Skip to main content

समाधानी जिणं



'कलोजस' नावाच्या एका कथेवरून प्रेरणा घेवून - -  

तीच ती घामट्ट हवा - कोण खोकतोय - माणसांच्या गर्दीने निर्माण झालेली एक प्रकारची ती उष्णता - गर्दीतच मध्यभागी नदीसारखा वाहणारा माणसांचा प्रवाह - त्या प्रवाहातून वाहत चाललेली माणसे -  तो ही त्या प्रवाहातून वाहत जाउ लागतो.

मनात विचार असतात. कायम वाकड्या चालणाऱ्या आणि तिरकट बोलणारया क्लायंटला कसं सांभाळून घ्यावं. हाफिसात पोचल्या पोचल्या पहिला चहाचा कप हाती लागतो. दिवसभर बॉस ची कटकट सहन करून घेताना, डोकं फिरलेल्या क्लायंट बरोबरच्या आणि काहीतरी मार्ग काढून केलेल्या चर्च्या कधी थांबतात कधी अडतात तर कधी फिस्कटतात. टिफिन मधली थंडगार झालेली भाजी पोळी खाउन जीव पुन्हा घाण्याला जुंपलेल्या बैलासारखा इच्छा - निरीच्छेच्या गोत्यात न अडकता जुंपून जातो. संगणकावरची  खरडपट्टी, कलीग्जशी झालेले समज - गैरसमज पचवून घेता घेता तो दिवसाभरात किती तरी चहा जिरवतो. संध्याकाळ पर्यंत त्याचा जीव उबगलेला असतो. पुन्हा तोच प्रवास पुन्हा ती बसची गर्दी, पुन्हा लोकलच्या फलाटावरचा हैदोस, जीव कितीही घुटलेला असला तरी ति घुसमट तो सहन करायचा.  इतर सगळयांसारखीच सवयच झाली होती म्हणा ना!  तास दीड तासाच्या या रेटारेटीतून पुरता जीव पिरगळून गेला होता.

त्याच्या मनात दाबून टाकलेले विचार ज्वालामुखी सारखे वर येतात. कुठलं दुष्टचक्र आहे हे! 'मी' कुठे शिल्लक राहिलो आहे का? माझी रसिकता, कलासक्ती, आवड, निवड कुठे गेली. या धोपट मार्गात तर मी हरवलो नाही ना? अश्या विचारात त्याचं डोकं भड्भडून जात असतं. हलकीशी शिरशिरी यायला सुरुवात झालेली असते.

दमलेल्या मनाने येता येता भेंडी, वांगं, दुधी भोपळा अशी भाजी विकत घेतो. आता चालता चालता त्याल घर दिसतं. थकलेल्या शरीराने तो बेल वाजवतो. आत आल्या आल्या चिमुकले हात त्याचे स्वागत करतात. "बाबा, आज माहितीये शाळेत काय झालं?" - तो चिमुरडा आवाज उत्साहाने सांगू लागतो. त्याची कळी खुलायला लागते.

"ओजसा, बाबा इतका दमून आलाय ना, त्याला नीट बसून तर दे की आधी"; ओजसाची आई चहाचा कप त्याच्या हाती देत मुलीला दटावते. अचानक त्याला मळभ दूर सारलं जातंय अशी जाणीव होउ लागते त्यामुळे त्याला अंगात बरंच बळ आल्यासारखं वाटत.  तो आवरतो, जेवून घेतो, बसल्या बसल्या त्याला कधीतरी डुलकी लागली असते.

"किती दमतोस रे आमच्या सगळ्यांसाठी!" - त्याच्या केसातून आपले थरथरणारे हात फिरवता फिरवता त्याची आई म्हणते.

तो झोपेतून हलकाच जागा होतो आणि दुसर्‍या दिवसाची तयारी करू लागतो आणि काही वेळातच समाधाने पलंगावर निद्राधीन होतो.       

Comments

Anonymous said…
वा मित्रा, मस्तच लिहिले आहे.
Rewati said…
Sundar lihilays.... exactly what happens..
Prachi said…
मस्त... माझीच स्टोरी वाटली अर्ध्यापर्यंत.....
Anonymous said…
Hatash manasthitoon baaher chhan aanlas bagh.

Fan hoto ahe tumcha mi.
Unknown said…
Anaamik 1 - Dhanywaad anamikaa

Vaishali - Dhans

Rewati - Thanks, halli kami gharat hota pan asa bahutek.

