ऑफिस सुटले की घरी जाण्याच्या रस्त्यात मोजून ७ व्या मिनिटाला ती हमखास दिसायचीच. तिच्याशी नजरानजर झाली की बास! काळीज एक ठोका चुकवायचं. या चुकणार्या ठोक्याचे अडीक्शनच बसले होते म्हणा ना. संध्याकाळ झाली की तिच्या एका नजरे पायी जीव कासावीस व्हायचा. ती सुद्धा काही कमी नव्हती, अगदी डोळ्यात डोळे घालून बघायची, अशी खात्री व्हायची की 'आग दोनो बाजू बराबर लगी हुई है!' तिचे हलके काजळ लावलेले डोळे माझ्या हृदयाचा घोट घ्यायला बघायचे. तिचे ते भुरभुरणारे केस, तिच्या चमकदार आणि गोऱ्यापान कांतीला जास्तीच उजळून टाकायचे. तिचे ओठ तर विचारू नका - आय हाय! खरं विचाराल तर माझा अख्खा दिवस तिच्यामुळेच चालायचा. तिथे गेलं की ती तिच्या नजरेतून विचारपूस करतीये असं जाणवायचं. कधी एकदा कचेरीतली कामं आटपून तिच्याशी नजरानजर करायला जातो असे व्हायचे.
असाच त्या दिवशी लगबगीने ऑफिसातल्या मित्रांना बाय करून निघालो. माहित नाही का पण दिवसभर तिनी हुरहूर लावली होती. काहीतरी वाईट घडणार असं वाटत होतं. धाकधूक अचानक खूप वाढली होती. कधी एकदा तिला पाहतो असं झालं होतं. चेहऱ्यावरची रेघ न हलवता आणि काही झालंच नाही अश्या अविर्भावात मी माझ्या दुचाकीकडे कूच केले. लवकरात लवकर किक मारून गाडीचा कर्णा पिरगाळला आणि गाडी झेपावली.
मोजून पाचव्या वळणावर उजव्या बाजूला ती दिसायची. आज ७ मिनिटे म्हणजे ७ युग गेल्यासारखी वाटत होती. गाड्यांच्या गर्दीत मी माझी गाडी पुढे रेटत निघालो. पाचवं वळण आलं, आणि माझ्या पायातली ताकदच निघून गेली. मी विश्वात हरवलेल्या वेड्या माणसासारखा इकडे तिकडे बघू लागलो. ती कुठेच दिसत नव्हती. माझा जीव घाबराघुबरा झाला, घसा कोरडा पडला, हात पाय थरथरायला लागले. मागून एक चारचाकीवाला मोठमोठ्याने त्याचा हॉर्न वाजवत होता, पण माझे कानच काही क्षण बधीर झाले होते. मला ती कुठेच दिसत नव्हती. एकदम शुद्धीवर आल्यासारखा झालो. आजूबाजूच्या परिस्थितीची तेव्हा कुठे जाणीव झाली. गाडी रस्त्याच्या कडेला नेली - तिथे एक छोटेखानी जनरल स्टोअर्स होते. थोडे पाणी घेतले.
जरासं बरं वाटायला लागल्यावर पूर्ण धीर एकवटून, आणि काकूळत्या चेहऱ्याने दुकानदाराला प्रश्न विचारला,
"रस्त्याच्या पलीकडच्या बिल्डींगवरचे कतरिना कैफचे मॅंगो स्लाइस्च्या 'आमसुत्र' जाहिरातीचे पोस्टर कधी काढले हो?"
:-D

Comments
चांगला झालाय लेख ...
Nivy - Tula pan laglee ka hurhur? hehe
Bandya - welcome aboard & thanks!
Amar, Prachi, Thank you!
Twist in the tail!
मस्त लिहला आहेस.