Skip to main content

विदर्भातली भाषा

विदर्भातली भाषा हा मराठीच्या अभ्यासकांचे चर्चा करण्याचा आवडता विषय. पुलंनी पुणेकर, मुंबईकर कि नागपूरकर यातून त्या भाषेचे ठराविक शब्द, हेल ये लोकांपर्यंत पोहोचवून ठेवले. वाढत्या शहरीकरणामुळे आता बरेच लोक इकडे येऊ लागले आहेत. आधीच्या नौकरी दरम्यान माझाही बरयाच नाग्पुराकारांशी संपर्कही आला.

"काय करून राहिला बे?",
"तू थांब, मी येउन राहिलो आहे तिकडे."
"अरे तो कागद घेवून घे"
"एवढा मजा आला ना, बास रे बास! "

हि आणि अश्या प्रकारची काही वाक्ये कायमच कानावर येत असत. गप्पांच्या ओघात, मित्राने निष्कर्ष काढला की नागपूर महाराष्ट्राच्या एका बाजूला आहे, त्यामुळे त्याच्यावर एक प्रकारचा मध्य प्रदेशाच्या हिंदीचाही संस्कार आहे. हिंदीचा प्रभाव तिकडच्या मराठीवर एवढा वाढला असेल की -  थोडे मराठी शब्द वापरून आणि वाक्य रचना हिंदी सारखीच करून नागपुरी मराठी विकसित झाली असेल.

 नागपूरच्या मराठीवर या अश्या हिंदीच्या साच्याचे संस्कार झाले असतील. मग ऐकलेले शब्द, वाक्य जुळवून या थेअरी मध्ये बसताहेत की नाही हे पडताळून पाहिले. बघा ना -

"काय करून राहिला बे?",
क्या कर रहा है?

तू थांब, मी येउन राहिलो आहे तिकडे."
तू रुक, मी आ रहा हू वहां.

"अरे, तो कागद घेवून घे"
 "अरे वो कागज ले ले."

"एवढा मजा आला ना, बास रे बास!
- मजा मधला जा इकडे जाळातला जा, जसा हिंदीत म्हणतात. उरलेले सगळे शब्द हे हिंदीतही आहेत.

आता नवीन विदर्भातल्या मराठीशी काहीच संबंध येत नाही, पण कुठूनतरी आलाच तर त्यांचे शब्द, वाक्य रचना हि हिंदी भाषेशी पडताळून पाहण्याचा छंदच लागला आहे. :)

Comments

Vidarbh Madhya pradeshachya javal ahe mhanun asel..

Popular posts from this blog

गाडी सुरु करणे : भौतिकशास्त्र :)

वाहतूकीच्या जगात तुम्ही थोडेफार सक्रीय असाल तर अशी (नाट्यमय ) अवस्था डोळ्यासमोर आणावयास अजिबात कठीण नाही. तुम्ही दुचाकी वर आहात, आणि लाल सिग्नल आहे म्हणून तुमची दुचाकी बंद करून चौकात बर्‍यापैकी पुढे थांबले आहात. तुमच्या आजूबाजूला चार पाच दुचाक्या,  पाठीमागे एक बस आणि बसच्या मागे डुकरांच्या मागे जशी  पिलावळ असते त्या पद्धतीत दहा-पंधरा दुचाक्या गर्दीत उभ्या आहेत. सिग्नलचा दिवा लालचा हिरवा होताच तुम्ही दुचाकीला किक् मारता, पण दुचाकी तुम्हाला काहीच प्रतिसाद देत नाहीए, मग तुम्ही धडपड करायला लागता आणि तुमच्या मागच्या गाड्या जोरजोरात हॉर्न वाजवून वेळप्रसंगी तुमच्या आई वडीलांचा उद्धार करून 'कचकचून' निषेध नोंदवला जात आहे. दु:स्वप्नच ना? असा हा विचार मनात आला आणि म्हणालो गाडी का सुरू होत नाही याचं कारण बघुया. वास्तविक गाडी सुरु का होत नाही याचा विचार करण्यासाठी मुळात ती कशी सुरु होते हे समजणे  महत्वाचे आहे. त्यातूनही मुलभूत अश्या  गाडीच्या  इंजिनाचा विचार करणे जास्त समर्पक वाटते. जे काही तुटक ज्ञान आहे ते मी इकडे पाजळायचा प्रयत्न चालवणा...

स्टैनली का डब्बा

स्टैनली का डब्बा हा चित्रपट पाहीला . .. आवडला . चित्रपटाच्या शेवटी एक नोटीस येते . " या चित्रपटाचे शूटींग विद्यार्थ्यांच्या खूप मधल्या सुट्ट्या ( रिसेस ) अ र्थात फ़ार वेळ खर्च न करता; एक वर्कशॊप म्हणून सुट्टीच्या दिवसातच म्हणजे फ़क्त एका वीकेंड मध्ये केले गेले आहे" . सध्याच्या व्यावसायीक सिनेमा मध्ये अश्या प्रकारचा चित्रपट बनवून लोकांपर्यंत पोहोचवायला एक धैर्य लागतं, अमोल गुप्तेचं हे धैर्य चित्रपट संपताना प्रेक्षकात त्यावेळेस एकदम जाणवतं . अमोल गुप्ते तसंच शाळा, शिक्षक-विद्यार्थी नाते, एका विद्यार्थ्याचीच प्रमुख व्यक्तिरेखा अश्यांमुळे साहजिकच आठवतो तो ’तारे जमिन पर’. दोन्ही चित्रपटातला विरोधाभास हा की स्टॆनली चुणचुणीत, स्वाभिमानी, हुशार आणि विद्यार्थीप्रिय मुलगा तर ’तारे जमिन पर’ मधला दर्शील हा एक डिसलेक्सिक त्यामुळे अभ्यासात मागे, एकटा पडलेला, कुणी न समजून घेतलेला मुलगा. तारे मध्ये शिक्षक-विद्यार्थी असं मैत्रीपूर्ण नातं आहे तर स्टॆनली मध्ये त्याच नात्यातील एक चढाओढ आहे. वास्तविक अमोल गुप्ते हा लहान मुलात व्यावसायिक संबंध असणारा माणूस . मतिमंद ...

मनोमनी ते याची देही

२६ तारखेला काही इ-मित्रमंडळी 'याची देही याची डोळा' भेटली त्या निमित्ताने . .      कोण कुठले दहा बाराजण भेटण्याचा उत्साह दर्शवतात. कोणाला ही कल्पना सहज शक्य वाटते, कुणी दुविधेत पडतात. दुविधा अशी की जशी मी भेटण्याची तयारी दाखवली, तशी इतर सगळे दाखवतील की नाही? दाखवलीच तर तो माणूस नक्की ती पूर्ण करेल कि नाही! साहजिक आहे - एखादा माणूस 'जेन्युईन' झाला की तो समोरच्या व्यक्तीकडून तशीच अपेक्षा करू लागतो. तरी काहींनी हट्ट सोडला नाही. नेट-भेट ची वाटचाल थेट-भेट च्या दिशेने अंगात आल्यासारखी सुरु केली. अश्या उत्साहाने कि भेट, ग्रेट-भेट झाली नाही तरी पर्वा नव्हती. या दांडग्या उत्साहामुळेच अखेरच्या क्षणी दोन-तीन टाळकी वाढली सुद्धा! तशी सुरुवातीला निमंत्रण दिलेल्यांचा आकडा मोठ्ठा होता, पण का होईना त्याच्या ६० टक्के बझकर तयार झाली. माहिती नाही जगात अशी किती...