सानिकाचा आठवा वाढदिवस या रविवारी येत होता. भेटवस्तू मिळणार, लाड होणार याचा सगळा विचार करून सानिकाला काय करू आणि काय नको असं झालं होता. सानिकाची आई आता यशस्वी स्त्री असली तरी मध्यमवर्गीय घरातीलच होती. तिने ती लहान असताना केक वगैरे कापून वाढदिवस नव्हता साजरा केला, पण म्हणूनच असेल तिने सानिकाचे कमी लाड केले नव्हते. ऑफिस मधून आल्यावर जेवण बनवताना सानिकाच्या आईने सानिकाचा पापा घेतला आणि लाडातच विचारले, "एका मुलीचं काय आहे, या रविवारी!" सानिकाला पुन्हा एकदा वाढदिवसाची आठवण झाली आणि चेहरा गुलाबाच्या कळीसारखा खुलला." "ए सानिका, सांग ना काय काय करायचं आपण तुझ्या वाढदिवसाला?" - आईने लाड सुरु ठेवले. "सानिका, तुला अंगूर मलई आवडते ना, मग आपण अंगूर मलई, पुरी आणि पुलाव ठेवू, रिटर्न गिफ्ट म्हणून मुलांना छोटी छोटी झाडं देवू ." - सानिकाची आई हळूहळू सानिकापेक्षा स्वत:मध्येच रमायला लागली...
लिहायला घेतले की दररोजचा शीण कमी होतो.... क़ेवळ आणि केवळ त्यासाठीच!