प्रस्तावना
प्रस्तुत लेख हा 'महाराष्ट्र टाईम्स' वर १७ नव्हेंबर रोजी इंटरनेट वर प्रसिद्ध झाला. माणसात रमणाऱ्या आणि माणसं शोधणाऱ्या सुधीर गाडगीळ यांच्या मिश्कील शैली मध्येच हे लेखन आहे. दोघांचाही मन:पूर्वक मान राखून येथे संदर्भ देत आहे.गोखले आजोबांच्या मृतात्म्याला ईश्वर शांती देवो हीच माझी मनोकामना आहे. त्यांच्या कडून कळत-नकळत झालेल्या स्वास्थ्य आणि आरोग्याच्या प्रचाराबद्दल मी मूषकाच्या वाट्याची का होईना कृतज्ञता व्यक्त करायचा प्रयत्न केला आहे. एवढ्याच प्रामाणिक उद्देशातून . . .
शाळेत असताना 'ठकठक', 'चांदोबा', भा.रा.भागवत, आणि तत्सम पाक्षिके, मासिके, साप्ताहिके इत्यादी मराठी बाल साहित्य विकत घेण्यासाठी आम्ही मुले यांच्या दुकानात जात असू. पूर्वी पेरूगेट पोलीस चौकी ते भरत नाट्य मंदिर या छोट्या रस्त्याच्या मध्यभागी एक जुनी सागवानी लाकडाची चौकट असलेलं, शहाबादी फरशी चा ओटा वजा पार एवढी साधारण उंची असलेलं दुकान होतं. त्या चौकटीजवळ इंग्रजी, मराठी, दैनिकांची शिस्तबद्धपणे मांडणी करून त्याच्या शेजारीच हे आजोबा जमिनीवरच बसलेले दिसत. गोष्टीतले आजोबा असतात तसे मात्र हे आजोबा लाड वगैरे करताना कधीच दिसले नाहीत मात्र, मुलांची गर्दी झाली आणि, "हे पुस्तक केवढ्याला?, आणि हे?" असे सतत प्रश्न विचारणाऱ्या आणि किलबिलाट करणाऱ्या मुलांना अगदी शांतपणे किंमतही सांगत असत. बरं आमची शाळा भावे स्कूल, म्हणजे 'बेरकी' मुलांसाठी प्रसिद्धच! क्वचित प्रसंगी त्या गर्दीत कोण मुलांच्यात मतभेद झाले, आणि त्याचे प्रत्यंतर आजोबांच्या उपस्थितीमध्ये एखाद्या शिवी बिवित झाले, की मात्र वरपक्षी म्हाताऱ्या दिसणारया या आजोबांच्या तोंडातून कडाडून आणि खणखणीत आक्षेप ऐकू यायचा. अश्या वेळेस ती मुले त्यांच्या आई वडिलांना कधी घाबरली नसतील अशी गोखले आजोबाना घाबरायची.
सौजन्य व साभार : महाराष्ट्र टाईम्स |
हे स्वातंत्र्य सैनिक असलेले आजोबा खूप व्यायाम करतात. ते लोणावळ्याला दर रविवारी पळत जातात, आणि मग खडकवासला -सिंहगड - खेड शिवापूर असे करत करत पुण्यात परततात; वयाच्या नव्वदीतही ते पर्वती चढू शकतात अश्या एक ना एक बऱ्याच गोष्टी ऐकल्या होत्या. हे कुठून ऐकले असावे हेही नेमके लक्षात नाही.
ते जेव्हा उभे असायचे तेव्हा त्यांच्या पायांचे घोटे टेकलेले असत, आणि दोन्ही गुडघ्यांमध्ये साधारण एक लहान वीतभर एवढं अंतर असे. असलं काटक शरीर पाहून साहजिकच विश्वास बसायचा आणि आश्चर्यही वाटायचे. जेंव्हा त्यांनी शताब्दी मध्ये पदार्पण केले होते तेव्हा सकाळ मध्ये त्यांच्यावर एक मोठा लेख आलं होता, तेव्हाच त्यांच्या या सगळ्या गोष्टींची खात्री झाली. एवढ सगळा वाचल्यानंतर, जाणून घेतल्या नंतर असं जाणवत आहे की एवढ्या वर्षात आजोबांनी आम्हा मुलांसमोर कधीही व्यायामाचा बडेजाव तर सोडा पण सुतोवाचही केला नाही.
ते जेव्हा उभे असायचे तेव्हा त्यांच्या पायांचे घोटे टेकले
Comments