Skip to main content

हुरहुरण्याचे खेळ

ऑफिस सुटले की घरी जाण्याच्या रस्त्यात मोजून ७ व्या मिनिटाला ती हमखास दिसायचीच. तिच्याशी नजरानजर झाली की बास! काळीज एक ठोका चुकवायचं. या चुकणार्या ठोक्याचे अडीक्शनच  बसले होते म्हणा ना. संध्याकाळ झाली की तिच्या एका नजरे पायी जीव कासावीस व्हायचा. ती सुद्धा काही कमी नव्हती, अगदी डोळ्यात डोळे घालून बघायची, अशी खात्री व्हायची की 'आग दोनो बाजू बराबर लगी हुई है!' तिचे हलके काजळ लावलेले डोळे माझ्या हृदयाचा घोट घ्यायला बघायचे. तिचे ते भुरभुरणारे केस, तिच्या चमकदार आणि गोऱ्यापान कांतीला जास्तीच उजळून टाकायचे. तिचे ओठ तर विचारू नका - आय हाय! खरं विचाराल तर माझा अख्खा दिवस तिच्यामुळेच चालायचा. तिथे गेलं की ती तिच्या नजरेतून विचारपूस करतीये असं जाणवायचं. कधी एकदा कचेरीतली कामं आटपून तिच्याशी नजरानजर करायला जातो असे व्हायचे. 

असाच त्या दिवशी लगबगीने ऑफिसातल्या मित्रांना बाय करून निघालो. माहित नाही का पण दिवसभर तिनी हुरहूर लावली होती. काहीतरी वाईट घडणार असं वाटत होतं. धाकधूक अचानक खूप वाढली होती. कधी एकदा तिला पाहतो असं झालं होतं. चेहऱ्यावरची रेघ न हलवता आणि काही झालंच नाही अश्या अविर्भावात मी माझ्या दुचाकीकडे कूच केले. लवकरात लवकर किक मारून गाडीचा कर्णा पिरगाळला आणि गाडी झेपावली.

मोजून पाचव्या वळणावर उजव्या बाजूला ती दिसायची. आज ७ मिनिटे म्हणजे ७ युग गेल्यासारखी वाटत होती. गाड्यांच्या गर्दीत मी माझी गाडी पुढे रेटत निघालो. पाचवं वळण आलं, आणि माझ्या पायातली ताकदच निघून गेली. मी विश्वात हरवलेल्या वेड्या माणसासारखा इकडे तिकडे बघू लागलो. ती कुठेच दिसत नव्हती. माझा जीव घाबराघुबरा झाला, घसा कोरडा पडला, हात पाय थरथरायला लागले. मागून एक चारचाकीवाला मोठमोठ्याने त्याचा हॉर्न वाजवत होता, पण माझे कानच काही क्षण बधीर झाले होते. मला ती कुठेच दिसत नव्हती. एकदम शुद्धीवर आल्यासारखा झालो. आजूबाजूच्या परिस्थितीची तेव्हा कुठे जाणीव झाली.   गाडी रस्त्याच्या कडेला नेली - तिथे एक छोटेखानी जनरल स्टोअर्स होते. थोडे पाणी घेतले.

जरासं बरं वाटायला लागल्यावर पूर्ण धीर एकवटून, आणि काकूळत्या चेहऱ्याने दुकानदाराला प्रश्न विचारला,

"रस्त्याच्या पलीकडच्या बिल्डींगवरचे कतरिना कैफचे मॅंगो स्लाइस्च्या 'आमसुत्र'  जाहिरातीचे पोस्टर कधी काढले हो?"

:-D

Comments

Nivedita Raj said…
lay bhari ! agadi hurhur lagali jeevala :)
BinaryBandya™ said…
पोपट केला आमचा राव ...
चांगला झालाय लेख ...
MAST POPAT JHALA.........AAMCHA KITI KALAJI PURVAK VACHAT HOTO.......
Unknown said…
He he he! Thank you all!

Nivy - Tula pan laglee ka hurhur? hehe
Bandya - welcome aboard & thanks!
Amar, Prachi, Thank you!

Twist in the tail!
Yogesh said…
अरे रे.....एम टीवी बकरा झाला की... :) :)

मस्त लिहला आहेस.
मजा आली रे वाचताना...

