परवाच बालगंधर्वमध्ये 'नवा गाडी नवं राज्य' या नाटकाच्या (योगायोगाने) पन्नासाव्या प्रयोगाला हजेरी लावली. लग्न होताच पहिल्या चार - सहा महिन्यांचा गुलाबी काळ कसा संपू लागतो, नंतर 'रुटीन' सुरु होऊ लागतं अन त्याच वेळेस संवादाअभावी काय प्रोब्लेम्स होऊ शकतात, याचंच हे नाटक चित्रण आहे. नाटकाची त्यातल्या त्यात जमलेली गोष्ट म्हणजे संवाद. काही काही वाक्य नकळत मनापासून दाद देवून जातात, आणि असाच अधून मधून डोकावणारा हळूवारपणा वातावरण खूपच हलक करून जातो.
बाकी मी प्रिया बापट (मी शिवाजीराजे... मधली शशिकला भोसले ) चा अभिनय पहायच्या अपेक्षेने गेलो होतो, पण 'ठीके!' अश्याच दर्जाचा तिचा अभिनय आहे. पुण्याच्या भाषेत सांगायचं तर 'बराय'! . छाप पाडून जातो तो हेमंत ढोमे. त्याची देहबोली आणि विनोदाचं टायमिंग छान. एकच भीती आहे; भविष्यात त्याचा रंगमंचावरचा 'मकरंद अनासपुरे' अशी ओळख होऊ नये हीच. देव त्याला अजून वेगवेगळ करायची बुद्धी आणि क्षमता देवो. काही ठिकाणी उमेश कामत कमकुवत वाटतो परंतु थिएटरचा अनुभव त्याच्या देह्बोलितून दिसतो हे प्लस.
सध्याची तरुण पिढी इतकी बिनडोक आहे का आणि जर दहा पैकी दोन लोक बिनडोक असतीलही तर नाटकभर फक्त त्यांच्यासाठी म्हणून वाईट वाटत राहण्यासाठी आपण हे नाटक बघत आहोत का असं मला बर्याचदा वाटलं. दिग्दर्शक, लेखकानी गंडवायचा प्रयत्न केला आहे, असं त्यामुळे नाकारणपणे वाटत राहण्याची शक्यताही आहे. इथून तिथून काही का होवो शेवट गोड होणारे हेही माहित असतं, त्यामुळे तेव्हा आपण कुठे आश्चर्यचकीत वगैरे नाही होत. मुळात मी स्वत: तरुण आहे आणि नाटकामध्ये दाखवलेले समज गैरसमज हे मलाच बालीश वाटले, त्यामुळे नाही त्या विषयावर कशाला वट्वट वटवट असंही मला वाटलं असेल. शिवाय नाटकाच्या कथेमध्ये तेच ते घडत राहत. हिम्मतराव आणि केतकी ही दोन्हि पात्र अजून जास्त केन्द्रस्थानी ठेवायला हवी होती कारण तसा त्यांचा रोल खूप कमी ठिकाणी रेलेव्हंट वाटतो. ऊमेश कामत प्रिया बापट पेक्षा ८ वर्ष वगैरे मोठा नाही वाटत. वाटला असता, तर कथेचा अजून चांगला इंपॅक्ट पडला असता.
आता एवढं असूनही हे नाटक मला 'आवरा' असं वाटलं नाही, याचं कारण या नाटकाला लाभलेली तरुणाई. लेखक, दिग्दर्शक कलाकार सगळीकडे एक युथ एक्झ्युबरन्स आहे. संवाद आजच्या तरुणाईचे आणि चकचकीत नवीन आहेत, त्यामुळे खूप ताजेतवाने वाटत राहते. सगळ्यात महत्वाचं म्हणजे नाटकात दर्शवलेल्या, नायक नायिकेचे आयुष्य श्रोते स्वतःशी रीलेट करू लागतात आणि तिथेच या नाटकाचे यश आहे. बाकी ह्रषिकेश कामेरकरचे संगीत निभावून घेण्याइतपत छान वाटलं.
एकूणात, अजून जास्त ट्विस्ट आणि टर्न्स असते तर नाटक 'अजून' छान झाले असते परंतु एकदा नक्कीच बघण्यासारखं नाटक आहे. प्रथीतयश पारितोषिकांच्या स्पर्धेत या नाटकाला ८ नॉमिनेशन्स आहेत, त्यानिमित्ताने एकदंत क्रिएशन्स आणि निर्माते चंद्रकांत लोहोकर यांसह नवा गाडी नवं राज्य च्या सगळ्या चमूला आगामी वाटचालीसाठी शुभेच्छा!
नाटकाची आंतरजालावरून मिळालेली एक जाहिरात |

डावीकडून - प्राजक्ता दातार, उमेश कामत, हेमंत ढोमे, प्रिया बापट |
एकूणात, अजून जास्त ट्विस्ट आणि टर्न्स असते तर नाटक 'अजून' छान झाले असते परंतु एकदा नक्कीच बघण्यासारखं नाटक आहे. प्रथीतयश पारितोषिकांच्या स्पर्धेत या नाटकाला ८ नॉमिनेशन्स आहेत, त्यानिमित्ताने एकदंत क्रिएशन्स आणि निर्माते चंद्रकांत लोहोकर यांसह नवा गाडी नवं राज्य च्या सगळ्या चमूला आगामी वाटचालीसाठी शुभेच्छा!
Comments
नक्कीच पाहीन आता
हम्म पाहायला हवे एकदा.....
अच्चीत गच्ची, गच्चीत टाकी, टाकीत मासा, माश्यांनी मारला सूर . . . हे तुला माहित असेल तर नक्की बघ. :-P
सांगावं लागतं असं लोकांना, काय करू. :-)
हो बघ....आणि हो, वर बंड्या ला जे काही लिहिलं आहे ते तुला माहित नसेल तरीही बघ. :)
हमिदाबाइची कोठी पहायचं आहे. कधी आणि कुठे लागणार आहे हे सांगितले तर काम होईल. हर्बेरीयम चे नाटका असल्याने फक्त २५ प्रयोगच होतील असा अंदाज आहे. म्हणून सांगतो. विकास ला विचारून कळव मला.