Skip to main content

गाडी सुरु करणे : भौतिकशास्त्र :)

वाहतूकीच्या जगात तुम्ही थोडेफार सक्रीय असाल तर अशी (नाट्यमय ) अवस्था डोळ्यासमोर आणावयास अजिबात कठीण नाही. तुम्ही दुचाकी वर आहात, आणि लाल सिग्नल आहे म्हणून तुमची दुचाकी बंद करून चौकात बर्‍यापैकी पुढे थांबले आहात. तुमच्या आजूबाजूला चार पाच दुचाक्या,  पाठीमागे एक बस आणि बसच्या मागे डुकरांच्या मागे जशी  पिलावळ असते त्या पद्धतीत दहा-पंधरा दुचाक्या गर्दीत उभ्या आहेत. सिग्नलचा दिवा लालचा हिरवा होताच तुम्ही दुचाकीला किक् मारता, पण दुचाकी तुम्हाला काहीच प्रतिसाद देत नाहीए, मग तुम्ही धडपड करायला लागता आणि तुमच्या मागच्या गाड्या जोरजोरात हॉर्न वाजवून वेळप्रसंगी तुमच्या आई वडीलांचा उद्धार करून 'कचकचून' निषेध नोंदवला जात आहे. दु:स्वप्नच ना?

असा हा विचार मनात आला आणि म्हणालो गाडी का सुरू होत नाही याचं कारण बघुया. वास्तविक गाडी सुरु का होत नाही याचा विचार करण्यासाठी मुळात ती कशी सुरु होते हे समजणे  महत्वाचे आहे. त्यातूनही मुलभूत अश्या  गाडीच्या  इंजिनाचा विचार करणे जास्त समर्पक वाटते. जे काही तुटक ज्ञान आहे ते मी इकडे पाजळायचा प्रयत्न चालवणार आहे, तरी कृपा करून ते विनोदी समजून वाचू नये एवढीच  माझी अपेक्षा आहे. :)

इंजिन समजून सांगावयास अजून सोपे करण्यासाठी उदाहरण म्हणून आपण अतिशय सोप आणि
मुलभूत असे बुलेट (बोली भाषेत फटफटी ) चे इंजिन बघुया. हे एवढे मुलभूत आहे की म्हणजे 'अंग्रेजोंके जमानेसे'  यात विशेष असा बदल नाही झालाय...अगदीच सातवीचे भौतिकशास्त्र हो! दुसरी गोष्ट म्हणजे  सुरु होण्यास ती गाडी अवघड. तर चला मुळात शिरलोय, आता खोलात शिरू!

एका किक मध्ये बुलेटचे इंजिन एकदाच फिरते, इतर दुचाक्यांची इंजिन 'काही वेळा' फिरतात. याचा अर्थ बुलेट इंजिनाला एका किक् मध्ये स्पार्क-प्लग मधून एकच ठिणगी मिळते. म्हणजे किक मारताना , जर बरोबर 'ठिणगी' नसेल, आणि बरोबर इंधनाचा दाब नसेल;  बरोब्बर दबाव नसेल ..... तर हरी हरी होते आणि आपण पुन्हा प्रयत्न करतो. इतर गाड्यांच्या बाबतीत तसे नसते कारण ठिणगी आणि इंधन यांचा ताळमेळ  साधण्यासाठी तुम्हाला एकापेक्षा जास्त संध्या असतात.

याचं कारण काय बरं असेल? तर बुलेट इंजिन हे कुठल्याही 2-स्ट्रोक इंजिनच्या तिप्पट असतं. ढोबळ प्रमाणानुसार  सांगायचे तर, बुलेट सुरु करण्यासाठी 2-स्ट्रोक इंजिनाच्या तीन पट  प्रयत्न करावे लागतात म्हणून. (2 स्ट्रोक इंजिने ही स्कूटर, जुन्या यामाहा, रिक्षा यांसारख्या गाड्यात असतात.)