Popular posts from this blog

गाडी सुरु करणे : भौतिकशास्त्र :)

वाहतूकीच्या जगात तुम्ही थोडेफार सक्रीय असाल तर अशी (नाट्यमय ) अवस्था डोळ्यासमोर आणावयास अजिबात कठीण नाही. तुम्ही दुचाकी वर आहात, आणि लाल सिग्नल आहे म्हणून तुमची दुचाकी बंद करून चौकात बर्‍यापैकी पुढे थांबले आहात. तुमच्या आजूबाजूला चार पाच दुचाक्या,  पाठीमागे एक बस आणि बसच्या मागे डुकरांच्या मागे जशी  पिलावळ असते त्या पद्धतीत दहा-पंधरा दुचाक्या गर्दीत उभ्या आहेत. सिग्नलचा दिवा लालचा हिरवा होताच तुम्ही दुचाकीला किक् मारता, पण दुचाकी तुम्हाला काहीच प्रतिसाद देत नाहीए, मग तुम्ही धडपड करायला लागता आणि तुमच्या मागच्या गाड्या जोरजोरात हॉर्न वाजवून वेळप्रसंगी तुमच्या आई वडीलांचा उद्धार करून 'कचकचून' निषेध नोंदवला जात आहे. दु:स्वप्नच ना? असा हा विचार मनात आला आणि म्हणालो गाडी का सुरू होत नाही याचं कारण बघुया. वास्तविक गाडी सुरु का होत नाही याचा विचार करण्यासाठी मुळात ती कशी सुरु होते हे समजणे  महत्वाचे आहे. त्यातूनही मुलभूत अश्या  गाडीच्या  इंजिनाचा विचार करणे जास्त समर्पक वाटते. जे काही तुटक ज्ञान आहे ते मी इकडे पाजळायचा प्रयत्न चालवणा...

पानवाला आणि पान

पान ही आपल्या देशाला लाभलेली एक सांस्कृतिक देणगी आहे . नीट पाहिलं, तर आपल्या पुराणातच कितीतरी ठिकाणी तांबूल - भक्षण करणारे सूर - असुर सापडतील . आजही नैवेद्या बरोबर विडा द्यायची पद्धत आहेच की . यावरून आठवलं , लहानपणी मी माहूरच्या देवीच्या दर्शनासाठी गेलो होतो . तिथे देवीच्या तोंडात विडा ठेवण्याची पद्धत आहे . तो विडा काढला कि गरम झालेला असतो असंही म्हणतात . आता हा श्रद्धाश्रद्धेचा भाग झाला , पण मुखातला विडा परत काढावाच कशाला ? असा रास्त प्रश्न मला आता पडतो. सांगायचा उद्देश एवढाच की विड्याची ही परंपरा पुष्कळ जुनी आहे . मराठी व्याकरणातही सुपारी देणे , विडा उचलणे असे काही अजूनही येणारे वाकप्रचार आहेत की . दत्तप्रबोधामध्येही पानाची तमोगुणी अशी उपमा आहे . त्यात म्हंटले आहे की , कीर्तनी तांबूल भक्षण । तें रजस्वलेचें शोणित जाण । कागजन्म तयालागून । करी भक्षण नरक मांस . त्यामुळे आपल्या संस्कृतीमध्ये पान जेवढे जुने तेवढेच पिचकारी मारणारे थुंक - संप्रदायी ही जुनेच आहेत हे कळून च...

बालगंधर्व

  नारायण श्रीपाद राजहंस. मराठी संस्कृतीला लाभलेली एक विभुती. ’नाट्यसंगीत’ हा प्रकार रुजवणारा, त्याचं बीज मोठं करणारे हा एक गुणी कलावंत. नाट्यसंगीतासाठी या मनुष्यानी अवघं आयुष्य वेचलं. इतकं की सध्याच्या माझ्या पिढीला मराठी संस्कृती आधी की नाट्यसंगीत आधी? असा प्रश्न पडेल. नितिन देसाईक्रुत ’ बालगंधर्व ’ चित्रपट पडद्यावर आला आणि ते हल्लीच घरोघरी पोहोचले, पण जुन्या जाणत्यांना, ज्यांनी त्यांचं गाणं ऐकलं आहे, त्यांनाच खरंतर त्या चित्रपटावर भाष्य करायचा अधिकार आहे असं मला स्पष्टपणे वाटतं. गायकी हा बालगंधर्व ांचा गाभा आहे. त्यामुळे मी अंदाज लावू शकतो, की बाकी सगळं जे आहे ते उत्क्रुष्टपणे दाखवले गेले असेल, त्यामुळे तो अनुभव अर्थात छान आहे. अन म्हणूनच फ़क्त माहितीपट म्हणून तो चांगला आहे. असो. त्यांचा काळ अदमासे शंभर वर्षांपूर्वीचा, पण बालगं धर्वांच्या सुरांमुळेच की काय सगळ्यांनी बालगंधर्व अजूनही मनामध्ये जपला आहे. याबद्दल पुलं म्हणाले होते की, आमच्या उमेदीच्या काळात बालगंधर्व ांचे गाणे ऐकताना आम्ही ज्या ज्या जागांवर जश्या पद्धतीनी दाद दिल्या आहेत, त्याच जाग...