NiVy - Dhans

Prachi - ardhyaparyant mhanaje?

pudhchee goshta wegalee asate ka tuzya kade?

anaamik 2 - Manapaasoon dhanywad, khoop mothi compliment dilyaa baddal.
सुंदर लिहिलेयस ... :)
भेंडी, वांगी, दुधी भोपळा - एकदम मजेदार वाटतं. :D

Popular posts from this blog

गाडी सुरु करणे : भौतिकशास्त्र :)

वाहतूकीच्या जगात तुम्ही थोडेफार सक्रीय असाल तर अशी (नाट्यमय ) अवस्था डोळ्यासमोर आणावयास अजिबात कठीण नाही. तुम्ही दुचाकी वर आहात, आणि लाल सिग्नल आहे म्हणून तुमची दुचाकी बंद करून चौकात बर्‍यापैकी पुढे थांबले आहात. तुमच्या आजूबाजूला चार पाच दुचाक्या,  पाठीमागे एक बस आणि बसच्या मागे डुकरांच्या मागे जशी  पिलावळ असते त्या पद्धतीत दहा-पंधरा दुचाक्या गर्दीत उभ्या आहेत. सिग्नलचा दिवा लालचा हिरवा होताच तुम्ही दुचाकीला किक् मारता, पण दुचाकी तुम्हाला काहीच प्रतिसाद देत नाहीए, मग तुम्ही धडपड करायला लागता आणि तुमच्या मागच्या गाड्या जोरजोरात हॉर्न वाजवून वेळप्रसंगी तुमच्या आई वडीलांचा उद्धार करून 'कचकचून' निषेध नोंदवला जात आहे. दु:स्वप्नच ना? असा हा विचार मनात आला आणि म्हणालो गाडी का सुरू होत नाही याचं कारण बघुया. वास्तविक गाडी सुरु का होत नाही याचा विचार करण्यासाठी मुळात ती कशी सुरु होते हे समजणे  महत्वाचे आहे. त्यातूनही मुलभूत अश्या  गाडीच्या  इंजिनाचा विचार करणे जास्त समर्पक वाटते. जे काही तुटक ज्ञान आहे ते मी इकडे पाजळायचा प्रयत्न चालवणा...

सीबिस्किट

ही एक उत्क्रुष्ट कलाक्रुती पाहण्याचा योग आला. चित्रपटाचे पुढील चार भागात तुकडे पाडले आहेत. सिनेमाच्या पुस्तकातले हे चार वेगवेगळे धडे आहेत असं म्हंटलं तरी काही हरकत नाही. भाग एक - हॊवर्ड कारच्या खरेदी-विक्रीचा याचा व्यवसाय. अपघातात तो आधी त्याचा मुलगा आणि नंतर त्याच्या पत्नीला गमावतो. तसा यशस्वी पण सर्वस्व गमावल्याने खचलेला, कशात काही मन लागत नाही असा.  घोड्यांची पैदास करून शर्यतीचे घोडे वाढवण्याची त्याची इच्छा असते. त्याच्या या धंद्या निमित्ताने  फ़िरत असतानाच त्याला एक स्त्री भेटते आणि दोघांचे लग्नही होते. पुढे एके दिवशी घोड्यांच्या तबेल्यात त्याला स्मिथ नावाचा म्हातारा भेटतो. तो म्हातारा एका घोड्याबरोबर माळरानावर राहत असतो. त्याचा सध्याचा घोडा पुर्वी जायबंदी झालेला असतो त्यामुळे त्याला त्याचा मालक गोळी घालत असताना या म्हातार्या स्मिथनी  वाचवलेला असतो. स्मिथ या प्रसंगी गप्पा मारत असताना हॊवर्ड ला म्हणतो, "You dont throw away your ...

बालगंधर्व

  नारायण श्रीपाद राजहंस. मराठी संस्कृतीला लाभलेली एक विभुती. ’नाट्यसंगीत’ हा प्रकार रुजवणारा, त्याचं बीज मोठं करणारे हा एक गुणी कलावंत. नाट्यसंगीतासाठी या मनुष्यानी अवघं आयुष्य वेचलं. इतकं की सध्याच्या माझ्या पिढीला मराठी संस्कृती आधी की नाट्यसंगीत आधी? असा प्रश्न पडेल. नितिन देसाईक्रुत ’ बालगंधर्व ’ चित्रपट पडद्यावर आला आणि ते हल्लीच घरोघरी पोहोचले, पण जुन्या जाणत्यांना, ज्यांनी त्यांचं गाणं ऐकलं आहे, त्यांनाच खरंतर त्या चित्रपटावर भाष्य करायचा अधिकार आहे असं मला स्पष्टपणे वाटतं. गायकी हा बालगंधर्व ांचा गाभा आहे. त्यामुळे मी अंदाज लावू शकतो, की बाकी सगळं जे आहे ते उत्क्रुष्टपणे दाखवले गेले असेल, त्यामुळे तो अनुभव अर्थात छान आहे. अन म्हणूनच फ़क्त माहितीपट म्हणून तो चांगला आहे. असो. त्यांचा काळ अदमासे शंभर वर्षांपूर्वीचा, पण बालगं धर्वांच्या सुरांमुळेच की काय सगळ्यांनी बालगंधर्व अजूनही मनामध्ये जपला आहे. याबद्दल पुलं म्हणाले होते की, आमच्या उमेदीच्या काळात बालगंधर्व ांचे गाणे ऐकताना आम्ही ज्या ज्या जागांवर जश्या पद्धतीनी दाद दिल्या आहेत, त्याच जाग...