काही लोक म्हणतात, "यड्या, आपली गाडी अर्ध्या किक मध्ये सुरु व्हते". तुम्ही किक मारण्यास सुरुवात  करता म्हणजे तुम्ही खरतर इंजिन मधील 'पिस्टन' ची जागा स्थिर करीत असता. बुलेट सुरु करताना, जिथे ठिणगी होणार आहे, त्याच्या जरा आधी किक सुरु केली, म्हणजे तुम्हाला 'पॉवर स्ट्रोक' आणि 'Exhaust'  स्ट्रोक मिळेल आणि शिवाय 'इनटेक स्ट्रोक' (पिस्टन आणि फ्लायव्हील याना गतिमानता) मिळेल आणि इंजिनाला टोप डेड सेंटर चे चक्र पूर्ण करण्यास पुरेशी गतिमानता मिळेल. तुमच्या इंजिनामध्ये जरा आधीपासून दाब खूप  कमी असेल, तर अर्ध्या काय पाव किक नी सुद्धा तुमची गाडी सुरु होईल. (हा दुवा पाहून हे सगळे तुम्ही कल्पना करू शकता)

हे समजले तर बुलेटच्या कुप्रसिद्ध BACK KICK कडे वळूया. आता कुठलाही  पक्या फिटर पण सांगेल की हे 'Advance' मुळे होते. पण अक्सीलरेटर कमी-जास्त पिरगाळणे  किंवा किक चे मुलभूत टाईमिंगच चुकीचे असणे अश्या शंका याच्या पाठी असू शकतात. मग सायलेन्सर नीळा पडणे, स्प्रे पेंटिंग सारखे पेट्रोल बाहेर येणे असे प्रकार होऊ शकतात. याचं परीक्षण करता येईल.

सुरुवातीला किक हि फ्लाय्व्हील आणि पिस्टन साठी गतिमानता  साठवते (आठवा-  स्थितीज उर्जेचे गतीज उर्जेत रुपांतर), त्या ताकदीचा काही भाग हा 'COMPRESSION ' साठी वापरला जातो (compression stroke), जो पिस्टनला त्याच्या प्रमाणानुसार  हळू करतो. त्यामुळे जर 'अक्सीलरेटर' पिरगाळला असेल तर त्यामुळे इंजिन मध्ये जास्त हवा आत येते आणि पिस्टन जास्त हळू होतो आणि  टोप डेड सेंटर चे चक्र पूर्ण होण्यापूर्वीच, तिथे ठिणगी उडते आणि बदलामुळे चक्र उलटेच फिरायला लागते - 'BACK - KICK'!  मग तुम्ही अजून जोरात किक मारू शकता किंवा अश्या प्रकारे बरोब्बर टायमिंग नी किक मारू शकता.

ठीक. टायमिंग कमी जास्त करून किक मारली, पण तुम्हाला असं दिसलं की सायलेन्सर निळा पडू लागला आहे (असं फार कमी होतं म्हणा) याचा अर्थ कार्ब्यूरेटर चे सेटिंग चुकलं आहे. म्हणजे इंधन नीट जळत नाहीये. अजून सोप्या भाषेत सांगायचे तर इंधन जळण्याची क्रिया सुरु असताना ते पूर्ण न जळता 'EXHAUST' मध्ये पोहोचत आहे. इंधना मधील भेसळ सुद्धा याला कारणीभूत होऊ शकते. तुम्हाला एकदा नक्की कळलं कि काय होतंय, त्यावरून तुम्ही ठरवू शकता की दुर्लक्ष करायचे कि दुरुस्त किंवा फिटर कडे घेऊन जायचं.

पेट्रोल मधला फरक असो किंवा कार्ब्यूरेटर चे सेटिंग, ठिणगीचे टायमिंग आणि इंजिनातील दाब यांच्या मधला फरकाचा प्रभाव हा प्रत्येक इंजिनावर असतोच, पण बुलेट मध्ये जास्त अनुभवला जातो. याच मुळे बुलेट सुरु करण्यापूर्वी प्रत्येक बुलेट नुसार सुरुवातीच्या पद्धती लागू होतात. 'चोक' देणे किंवा न देणे हि सुद्धा त्यातलीच एक. त्याबद्दल पुन्हा केव्हातरी।    


   


. 



Comments

Abhishek said…
वाह, चांगलीच टेक्निकल माहिती सांगितली आहे!
Unknown said…
धन्यवाद अभिषेक!
पंत’साहित्य येऊ द्या काहीतरी...

