प्रेमविवाह करायची इच्छा होती (म्हणजे आहे) पण आता तशी आशा सोडून दिल्यातच जमा आहे. पुष्कळ वेळा प्रयत्न झाले, पण दुर्दैवाने (की माझ्या सुदैवाने ते माहित नाही) तडीस मिळवू शकलो नाही. :-D आता काय झालंय, एका वयात स्वत:च्या आवडी निवडींबद्दल आपण इतके निगरगट्ट होतो आणि जशी हवी तशी मुलगी मिळणे आणि मिळालीच तर प्रेम होऊन लग्न होणे एकंदरीतच अवघड आहे हे साहजिकच त्यामुळे जाणवायला लागते. लोकांनाही घाई होते, आणि सतत कानावर ही आणि असली वाक्ये ऐकू येतात - 'आता काय विचार आहे? करून टाक लग्न.' - (कुणीतरी, काका मामा खूप considerate मूड मध्ये असताना), 'तुला काय problem आहे कळत नाही, कर ना लग्न?' - विवाहित मित्र आणि त्यांच्या बायका कोरस मध्ये'.' 'गाढवा, असेल कुणी घोडी तर आण - दाखव मला, घराची गरज काय आहे, कळतंय की नाही?' - इति परमपूज्य - डायरेक्ट तबेल्याचा ambience तयार करतात. 'अरे तुझा बायोडाटा बनव ना आणि दे मला . . .पत्रिके बरोबर दे, किती वेळा सांगितलं! काय तू; इतक्या मैत्रिणीपैकी एकाशी देखील नाही जमवू शकला!' - लग्न होऊन ५ वर्षांपूर्वीच सासरी गेलेलं बहीण नावाचं माझं...
लिहायला घेतले की दररोजचा शीण कमी होतो.... क़ेवळ आणि केवळ त्यासाठीच!