'कलोजस' नावाच्या एका कथेवरून प्रेरणा घेवून - -
तीच ती घामट्ट हवा - कोण खोकतोय - माणसांच्या गर्दीने निर्माण झालेली एक प्रकारची ती उष्णता - गर्दीतच मध्यभागी नदीसारखा वाहणारा माणसांचा प्रवाह - त्या प्रवाहातून वाहत चाललेली माणसे - तो ही त्या प्रवाहातून वाहत जाउ लागतो.
मनात विचार असतात. कायम वाकड्या चालणाऱ्या आणि तिरकट बोलणारया क्लायंटला कसं सांभाळून घ्यावं. हाफिसात पोचल्या पोचल्या पहिला चहाचा कप हाती लागतो. दिवसभर बॉस ची कटकट सहन करून घेताना, डोकं फिरलेल्या क्लायंट बरोबरच्या आणि काहीतरी मार्ग काढून केलेल्या चर्च्या कधी थांबतात कधी अडतात तर कधी फिस्कटतात. टिफिन मधली थंडगार झालेली भाजी पोळी खाउन जीव पुन्हा घाण्याला जुंपलेल्या बैलासारखा इच्छा - निरीच्छेच्या गोत्यात न अडकता जुंपून जातो. संगणकावरची खरडपट्टी, कलीग्जशी झालेले समज - गैरसमज पचवून घेता घेता तो दिवसाभरात किती तरी चहा जिरवतो. संध्याकाळ पर्यंत त्याचा जीव उबगलेला असतो. पुन्हा तोच प्रवास पुन्हा ती बसची गर्दी, पुन्हा लोकलच्या फलाटावरचा हैदोस, जीव कितीही घुटलेला असला तरी ति घुसमट तो सहन करायचा. इतर सगळयांसारखीच सवयच झाली होती म्हणा ना! तास दीड तासाच्या या रेटारेटीतून पुरता जीव पिरगळून गेला होता.
त्याच्या मनात दाबून टाकलेले विचार ज्वालामुखी सारखे वर येतात. कुठलं दुष्टचक्र आहे हे! 'मी' कुठे शिल्लक राहिलो आहे का? माझी रसिकता, कलासक्ती, आवड, निवड कुठे गेली. या धोपट मार्गात तर मी हरवलो नाही ना? अश्या विचारात त्याचं डोकं भड्भडून जात असतं. हलकीशी शिरशिरी यायला सुरुवात झालेली असते.
दमलेल्या मनाने येता येता भेंडी, वांगं, दुधी भोपळा अशी भाजी विकत घेतो. आता चालता चालता त्याल घर दिसतं. थकलेल्या शरीराने तो बेल वाजवतो. आत आल्या आल्या चिमुकले हात त्याचे स्वागत करतात. "बाबा, आज माहितीये शाळेत काय झालं?" - तो चिमुरडा आवाज उत्साहाने सांगू लागतो. त्याची कळी खुलायला लागते.
"ओजसा, बाबा इतका दमून आलाय ना, त्याला नीट बसून तर दे की आधी"; ओजसाची आई चहाचा कप त्याच्या हाती देत मुलीला दटावते. अचानक त्याला मळभ दूर सारलं जातंय अशी जाणीव होउ लागते त्यामुळे त्याला अंगात बरंच बळ आल्यासारखं वाटत. तो आवरतो, जेवून घेतो, बसल्या बसल्या त्याला कधीतरी डुलकी लागली असते.
"किती दमतोस रे आमच्या सगळ्यांसाठी!" - त्याच्या केसातून आपले थरथरणारे हात फिरवता फिरवता त्याची आई म्हणते.
तो झोपेतून हलकाच जागा होतो आणि दुसर्या दिवसाची तयारी करू लागतो आणि काही वेळातच समाधाने पलंगावर निद्राधीन होतो.
Comments
Fan hoto ahe tumcha mi.
Vaishali - Dhans
Rewati - Thanks, halli kami gharat hota pan asa bahutek.
NiVy - Dhans
Prachi - ardhyaparyant mhanaje?
pudhchee goshta wegalee asate ka tuzya kade?
anaamik 2 - Manapaasoon dhanywad, khoop mothi compliment dilyaa baddal.
भेंडी, वांगी, दुधी भोपळा - एकदम मजेदार वाटतं. :D