काही माणसांचा मला फार हेवा वाटतो. ज्यांच्याकडे नवनिर्मिती किंवा कल्पक विचार करण्याची अद्भूत क्षमता असते तसे लोक. त्यातूनही ज्यांच्या विचारात जग बदलायची ताकद असेल ते लोक तर विचारूच नका. परंपरावादी, कट्टरपंथीयांच्या काळात चार्ल्सचा एका खानदानी घराण्यात जन्म झाला. बरं त्याचं खानदान हे जुनं ब्रिटीश घराणं. म्हणजे पोकळ रुबाब मिरवणारे नमुनेदार घर. वडील डॉक्टर आणि जमीनदार. चार्ल्सला रुबाब दाखवणे सोडाच, अभ्यास करणेही जमेना. शाळा कशीबशी पूर्ण करून, वडिलांच्या दबावाखाली त्याने वैद्यकीय शाळेत प्रवेश घेतला. वडिलांच्या हट्टापायी त्याने मेडिकलला एक वर्ष कसं बसं काढलं. अभ्यास कधीच केला नाही. परिणामी, वडिलांना विद्यापीठाकडून पत्र आले, कि तुमच्या मुलाचे शिक्षण तहकूब करण्यात येत आहे. वैतागून नंतर चार्ल्सच्या वडीलांनी त्याला धर्मगुरु करायचं ठरवलं. एका विद्यापीठत प्रवेश ही मिळवून दिला. तिथे त्याला बायबल आधारीत गोष्ट शिकवत - ईश्वराने एका आठवड्यात जग कसे निर्माण केले. जेनेसिस वगैरे गोष्टी. त्या गोष्टीमध्ये रस नसण्यापेक्षा जास्त त्या घरातल्या दबावाखाली तो त्यात रमला नसावा असे मला वाटते. विद्यापीठातच त्...
लिहायला घेतले की दररोजचा शीण कमी होतो.... क़ेवळ आणि केवळ त्यासाठीच!