Popular posts from this blog

स्टैनली का डब्बा

स्टैनली का डब्बा हा चित्रपट पाहीला . .. आवडला . चित्रपटाच्या शेवटी एक नोटीस येते . " या चित्रपटाचे शूटींग विद्यार्थ्यांच्या खूप मधल्या सुट्ट्या ( रिसेस ) अ र्थात फ़ार वेळ खर्च न करता; एक वर्कशॊप म्हणून सुट्टीच्या दिवसातच म्हणजे फ़क्त एका वीकेंड मध्ये केले गेले आहे" . सध्याच्या व्यावसायीक सिनेमा मध्ये अश्या प्रकारचा चित्रपट बनवून लोकांपर्यंत पोहोचवायला एक धैर्य लागतं, अमोल गुप्तेचं हे धैर्य चित्रपट संपताना प्रेक्षकात त्यावेळेस एकदम जाणवतं . अमोल गुप्ते तसंच शाळा, शिक्षक-विद्यार्थी नाते, एका विद्यार्थ्याचीच प्रमुख व्यक्तिरेखा अश्यांमुळे साहजिकच आठवतो तो ’तारे जमिन पर’. दोन्ही चित्रपटातला विरोधाभास हा की स्टॆनली चुणचुणीत, स्वाभिमानी, हुशार आणि विद्यार्थीप्रिय मुलगा तर ’तारे जमिन पर’ मधला दर्शील हा एक डिसलेक्सिक त्यामुळे अभ्यासात मागे, एकटा पडलेला, कुणी न समजून घेतलेला मुलगा. तारे मध्ये शिक्षक-विद्यार्थी असं मैत्रीपूर्ण नातं आहे तर स्टॆनली मध्ये त्याच नात्यातील एक चढाओढ आहे. वास्तविक अमोल गुप्ते हा लहान मुलात व्यावसायिक संबंध असणारा माणूस . मतिमंद ...

जनता आणि अयोध्या

बाबरी मशीद चा निकाल म्हणता म्हणता येउन ठेपलाय. भरपूर ठिकाणी लोकांना निर्णयाबद्दल कुतूहल आहे. हिंदूचे चुकले कि मुस्लिमांचे, कोणाची बाजू नक्की खरी वगैरे; वादविवाद म्हणा किंवा चर्चा म्हणा त्या ऐकू येत आहेत. एकंदरीत १९९२ चे मुंबई bomb blasts, त्यानंतर एकामागून एक घडलेल्या अनेक तश्याच घटना म्हणजे गोधरा, गुजराथ दंगल, सतत उसळणारं मालेगाव - घडत राहिल्या आणि लोकांना त्याची सवय ही होत गेली. २६ नव्हेंबर इथे मुंबई पुन्हा एकदा याच वादातून पोळली गेली. एवढा सगळं होऊन सुद्धा काही लोकांची खुमखुमी काही जात नाहीए . मुळात त्यांना ही गोष्ट जाणवत कशी नाही कि तेच आपल्या हाताने स्वत: चे आयुष्य insecure बनवत आहेत. आज ते वाचले तर उद्या त्यांच्याच पुढल्या पिढीच्या जीवाला विरुद्ध  बाजूने धोका राहणारच आहे.    २७ तारखेची याचिका फेटाळली गेली, आणि दोन्ही बाजूंकडून खुलासे देण्यात आले की कोर्टाचा निर्णय सर्वमान्य असेल. तेव्हा एक गोष्ट डोक्यात आली - की कोर्टाने असा निर्णय दिला तर? वादग्रस्त जमिनीवर रामलल्ला, निर्मोही आखाडा आणि मुस्लीम अत्युच्च संस्था वक्फ या तिघांचाही भारतीय म्हणून हक्क आह...

खिलाडूव्रुत्तीचे कांगारू

शिर्षक वाचून बुचकळ्यात पडलात ना? पडला असाल तरच वाचा, नसाल तर नका वाचू कारण पुढे ऑस्ट्रेलियन खिलाडू व्रुत्तीचे वाभाडे काढायचा माझा मानस आहे.   इ यान चापेल हा जुना ऑस्ट्रेलियन कर्णधार. १९७३  -७४  दरम्यान त्याच्या संघाने न्यूझीलंड दौरा केला  होता.  हा दौरा त्याच्या संघाच्या उर्मट वागण्याने इतका वाजला होता की, काही किवी पत्रकारांनी त्यांना  ’अग्ली ऑस्ट्रेलियन्स’ असे  म्हंटले होते. त्यावर १९७६ मध्ये (हो; या जाहिर उर्मटपणाची सुरुवात तेव्हापासून चालू आहे) त्याने एक लेख लिहिला. त्यात तो म्हणाला, " खरंतर आम्हाला सज्जन संघ म्हणूनच ऒळखले जावे हीच सगळ्यांची इच्छा  असते. मैदानामध्ये उतरताना आमचा संघ कधीच मुद्दामहून ’भडव्यांचे टोळके’(Bunch of bastards) म्हणून ओळखला जावा असं कुणालाच वाटत नाही. ऑस्ट्रेलियन कर्णधार या नात्याने माझं तत्वज्ञान  एकच. मैदानावर ११ ते ६ या वेळात सज्जन राहा...