदल आणि काही छोट्या गोष्टी वाढवल्याची गुस्ताखी केली आहे. जायचे कसे: स्वत:चे वाहन असेल तर उत्तमच. नाहीतर, पुण्याहून मुंबईकडे जाणारी कुठलीही ट्रेन पकडावी. बोर-घाट पार करत कर्जत येथे उतरावे. कर्जतहून मुरबाड-कडे जाणारी बस (किंवा खाजगी वाहन) करावी. कर्जतहून शेवटची बस संध्याकाळी ६.०० वाजता आहे.कर्जतपासून ४५ की.मी. वर म्हसा हे गाव लागते, तेथे उतरावे. उजवीकडे देहरी या गाव...
लिहायला घेतले की दररोजचा शीण कमी होतो.... क़ेवळ आणि केवळ त्यासाठीच!