शिर्षक वाचून बुचकळ्यात पडलात ना? पडला असाल तरच वाचा, नसाल तर नका वाचू कारण पुढे ऑस्ट्रेलियन खिलाडू व्रुत्तीचे वाभाडे काढायचा माझा मानस आहे. इ यान चापेल हा जुना ऑस्ट्रेलियन कर्णधार. १९७३ -७४ दरम्यान त्याच्या संघाने न्यूझीलंड दौरा केला होता. हा दौरा त्याच्या संघाच्या उर्मट वागण्याने इतका वाजला होता की, काही किवी पत्रकारांनी त्यांना ’अग्ली ऑस्ट्रेलियन्स’ असे म्हंटले होते. त्यावर १९७६ मध्ये (हो; या जाहिर उर्मटपणाची सुरुवात तेव्हापासून चालू आहे) त्याने एक लेख लिहिला. त्यात तो म्हणाला, " खरंतर आम्हाला सज्जन संघ म्हणूनच ऒळखले जावे हीच सगळ्यांची इच्छा असते. मैदानामध्ये उतरताना आमचा संघ कधीच मुद्दामहून ’भडव्यांचे टोळके’(Bunch of bastards) म्हणून ओळखला जावा असं कुणालाच वाटत नाही. ऑस्ट्रेलियन कर्णधार या नात्याने माझं तत्वज्ञान एकच. मैदानावर ११ ते ६ या वेळात सज्जन राहा...
लिहायला घेतले की दररोजचा शीण कमी होतो.... क़ेवळ आणि केवळ त्यासाठीच!