ही एक उत्क्रुष्ट कलाक्रुती पाहण्याचा योग आला. चित्रपटाचे पुढील चार भागात तुकडे पाडले आहेत. सिनेमाच्या पुस्तकातले हे चार वेगवेगळे धडे आहेत असं म्हंटलं तरी काही हरकत नाही. भाग एक - हॊवर्ड कारच्या खरेदी-विक्रीचा याचा व्यवसाय. अपघातात तो आधी त्याचा मुलगा आणि नंतर त्याच्या पत्नीला गमावतो. तसा यशस्वी पण सर्वस्व गमावल्याने खचलेला, कशात काही मन लागत नाही असा. घोड्यांची पैदास करून शर्यतीचे घोडे वाढवण्याची त्याची इच्छा असते. त्याच्या या धंद्या निमित्ताने फ़िरत असतानाच त्याला एक स्त्री भेटते आणि दोघांचे लग्नही होते. पुढे एके दिवशी घोड्यांच्या तबेल्यात त्याला स्मिथ नावाचा म्हातारा भेटतो. तो म्हातारा एका घोड्याबरोबर माळरानावर राहत असतो. त्याचा सध्याचा घोडा पुर्वी जायबंदी झालेला असतो त्यामुळे त्याला त्याचा मालक गोळी घालत असताना या म्हातार्या स्मिथनी वाचवलेला असतो. स्मिथ या प्रसंगी गप्पा मारत असताना हॊवर्ड ला म्हणतो, "You dont throw away your ...
लिहायला घेतले की दररोजचा शीण कमी होतो.... क़ेवळ आणि केवळ त्यासाठीच!