दबंग आला, चालला आणि गेला. आता तीस मार खान येत आहे. कदाचित तोही चालेल आणि जाईल, पण दोन्ही चित्रपटांना जोडणारा एक दुवा आहे. तो म्हणजे त्यातील आयटेम सॉंग! कदाचित या दोन्ही गाण्यांची प्रदर्शन होण्याची तारीख इतकी एका पाठोपाठ होती त्यामुळेच लोक त्यांची तुलना करू लागले असतील. हा प्रश्न कुठून आला माहित नाही, पण बर्याचदा मुन्नी श्रेष्ट कि आता येउ घातलेली शीला श्रेष्ठ याची लाळ गाळत लोक चर्चा लुटतात. (माझ्या मते फारा खान चा हा स्टंट असू शकेल कारण दोन्ही गाणी तिनीच नृत्यदिग्दर्शित केली आहेत.) माझ्यासाठी हा प्रश्नच अवैध आहे म्हणा. खरतर दोन्हीची तुलना होऊच शकत नाही कारण मुन्नी ला त्याच्या सेट मुळे, त्याच्या मधलं 'डार-लिंग' या शब्दामुळे आणि नाचाच्या स्टेप्स मुळे त्याला अगदी देशी फील आहे, तर शीला म्हणजे पूर्णपणे अमेरीकानाईस्ड आहे, त्यातले अर्धे शब्द पहिल्यांदा ऐकताना कळतही...
लिहायला घेतले की दररोजचा शीण कमी होतो.... क़ेवळ आणि केवळ त्यासाठीच!