एका संध्याकाळी अजोबा नातवाला युद्धा-विषयी सांगत असतात - " बाळा, हे युद्धं दोन लांडग्यांमद्ध्ये असते. " "एक लांडगा वाईट असतो. तो म्हणजे क्रोध, अहंकार, दुःख, हेवा, पश्चात्ताप, अपराध, अपमान, असत्य, पोकळ अभिमान, मोहं, मत्सर, निराशा, द्वेष" "दुसरा चांगला असतो...तो म्हणजे आनंद, शांति, प्रेम, आशा, क्षमा, दया, कनवाळूपणा, औदार्य, सत्य, विश्वास, परोपकार, व सहनशीलता." नातू मिनिटभर विचार करतो..आणि विचारतो... "आजोबा, अखेर कुठला लांडगा युद्धं जिंकतो???" आजोबा शांतपणे उत्तर देतात..."ज्याला आपण खाऊ देत राहतो तो."
लिहायला घेतले की दररोजचा शीण कमी होतो.... क़ेवळ आणि केवळ त्यासाठीच!