Skip to main content

नवा गडी नवं राज्य

परवाच बालगंधर्वमध्ये 'नवा गाडी नवं राज्य' या नाटकाच्या (योगायोगाने) पन्नासाव्या प्रयोगाला  हजेरी  लावली. लग्न होताच पहिल्या चार - सहा महिन्यांचा गुलाबी काळ कसा संपू लागतो, नंतर 'रुटीन' सुरु होऊ लागतं अन  त्याच वेळेस संवादाअभावी काय  प्रोब्लेम्स होऊ शकतात, याचंच हे  नाटक चित्रण आहे. नाटकाची त्यातल्या त्यात जमलेली गोष्ट म्हणजे संवाद. काही काही वाक्य नकळत मनापासून दाद देवून जातात, आणि असाच अधून मधून डोकावणारा हळूवारपणा वातावरण खूपच हलक करून जातो. 

नाटकाची आंतरजालावरून मिळालेली एक जाहिरात

बाकी मी प्रिया बापट (मी शिवाजीराजे... मधली शशिकला भोसले ) चा अभिनय पहायच्या  अपेक्षेने  गेलो होतो, पण 'ठीके!' अश्याच दर्जाचा तिचा अभिनय आहे. पुण्याच्या भाषेत सांगायचं तर 'बराय'! . छाप पाडून जातो तो हेमंत ढोमे. त्याची देहबोली आणि विनोदाचं टायमिंग छान. एकच भीती आहे; भविष्यात त्याचा रंगमंचावरचा 'मकरंद अनासपुरे' अशी ओळख होऊ नये हीच. देव त्याला अजून वेगवेगळ करायची बुद्धी आणि क्षमता देवो. काही ठिकाणी उमेश कामत कमकुवत वाटतो परंतु थिएटरचा अनुभव त्याच्या देह्बोलितून दिसतो हे प्लस.

सध्याची तरुण पिढी इतकी बिनडोक आहे का आणि जर दहा पैकी दोन लोक बिनडोक असतीलही तर नाटकभर फक्त त्यांच्यासाठी म्हणून वाईट वाटत राहण्यासाठी आपण हे नाटक बघत आहोत का असं मला बर्याचदा वाटलं. दिग्दर्शक, लेखकानी गंडवायचा प्रयत्न केला आहे, असं त्यामुळे नाकारणपणे वाटत राहण्याची शक्यताही आहे.  इथून तिथून काही का होवो शेवट गोड होणारे हेही माहित असतं, त्यामुळे तेव्हा आपण कुठे आश्चर्यचकीत वगैरे नाही होत. मुळात मी स्वत: तरुण आहे आणि नाटकामध्ये दाखवलेले समज गैरसमज हे मलाच बालीश वाटले, त्यामुळे नाही त्या विषयावर कशाला वट्वट वटवट असंही मला वाटलं असेल. शिवाय नाटकाच्या कथेमध्ये तेच ते घडत राहत.  हिम्मतराव आणि केतकी ही दोन्हि पात्र अजून जास्त केन्द्रस्थानी ठेवायला हवी होती कारण तसा त्यांचा रोल खूप कमी ठिकाणी रेलेव्हंट वाटतो. ऊमेश कामत प्रिया बापट पेक्षा ८ वर्ष वगैरे मोठा नाही वाटत. वाटला असता, तर कथेचा अजून चांगला इंपॅक्ट पडला असता.

आता एवढं असूनही हे नाटक मला 'आवरा' असं वाटलं नाही, याचं कारण या नाटकाला लाभलेली तरुणाई. लेखक, दिग्दर्शक कलाकार सगळीकडे एक युथ एक्झ्युबरन्स आहे. संवाद आजच्या तरुणाईचे आणि चकचकीत नवीन आहेत, त्यामुळे खूप ताजेतवाने वाटत राहते. सगळ्यात महत्वाचं म्हणजे नाटकात दर्शवलेल्या, नायक नायिकेचे आयुष्य श्रोते स्वतःशी रीलेट करू लागतात आणि तिथेच या नाटकाचे यश आहे. बाकी ह्रषिकेश कामेरकरचे संगीत निभावून घेण्याइतपत छान वाटलं. 


डावीकडून - प्राजक्ता दातार, उमेश कामत, हेमंत ढोमे, प्रिया बापट

एकूणात, अजून जास्त ट्विस्ट आणि टर्न्स असते तर नाटक 'अजून' छान झाले असते परंतु एकदा नक्कीच बघण्यासारखं नाटक आहे. प्रथीतयश पारितोषिकांच्या स्पर्धेत या नाटकाला ८ नॉमिनेशन्स आहेत, त्यानिमित्ताने एकदंत क्रिएशन्स आणि निर्माते चंद्रकांत  लोहोकर यांसह नवा गाडी नवं राज्य च्या सगळ्या चमूला आगामी वाटचालीसाठी शुभेच्छा!           

Comments

BinaryBandya™ said…
म्हणजे कमीतकमी एकदा तरी बघू शकतो
नक्कीच पाहीन आता
>>मुळात मी स्वत: तरुण आहे :)

हम्म पाहायला हवे एकदा.....
Unknown said…
बंड्या - हो हरकत नाही. एकदा पाहण्या सारखं आहे.

अच्चीत गच्ची, गच्चीत टाकी, टाकीत मासा, माश्यांनी मारला सूर . . . हे तुला माहित असेल तर नक्की बघ. :-P
Unknown said…
इंद्रधनू - :) :)

सांगावं लागतं असं लोकांना, काय करू. :-)

हो बघ....आणि हो, वर बंड्या ला जे काही लिहिलं आहे ते तुला माहित नसेल तरीही बघ. :)
Unknown said…
Khupach sundar abhipray
Unknown said…
Hamidabai chi Kothi...pan paha...changal aaahe natak...Vikas pan aaahe tya madhe
Unknown said…
विशाल धन्यवाद

हमिदाबाइची कोठी पहायचं आहे. कधी आणि कुठे लागणार आहे हे सांगितले तर काम होईल. हर्बेरीयम चे नाटका असल्याने फक्त २५ प्रयोगच होतील असा अंदाज आहे. म्हणून सांगतो. विकास ला विचारून कळव मला.

Popular posts from this blog

गाडी सुरु करणे : भौतिकशास्त्र :)

वाहतूकीच्या जगात तुम्ही थोडेफार सक्रीय असाल तर अशी (नाट्यमय ) अवस्था डोळ्यासमोर आणावयास अजिबात कठीण नाही. तुम्ही दुचाकी वर आहात, आणि लाल सिग्नल आहे म्हणून तुमची दुचाकी बंद करून चौकात बर्‍यापैकी पुढे थांबले आहात. तुमच्या आजूबाजूला चार पाच दुचाक्या,  पाठीमागे एक बस आणि बसच्या मागे डुकरांच्या मागे जशी  पिलावळ असते त्या पद्धतीत दहा-पंधरा दुचाक्या गर्दीत उभ्या आहेत. सिग्नलचा दिवा लालचा हिरवा होताच तुम्ही दुचाकीला किक् मारता, पण दुचाकी तुम्हाला काहीच प्रतिसाद देत नाहीए, मग तुम्ही धडपड करायला लागता आणि तुमच्या मागच्या गाड्या जोरजोरात हॉर्न वाजवून वेळप्रसंगी तुमच्या आई वडीलांचा उद्धार करून 'कचकचून' निषेध नोंदवला जात आहे. दु:स्वप्नच ना? असा हा विचार मनात आला आणि म्हणालो गाडी का सुरू होत नाही याचं कारण बघुया. वास्तविक गाडी सुरु का होत नाही याचा विचार करण्यासाठी मुळात ती कशी सुरु होते हे समजणे  महत्वाचे आहे. त्यातूनही मुलभूत अश्या  गाडीच्या  इंजिनाचा विचार करणे जास्त समर्पक वाटते. जे काही तुटक ज्ञान आहे ते मी इकडे पाजळायचा प्रयत्न चालवणा...

सीबिस्किट

ही एक उत्क्रुष्ट कलाक्रुती पाहण्याचा योग आला. चित्रपटाचे पुढील चार भागात तुकडे पाडले आहेत. सिनेमाच्या पुस्तकातले हे चार वेगवेगळे धडे आहेत असं म्हंटलं तरी काही हरकत नाही. भाग एक - हॊवर्ड कारच्या खरेदी-विक्रीचा याचा व्यवसाय. अपघातात तो आधी त्याचा मुलगा आणि नंतर त्याच्या पत्नीला गमावतो. तसा यशस्वी पण सर्वस्व गमावल्याने खचलेला, कशात काही मन लागत नाही असा.  घोड्यांची पैदास करून शर्यतीचे घोडे वाढवण्याची त्याची इच्छा असते. त्याच्या या धंद्या निमित्ताने  फ़िरत असतानाच त्याला एक स्त्री भेटते आणि दोघांचे लग्नही होते. पुढे एके दिवशी घोड्यांच्या तबेल्यात त्याला स्मिथ नावाचा म्हातारा भेटतो. तो म्हातारा एका घोड्याबरोबर माळरानावर राहत असतो. त्याचा सध्याचा घोडा पुर्वी जायबंदी झालेला असतो त्यामुळे त्याला त्याचा मालक गोळी घालत असताना या म्हातार्या स्मिथनी  वाचवलेला असतो. स्मिथ या प्रसंगी गप्पा मारत असताना हॊवर्ड ला म्हणतो, "You dont throw away your ...

बालगंधर्व

  नारायण श्रीपाद राजहंस. मराठी संस्कृतीला लाभलेली एक विभुती. ’नाट्यसंगीत’ हा प्रकार रुजवणारा, त्याचं बीज मोठं करणारे हा एक गुणी कलावंत. नाट्यसंगीतासाठी या मनुष्यानी अवघं आयुष्य वेचलं. इतकं की सध्याच्या माझ्या पिढीला मराठी संस्कृती आधी की नाट्यसंगीत आधी? असा प्रश्न पडेल. नितिन देसाईक्रुत ’ बालगंधर्व ’ चित्रपट पडद्यावर आला आणि ते हल्लीच घरोघरी पोहोचले, पण जुन्या जाणत्यांना, ज्यांनी त्यांचं गाणं ऐकलं आहे, त्यांनाच खरंतर त्या चित्रपटावर भाष्य करायचा अधिकार आहे असं मला स्पष्टपणे वाटतं. गायकी हा बालगंधर्व ांचा गाभा आहे. त्यामुळे मी अंदाज लावू शकतो, की बाकी सगळं जे आहे ते उत्क्रुष्टपणे दाखवले गेले असेल, त्यामुळे तो अनुभव अर्थात छान आहे. अन म्हणूनच फ़क्त माहितीपट म्हणून तो चांगला आहे. असो. त्यांचा काळ अदमासे शंभर वर्षांपूर्वीचा, पण बालगं धर्वांच्या सुरांमुळेच की काय सगळ्यांनी बालगंधर्व अजूनही मनामध्ये जपला आहे. याबद्दल पुलं म्हणाले होते की, आमच्या उमेदीच्या काळात बालगंधर्व ांचे गाणे ऐकताना आम्ही ज्या ज्या जागांवर जश्या पद्धतीनी दाद दिल्या आहेत, त्याच जाग...